Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था  भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेल्या टिप्पणीवर उत्तर दिलं आहे. लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला शरीरयष्टीवरून भाष्य केले. यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली. अशा शब्दात राणे यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे. ‘लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली व हे सिद्ध झाले की यांना ‘औरंग्यावरची ‘ टिका सहन होत नाही म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही.’ अशा आशयाचे ट्विट राणे यांनी करत अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे. अजित पवार यांना कालच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  एका तालुक्यातील महिला डॉक्टरसोबत वारवार मोबाईल क्रमांकावरुन अश्लिल संभाषण करणा-या मोबाईलधारकांविरुद्ध सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एरंडोल शहरातील येथील एका महिला डॉक्टरला २९ डिसेंबरपासून जवळपास १४ ते १५ अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन नेहमी फोन केले आहेत. या महिला डॉक्टरचा मोबाईल क्रमांक या मोबईलधारकांनी मिळवून अश्लिल संभाषण करुन मानसिक त्रास देण्याचा प्रकार सुरु आल्याने अखेर या महिला डॉक्टरने सायबर पोलिस स्टेशन गाठत सायबर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे पुढील तपास करत आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  दापोरा येथे सौ.कल्पनाबाई संतोष पानगडे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड 2020 व 21 या वर्षात झालेले ग्रामपंचायत निवडणुकीत दापोरा येथील विकास पॅनल यांचे सहा उमेदवार निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांनी वर्षाला नाना वाणी तर दुसऱ्या वर्षाला न्यानेश्वर वाणी व आता सौ. कल्पनाबाई पानगडे यांचे बिनविरोध सरपंचपदी निवड झाली. सरपंच पद घेतल्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात गावाचा विकास व महिला सुरक्षेच्या विषयी त्यांनी आपले मत व्यक्त केले . तेथे उपस्थिति ग्रामपंचायत सदस्य माधवराव पानगडे , नाना गवंदे, गोविंदा तांदळे व गावातील इतर ज्येष्ठ व्यक्ती उपस्थित होते.

