लाईव्ह महाराष्ट्र: जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावातील तितुर नदीत पोहायला गेलेल्या दोन संख्या भावाचा बुडून मृत्यू झाला असून दुसरी घटना जामनेर तालुक्यातील जांभूळ गावामधील आई वडील बाहेरगावी गेले असता खेळता खेळता शेतातील केटी वेअर बाधाऱ्यात तोल गेल्याने बुडून मृत्यू झाला.ऐन अनंत चतुर्दशीच्या दिवशी चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावात दुर्दैवी घटना घडली आहे.तितूर नदीत पोहायला गेलेल्या दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.वाघळी गावालगतच्या कमलेश्वर के.टी वेअर बंधाऱ्या जवळ ही घटना घडली आहे.साहिल शहा शरीफ शहा फकीर आणि आयन शहा शरीफ शहा फकीर हे दोघे भाऊ तितूर नदीत पोहण्यासाठी गेले होते.नदीत पोहत असतांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी: शहरातील रस्ते बनवण्यासाठी ‘माझी किडनी विका आणि रस्ते तयार करा’, याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील सर्वच रस्त्यांमध्ये खड्डे झालेले आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार राजूमामा भोळे यांनी चांगले रस्ते बनिवण्याचे आश्वासन देवून निवडणूकीत निवडून आले त्यानंतर २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक झाली परंतू अद्यापपर्यंत जळगाव चांगले रस्ते झालेच नाही. याबाबत महानगरपालिकेच्या प्रशासनाची लोकप्रतिनिधींशी मिलीभगत असून नगरसेवक कोणत्या ना कोणत्या कारणाने वरून महानगरपालिकेच्या कामांचा ठेका घेतात पण रस्त्यांचे कामे होत नाही. याबाबत वारंवार विचारना केली असता महापालिका प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात.…
लाईव्ह महाराष्ट्र: पाळधी दूरक्षेत्र हद्दीमधील एरंडोल तालुक्यातील सावदे प्र.चा. शिवारातुन दोन कट्टे , दोन काडतुसे व दोन मोटारसायकल जप्त करीत पाळधी पोलिसांनी ४ आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. यापैकी एक आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे.नाशिक परिक्षेत्रचे पोलीस उपमहानिरीक्षक बी.जी.शेखर याच्या आदेशनव्ये गेल्या एक महिन्यापासून जळगाव जिल्ह्यात अवैध धंदे करणारे तसेच अवैध रित्या अग्नीशस्त्र बाळगणारे तसेच अमलीपदार्थाची तस्करी करणारे यांचे विरुद्ध कार्यवाही करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यात कारवाई सुरू आहे.पाळधी दुरक्षेत्र स.पो.नि. गणेश बी, बुवा यांना मिळालेल्या गुप्तबातमीचे आधारे सपोनि गणेश बुवा,सहा.फौज.नसिम तडवी, पोहेकॉ विजय चौधरी, पोहेकी संजय महाजन, पोहेको अरुण निकुंभ, पोहेको गजानन महाजन…
प्रतिनिधी प्रवीण पाटील : जळके येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक मध्ये उद्या सकाळी 8.30 वाजेला नागरिकांसाठी कोरोनालसीकरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.जळके जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा येथे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सकाळी ८:३०वाजता लसीकरण सुरु होणार आहे. लसीकरण केंद्रावर २५०डोस उपलब्ध होतील ते सर्व प्रथम लसीकरणासाठी असल्याची माहिती आरोग्य सेवक पिंजारी यांनी दिली. यासाठी जळके ग्रामपंचायत सरपंच सुमनबाई मोरे, उपसरपंच ज्ञानेश्वर महाराज जळकेकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे सहकार्य असणार आहे तरी जळके , वसंतवाडी, तांडा येथील नागरिकांनी या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे यासाठी आपले आधार कार्ड तसेच मोबाईल नंबर आवश्यक आहे या लसीकरण केंद्रावर जळके आरोग्य उपकेंद्र सी…
पाचोरा प्रतिनिधी: आपल्या मुलास भ्रमणध्वनीद्वारे माहिती देत पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खु” येथील ५७ वर्षीय पित्याने राहत्या घरात गळफास घेऊन आमहत्या केल्याची घटना १९ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुर्यकांत नाईक व पोलिस नाईक नरेंद्र नरवाडे हे करत आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खु” येथील रहिवाशी ईश्वर भिकन गोसावी (वय – ५७) हे शेतमजुरी करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होते. १८ रोजी पत्नी व दोन मुले तारखेडा येथे मामाच्या घरी गेले होते. ईश्वर…
