Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

गरजू रुग्णांना होणार मोफत औषधी वाटपलाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव येथील शिरसोली रस्त्यावरील श्री. गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयातर्फे रविवारी दि. 3 ऑक्टोबर रोजी भादली येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात तपासणी नंतर गरजू रुग्णांना मोफत औषधी वाटप करण्यात येणार आहे. भादली पंचक्रोशीतील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.या शिबिरात डायबिटीस, ब्लड प्रेशर, थायराॅइड, लहान मुलांचे आजार, महिलांचे गर्भपिशवीचे आजार व मासिक पाळी संबंधीच्या समस्या, महिलांच्या स्तनाचे आजार, मानेचे व मणक्याचे आजार, पोटाचे आजार, मुळव्याध व भगंदर, आतड्यांचे आजार, अशक्तपणा व चक्कर येणारे आजार, डोळ्यांच्या लालसरपणाचे आजार, नजर कमी होणे, डोळ्यातून…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र बो येथे शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा उतारे वाटप करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार पंचायत समिती सभापती माननीय मान्यवरांसह शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज सकाळी शिरसोली प्र.बो.येथे  आयोजित मोफत डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उतारा वाटपाचा विशेष मोहिमेच्या शुभारंभ जळगाव उपविभागीय अधिकारी  महेश सुधोळकर  यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव तहसीलदार  नामदेवराव पाटील ,नायब तहसीलदार  विशाल सोनवणे, पंचायत समितीचे माजी सभापती नंदलाल पाटील व शिरसोली प्र.बो.चे सरपंच प्रदीप पाटील या सर्व मान्यवरांच्या हस्ते शेतकरी बांधवांना प्रातिनिधिक स्वरूपात मोफत डिजिटल सातबारा उताऱ्याचे वितरण शिरसोली प्र.बो.ग्रा.प.सद्स्य व नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.  यावेळी कार्यक्रमाचे आयोजक व…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मुलीला भेटण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याच्या बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्याचे दागिन्यांसह रोकड असा एकुण १ लाख ४२ हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना आज ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी की, फारूख अब्दुल गफुर देशमुख (वय-६०) रा. नशेमन कॉलनी, केजीएन दुध डेअरी जवळ मास्टर कॉलनी हे पत्नी नाहीदाबी देशमुख यांच्यासह राहतात. घरातच किरकोळ किराणा विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात दरम्यान, मंगळवार २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता  भुसावळ तालुक्यात वरणगाव येथे राहत असलेली मुलगी हिना पटेल यांच्याघरी भेटण्यासाठी जळगावातील घराला कुलूप लावून गेले…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : खडसे साहेब अनेक दिवसांपासून बेछूट आरोप करीत आहे यापूर्वी सुद्धा त्यांनी विविध आरोप केले आहेत आर्थिक विषय असतील वेगवेगळ्या विषयांवर असतील नियमित त्यांचे बोट जामनेर कडे दाखविले आहे मात्र ते कधीच नाव घेत नसायचे त्यांचा इशारा सर्वांना समजायचं मात्र त्यांनी खोटे गुन्हे दुःख दाखल करण्यापर्यंत मजल गेली व मौका लावण्याचाही प्रयत्न केला गेला यामुळे मला त्यांचा राग नाही कीव येते त्यांची इतकी केविलवाणी परिस्थिती झाली की राष्ट्रवादीत गेले मंत्री होणार पण साधे आमदार होतानाही आले असाही टोलाआ गिरीश महाजन यांनी यावेळी लगावला.पत्रकारांशी संवाद साधताना आमदार गिरीश महाजन म्हणाले की त्याची परिस्थिती किती केविलवाणी  झाले की मतदारसंघात…

