Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार दूध संघाच्या मुख्य प्रशासकपदी आ. मंगेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दूध संघातील गैरकारभाराच्या तक्रारीवरून एक ५ सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने गुरूवारी २८ जुलै रोजी सकाळी सहकारी संस्थेच्या सहनिबंधक निबंधकांना एक पत्र पाठवत जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मुख्य प्रशासकपदी आ. मंगेश चव्हाण यांची नियुक्ती केल्याचे म्हटले आहे. तसेच पत्रात पुढे म्हटले आहे की, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने मला आपणास असे कळविण्याचे निर्देश आहेत की, जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक…

Read More

जळगाव प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या भेट घेत असतात. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. रोहित पवार यांनीच या भेटीचे दोन फोटो ट्विटरवरुन पोस्ट केले आहेत. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. रोहित पवार यांनी बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास केलेल्या ट्विटमधून या भेटीची माहिती दिली आहे. रोहित यांनी पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ते शिंदेंसोबत चर्चा करताना दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना रोहित यांनी, “मतदारसंघासह विविध विषयांवर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची आज मुंबईत भेट घेऊन चर्चा केली.” असं…

Read More

प्रविण पाटील प्रतिनिधी : जळगाव तालुका पंचायत समितीच्या एकुण १० गणांसाठी गुरूवार २८ जुलै रोजी सकाळी ९ वाजता पंचायत समिती कार्यालयात प्रांताधिकारी महेश सुरळकर यांच्या उपस्थितीत काढण्यात आले. याप्रसंगी प्रांत महेश सुरळकरत, जळगाव तहसीलदार नामदेव पाटील, परिविक्षाधिन नायब तहसीलदार मयूर कळसे, नायब तहसीलदार विशाल सोनवणे, लिपिक अश्विन वाघ यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जळगाव पंचायत समितीचे आरक्षण याप्रमाणे आहे. भोकर – सर्वसाधारणकानळदा – सर्वसाधारण महिलाममुराबाद – सर्वसाधारणआसोदा – अनुसुचित जमाती महिलाभादली बुद्रुक – अनुसुचित जाती महिलाकुसुंब खुर्द – अनुसुचित जातीशिरसोली- नामप्र महिलाधानवड – नामाप्र म्हसावद – सर्वसाधारण महिलाबोरनार -सर्वसाधारणयाप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. याप्रसंगी प्रांत महेश…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार गटांचे आरक्षण प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात हे आरक्षण जाहीर करण्यात आले. धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार गटांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून आता खऱ्या अर्थाने निवडणूकीच्या रणधुमाळीला सुरूवात होणार आहे. यात शिवसेना, भाजप, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिंदे गट यांच्यात चांगली निवडणूकीची लढत पहावयास मिळणार आहे. असे आहेत धरणगाव तालुक्यातील चार गटांचे आरक्षण पाळधी- बांभोरी प्रचा : जनरल पिंप्री-वराड : जनरल महिलानांदेड-चांदसर : जनरल महिलासाळवा-बांभोरी : एस्सी जनरल

Read More

अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, आम्ही असताना असे दिवस आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान सभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्याचा अतिवृष्टी दौरावर आहेत. राज्यावर नैसर्गिक संकट आल्यावर सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षाचे खासदार व आमदारांना एकत्र करून काम केल्यास त्याचे रिझल्ट लवकर मिळतात.मात्र दुर्दैवाने आज असे होताना दिसत नाही, अजित पवारांनी खंत व्यक्त केली आहे. राज्याचा शेतकरी मोठ्या प्रमाणावर हवालदिल झाला आहे. अतिवृष्टी झालेल्या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यांपैकी अहेरी, सिरोंचा आणि भामरागड या भागाला अतिवृष्टीचा मोठा फटका…