प्रतिनिधी( प्रवीण पाटील) : पोषण अभियानाच्या अंमलबजावणीसाठी समाजाचा पोषण अभियान कार्यक्रमात सक्रिय सहभाग असणे अत्यावश्यक आहे जेणेकरून अंगणवाडी सेवा लाभार्थ्यांना पर्यंत प्रभावीपणे पोहचविता येतील सदर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सन 2018पासुन प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण आहार महीना म्हणून देशपातळीवर साजरा करण्यात येतो.त्याचे आज 18 रोजी राष्ट्रीय पोषण आहार महिना निमित्त वावडदा बिटच्यावतिने आयोजित पोषण आहार कार्यक्रम संपन्न झाला.अंगणवाडी व मराठी शाळा येथे केंद्र शासनाच्या सुपोषित भारत(कुपोषण मुक्त भारत)या संकल्पनेवर आधारीत शासनाच्या विविध विभागांमध्ये अभिसरण पद्धतीने पोषण अभियान कार्यक्रम देश पातळीवर राबविण्यात येत आहे.याचाच एक भाग म्हणून आपल्या जळगाव तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पातील वावड्या बिट पर्यवेक्षिका अर्चना धानोरे …
लाईव्ह महाराष्ट्र : पारोळा तालुक्यात वाढत्या घरफोड्या पाहता स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला जेरबंद करण्यासाठी तपास केला असता एका लॉड्री मध्ये कपड्याना प्रेस करणारा निघाला त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.पारोळा तालुक्यात वाढत असलेल्या घरफोडीचे प्रमाण पाहता घरफोडी करणारे आरोपीतांचा शोध घेवून घरफोडीची गुन्हे उघडकीस आणणे करीता स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि बकाले यांनी पथक स्थापन केले. हे पथक हे सुमारे १ महिन्या पासून पारोळा तालुक्यात शोध घेत असताना पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या बातमी वरुन पंचायत समिती पारोळा चे बाजुला असलेली रुद्र लॉड्री मध्ये कपडे प्रेस करणारा कपील दिलीप वाघ, रा.पेंढारपुरा पारोळा हा गावात प्रेस करीता कपडे ने…
धरणगाव प्रतिनिधी : पष्टाणे बु।। येथील या गावाच्या मानाचा गणपती आरती जिल्हापरिषद सदस्य गोपाल बापू चौधरी याच्या हस्ते झाली आरती नंतर सर्व गाव संघटित राहून गावाचा विकास करावा असे गोपाल चौधरी यांनी सांगितले.गणपतीची आरती नंतर गणपती बाप्पा चा जयघोष करण्यात आला, त्या ठिकाणी चहा पाण्याचा कार्यक्रम करण्यात आला, गावाने संघटित राहून आपला विकास करावा.गावात ऐकोपा कायम राहावा नाकी सण उत्सव याच्या पुरता मर्यादित राहू नये यातून आपल्या गावाची प्रगती साधता येईल असे बापू चौधरी म्हणाले त्याप्रसंगी गणपती मंडळाचे युवक शुभम ठाकरे,केतन ठाकरे(पप्पु राजे) ललित ठाकरे, गौरव ठाकरे, जयेश ठाकरे,अजय पा, विशाल ठाकरे,किरण जाधव,हर्षल पा,वाल्मिक जाधव,मच्छिंद्र मराठे व गावातील मा,सरपंच…
जळगाव ;- जिल्ह्यातील सात वैद्यकीय अधिकार्यांच्या बदल्या झाल्या असून याचे आदेश आरोग्य खात्यातर्फे पारीत करण्यात आले आहेत. आरोग्य विभागातर्फे महाराष्ट्रातील गट-अ या संवर्गातील २८० वैद्यकीय अधिकार्यांच्या बदलीचे आदेश पारित झाले. यात जळगाव जिल्ह्यातील सात अधिकार्यांचा समावेश आहे. सहा बदल्या या जिल्ह्यात तर एकाची बदली जिल्ह्याबाहेर करण्यात आली आहे. यामध्ये येवती (ता. बोदवड) प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अजय सपकाळ यांची धामणगाव येथे, साकळी (ता. यावल) येथील डॉ. सागर पाटील यांची चोपडा उपजिल्हा रुग्णालयात, उंबरखेड (ता. चाळीसगाव) येथील डॉ. विशाल पाटील यांची जळगाव जिल्हा क्षयरोग केंद्र येथे, मुक्ताईनगर येथील डॉ. नीलेश पाटील यांची मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात, रावेर येथील डॉ. एन. डी. महाजन…
जळगाव ;- वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आज (शनिवार) सायंकाळी 5 वाजेपासून धरणातून 200 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहून सावधानता बाळगावी. असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग यांनी केले आहे.

