जळगाव प्रतिनिधी आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.तर सीबीआयला शिंदे सरकारच्या काळातही राज्याची परवानगी घेऊन तपास करावा लागणार आहे. एकनाथ शिंदे सरकारच्या काळात देखील केंद्रीय अन्वेषण विभागाला महाराष्ट्रातील प्रकरणांचा तपास करण्यासाठी अद्याप संमती दिलेली नाही. ठाकरें सरकारने सत्तेवर असताना सीबीआयबद्दल घेतलेला निर्णय कायम ठेवला आहे. अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी झालेल्या महाराष्ट्र पोलीस आणि सीबीआय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आपल्या यंत्रणांचा दुरूपयोग करत असल्याने ठाकरे सरकारने निर्णय घेतला होता. महाराष्ट्रासह पंजाब, झारखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, मिझोरम, केरळ व मेघालय या राज्यांतही सीबीआयला सर्वसाधारण संमती दिली गेलेली नाही. महाराष्ट्र पोलीस आणि सीबीआय असा वाद निर्माण झाला होता. तर महाराष्ट्र…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: सुप्रिम कॉलनीतील दुकानात सामान घेण्यासाठी आलेल्या तरूणाने दुकानातील गल्ल्यातून ४ हजाराची रोकड लांबविली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपी कृष्णा चव्हाण रा. रायपुर ता. जि. जळगाव याला गुरूवारी २८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील सुप्रिम कॉलनी विठ्ठल मंदिर चौकात अशोक सुभाष शिंदे (वय-२८) हा तरुण किराणा दुकान चालवून उदनिर्वाह करीत होते. बुधवार २७ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अशोक यांचा भाऊ विकास हे दुकानात होते. यावेळी ते घरात पाणी पिण्यासाठी गेले असता, सामान घेण्यासाठी आलेला ग्राहक कृष्णा चव्हाण यांनी दुकानाच्या…
जळगाव प्रतिनिधी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या निवृत्तीनंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तापदी विवेक फणसाळकर यांची वर्णी लागली. अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पोलीस आयुक्त यांनी हे निर्देश दिले असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील सर्व पोलीस कार्यालयांमध्ये मराठीतून कामकाज करण्याचे आदेश मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिले आहेत. कार्यालयीन कामकाजामध्ये मराठी भाषेचा सर्वाधिक उपयोग करण्यात यावा तसेच एफआयआर, आरोपपत्र आणि अहवाल हा मराठीतूनच तयार करण्यात यावा, असे आदेश पोलीस आयुक्तांनी मुंबईतील सर्व पोलीस कार्यालयांना दिले आहेत. अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पोलीस आयुक्त यांनी हे निर्देश दिले असल्याची माहिती आहे. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत कडक निर्देश देण्यात आले आहेत. आयुक्तांना पाठवला जाणारा…
प्रविण पाटील प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषदेच्या गटांचे आरक्षण आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर करण्यात आले आहे. यात म्हसावद बोरनार गटाचे आरक्षण सर्वसाधारण ओबीसी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या गटात भाजपा, राष्ट्रवादी आणि शिंदे गट याच्यावतीने इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण काढण्यात आले. यात म्हसावद-बोरणार गटासाठी सर्वसामान्य ओबीसी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ओबीसी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच्या नावाची चर्चा असून त्यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी होत…
जळगाव प्रतिनिधी सोलापूर येथील अक्कलकोट रोड परिसरात मतिमंद तरुणीला ओळखीच्या व्यक्तीने आपल्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची पित्तखवळणारी घटना घडली आहे. यात एकास अटक करून त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.त्याला 4 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याच्या आदेश न्यायालयाने मंगळवारी दिला. सोलापूर येथील अक्कलकोट रोड परिसरात संबंधित मतिमंद तरुणी राहण्यास आहे. मूक बधिर शाळेत शिक्षण घेते. 25 जुलै दुपारच्या सुमारास घडली. तिच्या वडिलांच्या परिचयातील अजीज ऊर्फ अहमद शेख हा घरी येत असे मतिमंद मुलीला कधी कधी तिच्या घराजवळील दुकानातून खाऊ घेऊन देत होता.