Read More

सातारा : वृत्तसंस्था  शिंदे गटाच्या एका आमदाराने आता अजित पवार यांना चांगलेच फटकारले आहे. एका खासगी कार्यक्रमानिमित्त आमदार शहाजीबापू पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर व स्वराज्य रक्षक म्हणण्यावरून सध्या राज्यात वाद निर्माण झाला आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वराज्य रक्षक हेच बरोबर आहे. धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक या शब्दावर ठाम असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून शहाजीबापू यांनी आपली प्रतिक्रिया दिलीये. स्वराज्य रक्षक हा अजित पवार यांचा शब्द बरोबर आहे. परंतु, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य विस्तारक आणि कडवे हिंदू धर्मवीर होते. अजितदादांनी स्वराज्य रक्षक शब्दाबरोबर धर्मवीर संभाजी महाराज असं म्हटलं…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातील इलेक्ट्रिकचे दुकान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार असे की, तालुक्यातील भवरखेडा गावातील बस स्टॅन्ड परिसरात असलेले दीपिका इलेक्ट्रिकल या ठिकाणी दिनांक १४ डिसेंबर रोजीच्या मध्यरात्री अनोळखी चोरट्यांनी ३ हजार रुपये किमतीची एचपी इलेक्ट्रिक मोटर, ५ हजार रुपये किमतीची एक टेक्समो कंपनीची एचपी इलेक्ट्रिक मोटर, १० हजार रुपये किमतीची एक अजंता कंपनीचे पाच एचपी इलेक्ट्रिक मोटर, त्यासोबत १२ हजार रुपयाची लुबी कंपनीची एचपी इलेक्ट्रिक मोटर असा ३० हजार रुपयांचे एवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी स्वप्निल अधिकार पाटील यांच्या फिर्यादीवरून…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला होता. अखेर सरकारने हा कायदा लागू केला आहे. त्यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार होती. सरकारच्या इशाऱ्यानंतरही संपकरी कर्मचारी ठाम होते. त्यानंतर आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती. हा संप मागे घेण्यासाठी त्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली. त्याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, महावितरणचे खासगीकरण करायचे नाही. त्याबद्दल कोणताही विचार नाही असंही फडणवीस म्हणाले आहेत. आज वीज कर्मचारी आणि उपमुख्यमंत्री-उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली, या बैठकीत वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला आहे.…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गटाची) नवनियुक्त कार्यकारिणी जिल्ह्यात जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवसेनेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. धरणगाव तालुका युवासेना कार्यकारणी जाहीर कार्यकारणी पुढील प्रमाणे युवासेना उपजिल्हा संघटक प्रवीण मराठे सर, युवासेना उपतालुका प्रमुख उगलाल पाटील, युवासेना धरणगाव तालुका प्रवक्ता सचिन पाटील सर, युवासेना विध्यार्थी सेना उपतालुका प्रमुख अनिकेत पाटील, युवासेना उपतालुका प्रमुख अजय पाटील, युवासेना विभाग प्रमुख शुभम चव्हाण, युवासेना विभाग प्रमुख समाधान पाटील, युवासेना विभाग प्रमुख कुणाल इंगळे, युवासेना विभाग प्रमुख ललित पाचपोळ, युवासेना मीडिया प्रमुख निलेश पाटील, युवासेना मीडिया प्रमुख कैलास सोनवणे, युवासेना विभाग प्रमुख भूषण शिंदे, युवासेना मीडिया प्रमुख तुषार पाटील,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाने आज सकाळी प्रकाश आंबेडकर यांच्याशी युतीची चर्चा करीत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यासोबत युतीची चर्चा करून प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी युती जाहीर हि करून टाकली आहे. राज्याला धाडसी मुख्यमंत्री लाभला आहे, असे म्हणत प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी बाळासाहेबांच्या सुतीसोबत युती केल्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री शिंदेवर आमचा विश्वास आहे, असे वक्तव्य जोगेंद्र कवाडे यांनी ​​​​केले आहे.​​ बाळासाहेबांची शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांची संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. या निमित्ताने शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे. पत्रकार परिषदेचे आयोजन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रा. जोगेंद्र कवाडे…

Read More

जागतिक स्तरावर सोन्या-चांदीच्या किंमतीतील चढ-उतार कायम आहेत. भारतीय बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्याचा परिणाम महारष्ट्रातमध्ये दिसून आला आहे. आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 50,960 तर 24 कॅरेट साठी 55,590 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 720 रुपये आहे. देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या. चेन्नई – 56,670 रुपये दिल्ली – 55,740 रुपये हैदराबाद – 55,590 रुपये कोलकत्ता – 55,590 रुपये लखनऊ – 55,740 रुपये मुंबई – 55,590 रुपये नागपूर – 55,590 रुपये पुणे – 55,590 रुपये 22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे? 24 कॅरेट सोने…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील नागरिकांमध्ये मोठ संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच महावितरण कर्मचारीनी मध्यरात्रीपासून बेमुदत आंदोलन सुरु केल्याने अजून नागरिक गैरसमज आहे कि लाईट जाणार असल्याची भीती नागरिकांना लागून राहिली आहे. पण वीज कर्मचाऱ्यांच्या संघर्ष समितीने पुकारलेल्या आंदोलनानंतर प्रधान ऊर्जा सचिव व तिन्ही कंपन्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकासोबत समितीची बैठक सोमवारी (ता. दोन) झाली. बैठकीमध्ये ठोस असे आश्वासन न मिळाल्यामुळे वीज उद्योगातील कर्मचारी संघटनांच्या संघर्ष समितीने तीन जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. गेल्या दीड महिन्यापासून वीज कर्मचाऱ्यांच्या संघर्ष समितीने खासगीकरणाविरोधात आंदोलन केले. लोकप्रतिनिधींना भेटून वीज कंपन्यांचे खासगीकरण करण्याचे शासनाचे असलेले धोरण निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. जनतेचे व…

Read More