Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आज दुपारच्या सुमारास रावेर तालुक्यातील  विवरे खुर्द येथे विजेच्या धक्क्याने एका २५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिची दोन वर्षांची मुलगी जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत वृत्त असे की, आज दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडात पावसाला सुरुवात झाली रावेर तालुक्यातील  विवरे खुर्द शेती शिवार मध्ये राजू पाटील यांच्या शेतात मजूरी करणारे वागले कुटुंब मजूरी करत होते.अचानक वातावरणात प्रचंड बदल होऊन विजा कडकड्याला लागले व  मयत मुर्खी इडा वागले (वय २५) हीच्यावर विज पडून तिचा जागेच मृत्यु झाला तर तिच्या दोन वर्षीय रवीना किरकोळ जखमी झाली आहे.यामुळे वागले कुटुंबावर नैसर्गिक संकट कोसळलेले असून हातमजूरी करणारी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज (प्रवीण पाटील) तालुक्यातील वसंतवाडी  येथील नागरिकांसाठी  ग्रामपंचायत मध्ये उद्या सकाळी८:३०वाजेला  कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रम आयोजीत केला आहे.यासाठी नागरिकांनी आपल्या कागदपत्र सह उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.वसंतवाडी ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना आजाराच्या पाश्र्वभूमीवर सकाळी ८:३०वाजेपासुन लसीकरणला सुरुवात होणार आहे .लसीकरण केंद्रावर २५०डोस उपलब्ध होतील ते सर्व लस प्रथम डोस वाल्यानसाठी असतील अशी माहिती आरोग्य विभाग आरोग्य सेवक पिंजारी यांनी दिली हे लसीकरण यशस्वी होण्यासाठी वसंतवाडी ग्रामपंचायत सरपंच  वत्सलाबाई पाटील, उपसरपंच ईश्वर चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रयत्नशील राहतील. तरी आपल्या वसंतवाडीतांडा गाव व जळके येथील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे यासाठी प्रत्येकाने…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: बाभोरी पुलावर दूचाकीने टँकरला ओव्हरटेक करताना आई व मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास घडली यात एक महिला जखमी झाली आहे.एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालय परिसरातील रहिवाशी चारुशीला राहुल पाटील , त्यांचा मुलगा निशांत राहुल पाटील आणि चारुशीला पाटील यांची बहीण रुपाली पाटील हे तिघे एम एच १९ – डी.क्यू – ३८९६ या क्रमांकाच्या ऍक्टिव्हा दुचाकीवरून एरंडोलहून जळगावला आई -वडिलांनकडे येत होते पुढे चालत असलेल्या टँकरला ओव्हरटेक करताना तोल जाऊन ते पडले आणि चारुशीला पाटील ( वय ४० ) व निशांत पाटील ( वय १२ ) हे दोघे आई व मुलगा टँकरच्या मागच्या…

Read More

खा संजय राऊत याचे नाव न घेता लगावला टोलालाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवसेनेचे खासदार ही विनोद वीरान सारखे बॅटिंग करीत आहेत त्यांना सांगायचे आहे की महाभारतात संजय बघितलं रंगभूमीचे युद्ध दिसत होते आणि ते निर्णय घेण्यात मात्र या संख्यांना फक्त वसुलीचा दृष्टांत पडते जमिनीचा विसर पडला आहे असा टोला आज खा संजय राऊत याचे नाव न घेता  प्रसार माध्यमांशी बोलताना  आमदार सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.जळगाव जिल्हा परिषदेला पंचायत राज कमिटी तीन दिवसीय दौऱ्यावर आलेली आहे यातील कमिटी सदस्य आमदार सदाभाऊ खोत हे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की महाविकासआघाडी मध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा विदुषकी चाळे करण्यात बरीचशी मंडळी दिसत आहे अलीकडच्या काळामध्ये…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील तडवी कॉलनी परिसरातून अज्ञात चोरट्याने मध्यरात्री घरात प्रवेश करत कपाटातील ६७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्ताक रसुल तडवी (वय-५५) रा. तडवी कॉलनी रावेर हे खाजगी नोकरीला आहेत. २४ सप्टेंबर रोजी रात्री ११ ते २५ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजेच्या दरम्यान सगळेजण घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने घरात शिरून घरातील लोखंडी कपाटातील सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ६७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी मुस्ताक रसुल तडवी यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चाळीसगाव परिसरात  पावसाने २५ च्या रात्री  जोरदार हजेरी लावली त्यामुळे पुन्हा  कन्नड घाटामध्ये  दरड कोसळली आहे. दरम्यान या घाटामधून कोणीही प्रवास करू नये, असे आवाहन महामार्ग पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.काल रात्री चाळीसगाव परिसरासह इतर अन्य भागांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे डोंगर भागातील तितुर व डोंगरी नदीला मोठा पूर आला आहे. दरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे कन्नड घाटामध्ये दरड कोसळून रस्ता खचला होता. त्यामुळे काही दिवसांसाठी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. जिल्हाप्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून व पाहणी करून दुचाकी, हलक्या व छोट्या वाहनांच्या वाहतुकीसाठी हा घाट खुला केला होता. अवजड वाहनांना अजूनही हा घाट…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: दलित वस्ती विकास कामांची इ-निविदा प्रक्रियेत अनियमितता केली म्हणून रावेर तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना  व ग्रामसेवकांवर ठपका ठेवत सरपंचांना अपात्र करण्याची आणि ग्रामसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटिसा प्राप्त झाल्याची माहिती आहे. यामुळे चांगलीच खळबड उडाली आहे.जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य नंदकिशोर महाजन यांनी तालुक्यातील दलित वस्ती सुधार योजनेच्या इ -निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याची तक्रार केली होती. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती नेमण्यातजामतीतील आली होती. त्या समिती मध्ये तालुक्यात झालेल्या अनुसूचित जाती  नवबौद्ध घटकांच्या वस्तीमधील विकास कार्यक्रमांतर्गत इ-निविदांमध्ये अनियमिततेबाबत चौकशीकेली गेली होती. या समितीचा…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्राधान्य कुटूंब योजनेत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्याने रेशनकार्ड उपलब्ध करुन देणेसाठी नियोजनबध्द कार्यक्रम राबविण्याचे निर्देश  ना. छगन भुजबळ यांनी आज दिलेत. येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात ना छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, वैधमापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक बी. जी. जाधव, जिल्हा मार्केटींग अधिकारी एन. डी. मगरे, विभागीय आयुक्त कार्यालयातील तहसीलदार साहेबराव शिंदे, वैधमापनशास्त्र विभागाचे निरिक्षक सी. डी. पालीवाल, रविंद्रभैय्या पाटील आदि उपस्थित होते. यावेळी बोलतांना मंत्री भुजबळ म्हणाले की, अंत्योदय योजनेत…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे त्याचे स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी ओबीसी पदाधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनराव भुजबळ हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता त्याचे आज जळगावात स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, जिल्हाध्यक्ष एडवोकेट रवींद्र भैय्या पाटील, राष्ट्रवादी काँगेस जिल्हाउपाध्यक्ष पंकज महाजन, यांनी सत्कार केले.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे सायंकाळी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता पारोळ्यात त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी चे पदाधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनराव भुजबळ हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता त्याचे आज सायंकाळी पारोळा येथे स्वागत करताना महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक व विभागीय अध्यक्ष संजय मुरलीधर पवार, जिल्हाध्यक्ष एडवोकेट रवींद्र भैय्या पाटील जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अण्णासाहेब डॉक्टर सतीश भास्करराव पाटील जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची युती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील यांनी सत्कार करून केले.

Read More