सोमवारी दुपारी नराधम हा त्या मुलीच्या घरी आला. त्यावेळी मुलीची आजी घरात होती. थोडा वेळ बसल्यानंतर त्याने मुलीला…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील समता नगरातील ४० वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी २८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता उघडकीला आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भरत रमेश आंबेकर (वय-४०) रा. समता नगर,जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.अधिक माहिती अशी की, भरत आंबेकर हा पत्नी सविताबाई व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करत होता. गुरूवारी २८ जुलै रोजी भरतची पत्नी सविताबाई ह्या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या तर दोन्ही मुले शाळेत गेले होते. त्यामुळे घरी एकटे होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार दूध संघाच्या मुख्य प्रशासकपदी आ. मंगेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दूध संघातील गैरकारभाराच्या तक्रारीवरून एक ५ सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने गुरूवारी २८ जुलै रोजी सकाळी सहकारी संस्थेच्या सहनिबंधक निबंधकांना एक पत्र पाठवत जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मुख्य प्रशासकपदी आ. मंगेश चव्हाण यांची नियुक्ती केल्याचे म्हटले आहे. तसेच पत्रात पुढे म्हटले आहे की, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने मला आपणास असे कळविण्याचे निर्देश आहेत की, जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक…
जळगाव प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या भेट घेत असतात. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. रोहित पवार यांनीच या भेटीचे दोन फोटो ट्विटरवरुन पोस्ट केले आहेत. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. रोहित पवार यांनी बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास केलेल्या ट्विटमधून या भेटीची माहिती दिली आहे. रोहित यांनी पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ते शिंदेंसोबत चर्चा करताना दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना रोहित यांनी, “मतदारसंघासह विविध विषयांवर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची आज मुंबईत भेट घेऊन चर्चा केली.” असं…
प्रविण पाटील प्रतिनिधी : जळगाव तालुका पंचायत समितीच्या एकुण १० गणांसाठी गुरूवार २८ जुलै रोजी सकाळी ९ वाजता पंचायत समिती कार्यालयात प्रांताधिकारी महेश सुरळकर यांच्या उपस्थितीत काढण्यात आले. याप्रसंगी प्रांत महेश सुरळकरत, जळगाव तहसीलदार नामदेव पाटील, परिविक्षाधिन नायब तहसीलदार मयूर कळसे, नायब तहसीलदार विशाल सोनवणे, लिपिक अश्विन वाघ यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जळगाव पंचायत समितीचे आरक्षण याप्रमाणे आहे. भोकर – सर्वसाधारणकानळदा – सर्वसाधारण महिलाममुराबाद – सर्वसाधारणआसोदा – अनुसुचित जमाती महिलाभादली बुद्रुक – अनुसुचित जाती महिलाकुसुंब खुर्द – अनुसुचित जातीशिरसोली- नामप्र महिलाधानवड – नामाप्र म्हसावद – सर्वसाधारण महिलाबोरनार -सर्वसाधारणयाप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. याप्रसंगी प्रांत महेश…
धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार गटांचे आरक्षण प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात हे आरक्षण जाहीर करण्यात आले. धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार गटांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून आता खऱ्या अर्थाने निवडणूकीच्या रणधुमाळीला सुरूवात होणार आहे. यात शिवसेना, भाजप, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिंदे गट यांच्यात चांगली निवडणूकीची लढत पहावयास मिळणार आहे. असे आहेत धरणगाव तालुक्यातील चार गटांचे आरक्षण पाळधी- बांभोरी प्रचा : जनरल पिंप्री-वराड : जनरल महिलानांदेड-चांदसर : जनरल महिलासाळवा-बांभोरी : एस्सी जनरल

