लाईव्ह महाराष्ट्र : तालुक्यातील म्हसावद ते माहिजी दरम्यान २२ वर्षीय तरूणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत माहिती अशी की, सागर गणेश खडसे (वय-२२) रा. दहीगाव संत ता. पाचोरा या तरूणाने म्हसावद ते माहेजी रेल्वे अपलाईन खंबा क्रमांक ३९४/११-१२ दरम्यान धावत्या रेल्वेखाली झोकून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र : पाचोरा शहरातील मेडिकल एजन्सीच्या संचालिका असणार्या महिलेच्या घरात चोरट्यांनी हात साफ करून तब्बल ६ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा शहरातील राधाकृष्ण रेसिडेन्सी, रो हाऊस नं. ९, स्वप्नशिल्प हॉटेलच्या मागे मंगला वसंत सुर्यवंशी यांचे स्वतःच्या मालकीचे घर आहे. मंगला सुर्यवंशी यांची शहरातील बस स्टँड जवळ पाटील मेडिकल एजन्सी आहे. पती भारतीय वायु सेनेतुन सन – २००७ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. दरम्यान पती वसंत सुर्यवंशी यांचे आकस्मित निधन झाले. मंगला सुर्यवंशी ह्या दि. ११ सप्टेंबर रोजी ज्ञानेश्वर पाटील (भाचा) याचे सोबत जळगांव येथे खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान…
लाईव्ह महाराष्ट्र : चाळीसगाव शहरातील कॅप्टन कॉर्नर येथे राहणाऱ्या डॉक्टराच्या घरातील लोखंडी कपाटातून अज्ञात इसमाने २ लाख ६ हजार रुपये रोखड लंपास केल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.याबाबत वृत्त असे की, विवेक बळवंतराव बोरसे (वय-४०) रा. कॅप्टन कॉर्नर चाळीसगाव हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास असून शहरातील चिरायू दवाखान्यात डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान बोरसे हे नेहमीप्रमाणे ११ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वा. घराला कुलूप लावून दवाखान्यात निघून गेले. दवाखान्यातील काम आटोपल्यानंतर ते सायंकाळी ४:३० वाजता घरी परतले. घरातील सर्व जण मुंबई येथे गेलेले असल्याने त्यांना झोप लागली. सायंकाळी ७ वाजता बोरसे झोपेतून उठल्यावर…
लाईव्ह महाराष्ट्र : जिल्ह्यातील 10 गावामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या जयपूर येथील राष्ट्रीय सनियंत्रण संस्था भारती विकास संस्थेतर्फे मनोज दीक्षित व श्रीमती मोनिका हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली.या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे (भूसंपादन), कृषी उपसंचालक अनिल भोकरे, उपजिल्हाधिकारी प्रसाद मते (रोहयो), जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे (ग्रामपंचायत), भूमीअभिलेख विभागाचे अधीक्षक श्री. मगर, तहसीलदार जितेंद्र कुवर, बोदवड, चोपडा, पाचोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, जिल्हा नियोजन कार्यालयातील लेखाधिकारी कैलास सोनार…
लाईव्ह महाराष्ट्र : चाळीसगाव तालुक्यातील बेलदार वाडी शिवारातील झटका देवी वस्ती बेलदारवाडी जवळ नाल्यामध्ये कोणीतरी अज्ञात पालकांनी एक नवजात पुरुष जातीचे अर्भक उघड्यावर टाकून पलायन केल्याची घटना 13 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात क्रूर माता व पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.याबाबत माहिती अशी बेलदार वाडी तालुक्यातील बेलदारवाडी शिवारातील झटका देवी वस्ती बेलदारवाडी जवळ नाल्यामध्ये एक नवजात पुरुष जातीचे अर्भक उघड्यावर पडले असल्याची माहिती पोलीस पाटील सोमनाथ कुमावत यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिल्यावर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे तसेच सहाय्यक तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री धरमसिंग सुंदरडे, महिला पोलीस कर्मचारी…