Read More

प्रतिनिधी (प्रविण पाटील) सकाळी ४:.३०वाजता या परिसरात विजांच्या गडगडासह जोरदार झालेल्या पावसामुळे जळके विद्युत उपकेंद्राचा विज पुरवठा खंडीत झाला आहे.त्यामुळे या विद्युत उपकेंद्राअंतर्गत येणारे जळके, वसंतवाडी,विटनेर,वराड,सुभाषवाडी व लोणवाडी येथील विजपुरवठा बंद आहे तरी सकाळी ९वाजेपासुन महावितरण कंपनीचे विद्युत कर्मचारी शिवाजी काळे, दिनेश पाटील व अमोल भगत हे झालेला बिघाड शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.या कर्मचाऱ्यांना वनविभागाच्या हद्दीतील खांबावर काही पिनांची तुटफुट झालेली आढळून आली त्यांनी त्या पिना बदलल्या देखील मात्र तरीही विजपुरवठा सुरळीत झाला नाही हे कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत मात्र नेमका बिघाड झाला कोठे हे समजु शकले नाही.त्यामुळे या विद्युत उपकेंद्राचा विज पुरवठा सुरळीत होण्यासाठी विलंब…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: 2 ऑक्टोंबर शनिवार  रोजी महात्मा गांधी,व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री  यांच्या जयंतीनिमित्त भाजपा जिल्हा महानगर तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर च्या वतीने 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोंबर पर्यंत सेवा समर्पण अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून उद्या दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी  माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री याची जयंती निमित्ताने सकाळी ८ वाजता महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळयाला माल्यार्पण करण्यात येईल फुले मार्केट परीसर येथे स्वछता अभियानाची सुरवात  ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजु मामा) महानगर जिल्हाध्यक्ष  दिपक सुर्यवंशी,स्थायी सभापती राजेंद्र घुगे पाटील, गटनेते भगत बालाणी व पदाधिकारी यांच्या उपस्थित सुरवात करण्यात येईल…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव तालुक्यातील 20 महिलांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत प्रत्येकी 20 हजार याप्रमाणे 4 लाख  रुपयांच्या मदतीचे धनादेश जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात आयोजित  कार्यक्रमात वाटप करण्यात आले. राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतंर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियांना 20 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. त्यानुसार आज  तालुक्यातील 20 महिलांना प्रत्येकी 20 हजार रुपये याप्रमाणे एकूण 4 लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. या अर्थसहाय्यतून मुलांच्या शैक्षणिक व आवश्यक बाबींवर खर्च करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी उपस्थित महिलांना केले.असे आहेत पात्र लाभार्थीदापोरा…

Read More

प्रतिनिधी(लक्ष्मण पाटील) धरणगाव येथील पारधी वस्ती मधील अवैध दारु विक्री बंद व्हावी या मागणीसाठी पोलीस स्थानकात गेलेल्या नागरिकांनी पोलिसांनी त्यांच्या मागणीची दखल न घेतल्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे उपस्थित नागरिकांनी रात्री एकच्या सुमारास रस्ता रोको केल्याची घटना घडली. याबाबत वृत्त असे की, काल रात्री एक वाजेच्या सुमारास धरणगाव पोलीस स्टेशनच्या समोर महिला व नागरिक पारधी वाडा मधल्या महिला व पुरुष यांनी आपल्या भागातील अवैध दारू विक्री संदर्भात धरणगाव पोलीस स्टेशनकडे तक्रार देण्यासाठी आलेले होते.पोलीस स्टेशन मधील कर्मचार्‍यांनी त्यांची कोणतीही दखल न घेता सकाळी बघू असे सांगत याबाबत टाळाटाळ केली. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शहरातून जाणार्‍या मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडत ‘रस्ता रोको’…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:  महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 2 ऑक्टोबर शनिवारी सायंकाळी पाच वाजता देशव्यापी सार्वजनिक  ऑनलाईन आत्मसाक्षात्कार कार्यक्रम 17 भाषांमध्ये विनामूल्यआयोजित केलेला आहेहा कार्यक्रम sahajayoga.org.in/live याच्यावर पाहू शकाल व लर्निंग सहयोग जगा यूट्यूब चैनल वर लाईव्ह प्रसारित होणार आहे.कार्यक्रमाची पाच सत्रांमध्ये विभागणीकार्यक्रम पाच सत्रांमध्ये विभागला गेलेला आहे सकाळी नऊ ते दहा या वेळामध्ये संस्कृत, आणि उर्दू भाषेत होईल , हिंदी, तेलगू, तमिल, आणि गुजराती या भाषेत दहा ते अकरा या वेळेत प्रसारित होईल, अकरा ते बारा बंगाला, कन्नड मल्यालम, अस्मि या भाषेत प्रसारित होणार आहे. 12 ते 1 मराठी, पंजाबी, भोजपुरी, उडिया या भाषांमध्ये प्रसारित होणार…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:- शिवसेना ही बंडखोर संघटना आहे, घरातून ,कुटुंबातून ,पोलिसांकडून आणि इतर प्रस्थापित पक्षांकडून शिवसेना त्या काळात कशी संपेल असा सगळा प्रयत्न झाला. शिवसेनेचा एकही सरपंच, जि.प. व पं.स सदस्य किंवा आमदार की खासदार नसतानाही शिवसेना जिवंत ठेवली ती केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचारांनी.शिवसेनेला संपविण्याची वल्गना करणार्‍यांचे जनतेने गर्वहरण केले. मुक्ताईनगर तालुक्यात 30 च्या रात्री ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात आमदार चंद्रकांत पाटील यांनी सर्वांनी पुन्हा सक्रीय होण्याची साद घातली. मुक्ताईनगर शहरातील जुन्या काळात अतिशय खस्ता खाऊन शिवसेनेची ज्योत कायम तेवत ठेवणार्‍या जेष्ठ शिवसैनिकांची महत्वपूर्ण बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शिवनेरी या निवासस्थानी काल रात्री ८ वाजेच्या सुमारास मोठ्या…

Read More