Read More

जळगाव प्रतिनिधी आज मुंबईत एकनाथ शिंदे सरकारची कॅबिनेट बैठक पार पडली असून, त्यात मोठे निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना याचा फायदा करण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या पूरपरिस्थीतीमध्ये ज्या शेतकऱ्यांना शासनाने मदत केली होती, त्यातून काही नावे वगळण्यात आले होती. आम्ही मात्र कोणालाही यातून वगळू नका, असा निर्णय घेतला आहे. जे शेतकरी नियमित कर्जफेड करत होते, त्यांना 50 हजार रुपये अनुदानपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.त्यामुळे राज्यातील जवळपास 14 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. सहा हजार कोटी रुपये शासनाच्या तिजोरीतून दिले जाणार आहे. असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या उपसा जलसिंचन…

Read More

जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात करगावात एका 11 वर्षीय चिमुकलीवर महिनाभरात अनेकवेळा सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नऊ नराधमांना अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. नागपूर शहरापासून 60 किमी अंतरावर असलेल्या गावात 19 जून ते 15 जुलै दरम्यान या घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.पीडितेचे आई-वडील मजूर असून करगावकर हे अल्पवयीन मुलीच्या शेजारी राहतात. 19 जून रोजी करगावकर हा मुलीच्या घरी गेला. त्याने मुलीला आपल्या सोबत घरी येण्यास सांगितले. त्यानंतर मुलगी कारगावकरसोबत त्याच्या घरी गेली, जिथे त्याने आणि त्याचा मित्र मुरस्कर यांनी मुलीवर बलात्कार केला.”आरोपीने मुलीला काही पैसे दिले आणि त्याबद्दल कोणालाही सांगू नका असे…

Read More

जळगाव प्रतिनिधी भारताचा युवा कुस्तीपटू सूरज वशिष्ठ याने अंडर-17 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. त्याने कुस्तीच्या ५५ ​​किलो गटात सुवर्णपदक पटकावले आहे. भारतासाठी आज कौतुकास्पद दिवस आहे. सध्या जागतिक कॅडेट्स कुस्ती चॅम्पियनशिप 2022 ही एकत्रित स्पर्धांची जागतिक कॅडेट्स कुस्ती स्पर्धा सुरु आहे. दिनांक 25 ते 31 जुलै या कालावधीत रोम, इटली या स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. सुरजने अंतिम सामन्यात अझरबैजानच्या फारिम मुस्तफायेवचा 11-0 असा पराभव केला. महत्त्वाची बाब म्हणजे या चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा सूरज हा तिसरा भारतीय ग्रीको-रोमन कुस्तीपटू ठरला आहे. 2022 वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये ग्रीको-रोमन (GR) 55kg स्पर्धेत सूरजने सुवर्णपदक जिंकले आहे. या प्रकारात यापूर्वी कुस्तीपटू पप्पू यादव…

Read More

जळगाव प्रतिनिधी नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्नाला यश आले नाही. त्यामुळे आता ज्या ठिकाणी नगर परिषदांची निवडणूक जाहीर झाली आहे. तर आता ओबीसी आरक्षण लागू करण्यास सुप्रीम कोर्टान नकार दिला आहे. नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनवावणी पार पडली. यावळी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला फटकारले आहेत. नगरपरिषद निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहे. तसंच, ओबीसी आरक्षणाला परवानगी नसताना निवडणुकीचे वेळापत्रक आधीच जारी केले होते. त्यामुळे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्यात. मे महिन्याच्या आदेशानुसार 367 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिसूचित केल्या जाणार होत्या. तसेच 92 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक कार्यक्रम अधिसूचित करण्यात…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव पंचायत समितीच्या अंतर्गत आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे. धरणगाव तालुक्यात आठ गटासाठी आरक्षण काढण्यात आले आहे. आरक्षण पुढील प्रमाणे बांभोरी प्र.चा.-एससी महिलापाळधी खुर्द – एसटी महिलाबांभोरी बु – एसटी जनरलचांदसर बु – जनरल (ओबीसी पुरूष)पिंप्री खर्द – जनरलनांदेड – जनरल महिलासाळवा -जनरल महिला

Read More