लाईव्ह महाराष्ट्र: जळगाव महानगर पालिका अंतर्गत काम करणा-या आशा-स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना कोवीड-19 प्रोत्साहन भत्ता पूर्ववत सुरू करण्यात यावा, नवीन आशा स्वयंसेविका यांना त्वरीत प्रशिक्षण देऊन 5 महिन्यांचे थकित मोबदला ईतर थकबाकी स्तवर आशांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात यावी.आशा आशयाचे निवेदन मनपा आयुक्त, महापौर, याना देण्यात आले.जळगाव महानगर पालीकेत आरोग्य विभागात आशा वर्कर्स व गट प्रवर्तक म्हणून काम करणाऱ्या महिलांना कोवीड १९, अंतर्गत शासनाने देय असतिल प्रोत्साहन भत्ता शासनाने बंद केले आहे तसेच नवीन आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण देणे अनिवार्य असतांना प्रशिक्षण दिले नाही व प्रशिक्षण अभावी सर्व आशांना त्यांना मिळणाऱ्या कामाच्या मोबदला मानधन, नाकारले आहे.महानगर पालिका अंतर्गत काम करणा-या…
जळगाव प्रतिनिधी : कौटुंबिक नैराश्यातून जिल्हा कारागृहातील बॅरेक क्रमांक २ मध्ये पंख्याला गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित अनिता राजा चावरे (वय ५०) या महिलेेने केला.धक्कादाकय घटना सोमवारी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली.जिल्हा कारागृहातील बॅरेक क्रमांक २ मध्ये अल्पवयीन मुलीला पळवून तिच्यासोबत बनावट कागदपत्रांच्या आधारे लग्न केले तसेच तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयात भारत राजा चावरे या मुलासह अनिता चावरे या न्यायालयीन कोठडीत आहेत.न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित अनिता चावरे यांनी साडीचा पदरचा काठ कापून बॅरेकमधील पंख्याला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. वेळीच प्रकार लक्षात आल्याने दुर्घटना टळली. याप्रकरणी जिल्हा कारागृहातील महिला रक्षक उषा…
जळगाव प्रतिनिधी: रविवारी सकाळी रस्त्यावर मुलांनी बापाचा खून केला तर दुसऱ्या दिवशी ही शहरातील जुने जळगावातील रथ चौकाच्या शेजारील आंबेडकर नगरातील आंबेडकर समाज भवन समोर राहणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यक्तीचा डोकं ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी पोहचले असून तपासला सुरवात झाली आहेशहरातील महत्वाच्या परिसर असलेला जुना जळगाव परिसरात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भवन समोर राहणारे राजू पंडित सोनवणे वय-५५ यांचा ३० वर्षांपूर्वी रजिया सोनवणे यांच्याशी विवाह झाला होता. १५ वर्षांपासून दोन्ही पती-पत्नी आणि २ मुले असे लक्ष्मी नगरात स्थायिक झाले होते.राजू सोनवणे हे रिक्षा चालक होते परंतु गेल्या काही…
धरणगाव प्रतिनिधी: येथील तरडे येथे राहणारे विक्रम कौतिक पाटील याचे वृद्धपकाळाने निधन झालेविक्रम कौतिक पाटील याचे वृद्धापकाळाने दुःखद निधन 12 रोजी सायंकाळी ५ वाजता झाले. त्यांची अंत्ययात्रा आज 13 रोजी ( सोमवार) रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.तालुका पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्षव तरडे गावाचे पोलीस पाटील कैलास पाटील याच्या वडील होते .
लाईव्ह महाराष्ट्र : वाढदिवसाचे बॅनर फाडल्याच्या प्रकरणात सेटलमेंट करण्यासाठी तब्बल सहा लाख रूपयांची खंडणी मागण्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत वृत्त असे की, राष्ट्रीय महामार्गावर भुसावळ ते साकेगावच्या दरम्यान बंटी पथरोड याच्या वाढदिवसाचे पोस्टर लावण्यात आले होते. यामुळे पथरोड व सहकार्यांनी साकेगाव येथील मयूर मदन काळे याला मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. पथरोड व सहकार्यांनी त्याला पिस्तूल, चॉपर व शस्त्रांचा धाक दाखवून ५ लाख रूपये खंडणीची मागणी केली. मागणी मान्य झाल्यावर त्यास सोडले.यानंतर मयूर काळे याने सागर भोई याला ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी दोन लाख रूपये दिली. तर, या टोळक्याने मयूरला…

