लाईव्ह महाराष्ट्र: जळगाव महानगर पालिका अंतर्गत काम करणा-या आशा-स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना कोवीड-19 प्रोत्साहन भत्ता पूर्ववत सुरू करण्यात यावा, नवीन आशा स्वयंसेविका यांना त्वरीत प्रशिक्षण देऊन 5 महिन्यांचे थकित मोबदला ईतर थकबाकी स्तवर आशांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात यावी.आशा आशयाचे निवेदन मनपा आयुक्त, महापौर, याना देण्यात आले.
जळगाव महानगर पालीकेत आरोग्य विभागात आशा वर्कर्स व गट प्रवर्तक म्हणून काम करणाऱ्या महिलांना कोवीड १९, अंतर्गत शासनाने देय असतिल प्रोत्साहन भत्ता शासनाने बंद केले आहे तसेच नवीन आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण देणे अनिवार्य असतांना प्रशिक्षण दिले नाही व प्रशिक्षण अभावी सर्व आशांना त्यांना मिळणाऱ्या कामाच्या मोबदला मानधन, नाकारले आहे.महानगर पालिका अंतर्गत काम करणा-या आशा-स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना कोवीड-19 प्रोत्साहन भत्ता पूर्ववत सुरू करण्यात यावा, नवीन आशा स्वयंसेविका यांना त्वरीत प्रशिक्षण देऊन 5 महिन्यांचे थकित मोबदला ईतर थकबाकी स्तवर आशांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात यावी.
जळगाव महानगर पालीका प्रशासन जोपर्यंत नवीन आशांना प्रशिक्षण देत नाही त्यांना कामाचा थकीत मोबदला मानधन देत नाही तोपर्यंत सर्व आशांनी कोवीड-१९ शी संबंधातील सर्व कामे बंद करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. नवीन आशांना त्वरीत प्रशिक्षण दयावे, शासनाने बंद केलेला प्रोत्साहन भत्ता सत्वर सूरू करण्यात यावा, व सर्व आशांना सत्वर
प्रशिक्षण देऊन त्यांना रितसर कोवीड-१९ प्रोत्साहन भत्ता थकीत मोबदला व इतर देयके सत्वर अदा व्हावे असे निवेदन आज कॉ. प्रविण चौधरी, कॉ.विजय पवार, कॉ.प्रतिभा काळे, कॉ.बबिता बाविस्कर अन्य उपस्थित .म.न.पा आयुक्त ,महापौर,
.म.न.पा. प्रमुख वैदयकीय अधिकारी, जळगाव महानगरपालिका याना देण्यात आले.