लाईव्ह महाराष्ट्र : चाळीसगाव तालुक्यातील बेलदार वाडी शिवारातील झटका देवी वस्ती बेलदारवाडी जवळ नाल्यामध्ये कोणीतरी अज्ञात पालकांनी एक नवजात पुरुष जातीचे अर्भक उघड्यावर टाकून पलायन केल्याची घटना 13 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात क्रूर माता व पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.
याबाबत माहिती अशी बेलदार वाडी तालुक्यातील बेलदारवाडी शिवारातील झटका देवी वस्ती बेलदारवाडी जवळ नाल्यामध्ये एक नवजात पुरुष जातीचे अर्भक उघड्यावर पडले असल्याची माहिती पोलीस पाटील सोमनाथ कुमावत यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिल्यावर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे तसेच सहाय्यक तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री धरमसिंग सुंदरडे, महिला पोलीस कर्मचारी श्रीमती मालती बच्छाव, चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ राजेश लाटे, 108 चालक अशोक राठोड, विनोद चव्हाण घटनास्थळी जाऊन त्यांनी कायदेशीर कार्यवाही करून मिळून आलेले नवजात पुरुष जातीच्या अर्भकास 108 एम्बुलेंस च्या साह्याने औषधोपचार कामी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करून त्याचे प्राण वाचवले तसेच नवजात अर्भकास गरम कपडे दूध बॉटल आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करून दिल्या असून सदर बालकावर औषधोपचार सुरू आहे. अज्ञात पालका विरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.