Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । गुलाबराव पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे पुर्वीप्रमाणेच पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री या पदाची जबाबदारी देण्यात येत आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्याला दोन मंत्री मिळाल्याने विकास कामांना खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे असे जळगाव ग्रामीण मतदार संघात बोलले जात आहे. ना. गुलाबराव पाटील यांनी सकाळी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर धरणगाव मतदार संघातील समर्थक कार्यकर्त्यांमध्ये एकप्रकारे उत्साह संचारला आहे.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवार, ८ ऑगस्ट रोजी दुपारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथील वय १७ मुलगा हा त्याच्या घरी असतांना त्यास ७ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट दरम्यान अज्ञात व्यक्तीने काहीतरी फूस लावून पळवून नेले. मुलगा उशीर होवून पुन्हा घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबियांनी शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. अखेर एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून सोमवारी ८ ऑगस्ट रोजी दुपारी अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Read More

भुसावळकडून जळगावकडे येत असतांना राष्ट्रीय महामार्गावर पार्श्वनाथ पेट्रोलपंपासमोर अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना २९ जुलै रोजी घडली होती. या अपघातप्रकरणी नऊ दिवसानंतर रविवार, ७ ऑगस्ट रोजी नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिओम धनाजी भुसारे वय ३८ रा. सावरगाव ता. नांदगाव जि. नाशिक हे २९ जुलै रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीने भुसावळकडून जळगावकडे येत असतांना महामार्गावर नशीराबादजवळ पार्श्वनाथ पेट्रोलंपपासमोर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात होवून दुचाकीवरील हरिओम भुसारे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नऊ दिवसानंतर रविवारी मयत हरिओम यांचे वडील धनाजी गंगाराम भुसारे वय ६२ रा. श्रध्दा कॉलनी, जळगाव यांच्या तक्रारीवरुन…

Read More

जळगाव शहरातील सिल्व्हर पॅलेज हॉटेलमधील लॉजिंग विभागाच्या काऊंटरमधून २ हजार १० रुपयांची रोकड चोरुन नेणाऱ्या तरुणाविरोधात रविवार, ७ जुलै रोजी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसात दाखल तक्रारीनुसार असे की, हॉटेल सिल्व्हर पॅलेसच्या लॉजिंक विभागातील काऊंटरमधून ३१ जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास हॉटेलमधीलच भुषण फकीरा सुर्यवंशी याने मालकाच्या संमतीशिवाय २ हजार १० रुपये चोरुन नेले. चोरीची खात्री झाल्यानंतर याप्रकरणी हॉटेलचे सुपरवायझर सागर रत्नाकर झांबरे यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन रविवारी भुषण फकीरा सुर्यवंशी रा. शेंदुर्णी ता. जामनेर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय निकुंभ हे करीत आहेत.

Read More

शहरातील इच्छादेवी चौकात राहणाऱ्या तरुणाचा मेहरुण तलावामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार ८ ऑगस्ट रोजी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी नोंद घेतली असून अकस्मात मृत्यू नोंद करण्याचे काम सुरू होते.नाना सुरेश सोनवणे (वय ३२, रा.इच्छादेवी नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, नाना सुरेश सोनवणे हा सोमवारी ८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मेहरण तलाव येथे गेला होता. काही वेळानंतर तो तेथे बुडून मृत्यू पावल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, त्याने आत्महत्या केली किंवा पाण्यात पाय घसरून पाडला याची कोणतीही माहिती मिळाली नाही. पोलीसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात…

Read More

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. पहिल्या टप्प्याच साधारणत: १५ ते १८ मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टोले बाजी केली आहे. “उद्या मंत्रीमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वाटते आहे. मात्र, विरोधी पक्षनेता म्हणून मला अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही”, विधानसभेच्या विरोधीपक्ष नेता या नात्याने मला आज पत्र मिळाले आहे. उद्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी विरोधीपक्षांची नावे देण्यासाठी हे पत्र मला प्राप्त झाले आहे. त्यामुळे उद्या या समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. पुढे अजित पवार म्हणाले, मला मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत माहिती मिळाली आहे. मात्र, विरोधीपक्ष…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । राज्य मंत्री मंडळाची शपथविधीचा मुहूर्त ठरल्याने जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील हे आज दुपारी मुंबई तातडीने रवाना झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळाच्या विस्तारासाठी मंगळवार ९ ऑगस्ट तारीख ठरली आहे. ९ ऑगस्ट हा क्रांती दिनी असल्याने पहिल्या मंत्री मंडळाचा विस्तार होत आहे. याबाबत आता बंडखोर आमदारांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. त्यासाठी जणू काही गुडघ्याला बाशींग बांधून होते. राज्य मंडळाच्या शपथविधीला मोजके मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. जळगाव जिल्ह्यात माजी मंत्री आमदार गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांची नावे निश्चित करण्यात आली आहे. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ते रेल्वेद्वारे…

Read More

7 ऑगस्ट रोजी पुण्यात दारू पिलेल्या वादातून एकाने मित्राचा डोक्यात दगड मारून गंभीररित्या हत्या करण्यात आली. मात्र उपचारादरम्यान या तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी प्रवीणला अटक केली आहे. अनिल राजू सासी (वय 33, रा. इंदिरानगर वसाहत) असे मृत तरुणाचे नाव आहे. अनिल हा बूट पॉलिशचे काम करून उदरनिर्वाह चालवत होता. प्रवीण आणि अनिल मागील 10 ते 12 वर्षांपासून मैत्री होती. दोघेही नेहमी सोबतच दारू पित असत. 2 ऑगस्टला दुपारच्या सुमारास अनिल व प्रवीण दारू पित बसले होते. यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यामुळे रागातून प्रविणने अनिलच्या डोक्यात दगडाने मारून त्याला गंभीर जखमी केले. प्रविण त्या…

Read More

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन दीड महिना झाला तरीसुद्धा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. संपूर्ण राज्याचं लक्ष आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागून राहिलं आहे. आता प्रतिक्षा संपली असून उद्याच सकाळी 11 वाजता राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राजभवनावर शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचंही कळतंय. पहिल्या टप्प्यात 10 ते 15 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक सुरु असून बैठकीनंतर ते राजभवनावर जाण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात किती मंत्र्यांचा समावेश असेल हा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे असणार आहे. सातत्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विचारला. मात्र लवकरच विस्तार होईल असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे…

Read More

एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांवर आता जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता एकनाथ खडसेंनी बंडखोरांवर खोचक टीका केली आहे. “हम तो डुबेंगे सनम, तुमको भी साथ लेकर डुबेंगे” असं म्हणत हल्लाबोल केला आहे. “कोणी म्हणतं तुरुंगात जायचंय, जायचंय तुरुंगात तर तुरुंगात जाईन. माझं नेहमीच असं होतं की, हम तो डुबेंगे सनम, तुमको भी साथ लेकर डुबेंगे”” असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. आडवी उभी काहीतरी स्टोरी रचायची आणि त्याच्या माध्यमातून अडकवण्याचा प्रयत्न करायचा असे जे प्रकार होत आहेत ते निषेधार्ह आहेत” तुम्हाला काय हाटील, काय झाडी जे काही बघायचे असेल…

Read More