लाईव्ह महाराष्ट्र: धरणगाव तालुक्यातील मुख्य रस्ता हा खड्डेमय झाला आहे तरी याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने काँग्रेस च्या वतीने आज सार्वजनिक बांधकाम विभागात निवेदन देण्यासाठी गेले असता सहाय्यक अभियंता उपस्थित नसल्याने खुर्चीला हार घालीत असताना उपस्थित कर्मचाऱ्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना अरेरावी केल्याने तू तू मै मै हूँ पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला . धरणगाव शहरातून उड्डाणपूल यापासून ते चोपडा रस्त्या पर्यंतच्या मुख्य रस्ता हा खड्डेमय आहे की खड्ड्यात रस्ता आहे असे कोडे शहरवासीयांना व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना प्रश्न पडलेला आहेत या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नेहमीच अपघात होऊन वाहनचालकांना आपला जीव गमवावा लागत आहे शुद्ध सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
टीम लाईव्ह महाराष्ट्र: शासकीय योजनेचा लाभ मिळत नसल्याने ती पुन्हा सुरू करण्यासाठी व तहसीलदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी आलेल्या धरणगाव तालुक्यातील मौजे पिपळे गावाचा अंध रायसिग व वृद्ध आत्या आल्यावर त्याची चौकशी केली असता गाण्याच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करीत आहे हे समजताच तहसीलदार यांनी गणपती समोर भक्ती गीते सादर केली . त्याला तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांनी पैश्यानी मदत करून त्याच बरोबर महिन्या भरचा किराणा सुद्धा देऊन सरकारी वाहनातून घरी पोहचविले धरणगाव तालुक्यातील मौजे पिंपळे येथे एकनाथ दुर्गा रायसिंग व त्याची आत्या जनाबाई हे राहतात .एकनाथ हा 100% अंध आहे.ते दोन्ही आज धरणगाव तहसिल कार्यलयात शासकीय योजनेचा लाभ मिळत नसल्याची कैफियत घेऊन आले…
जळगाव प्रतिनिधी : एक व्यक्ती गावठी बनावटीचे पिस्तूल घेवून फिरणाऱ्या तरूणाला पोलीसांनी पाठलाग करून वाल्मिक नगरातून दुपारी अटक केली आहे. त्याच्याकडील गावठी पिस्तूल हस्तगत केली असून त्याच्या विरुद्ध शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राकेश उर्फ लिंबू राक्या चंद्रकांत साळुंखे (वय-२६) रा. कांचन नगर हा तरूण वाल्मिक नगरातील बगीचाच्या परिसरात गावठी बनवटीचे पिस्तूल घेवून दहशत माजवित असल्याची माहिती मिळाली. शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोहेकॉ परिष जाधव, राहूल पाटील, अमोल विसपूते, प्रमोद पाटील, शरद पाटील यांनी दुपारी ३ वाजता संशयित आरोपी लिंबू राक्याचा वाल्मिक नगर भागातील बगीचाजवळ पाठलाग करून अटक केली. त्यांच्या ताब्यातील चार हजार…
जळगाव प्रतिनिधी: शहरातील पांझरपोळ परिसरात राहणाऱ्या तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दिनेश कमलाकर ठाकूर(22) हा आपल्या आई कल्पनाबाई यांच्यासह राहतो. तो एमआयडीसीतील स्टार फेब्रिकेटरमध्ये कामाला आहे. मोठा विवाहित भाऊ गोपाल हा पत्नीसह धुळे येथे राहतो. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून त्याचा मुतखडाचा आजार जडला होता. काल बुधवारी १५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मित्र गावाहून येत आहे त्याला भेटण्यासाठी जातो असे आईला सांगून घराबाहेर पडला होता. रात्री उशीरापर्यंत घरी आला नव्हता. सकाळी त्याचा मित्राला काशीबाई कोल्हे महाविद्यालयाजवळी…
लाईव्ह महाराष्ट्र : केंद्र सरकारने संमत केलेल्या तीन कृषी कायद्यांना रद्द करण्यात यावे या मागणीसाठी आज येथे किसान मोर्चातर्फे धरणगाव शहरातून रॅली काढून याच्या विरोधात निवेदन देण्यात आले.याबाबत वृत्त असे की, आज किसान मोर्चाच्या पदाधिकार्यांनी धरणगाव शहरातून मोर्चा काढला. यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी संमत केलेल्या तीन कृषी कायद्यांना रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबत शेतकर्यांच्या कृषी उत्पादनांना किमान हमी रक्कम इतका भाव मिळावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, नवीन शैक्षणिक धोरण अंमलात आणावे, देशभरातील निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर टाळून आधीप्रमाणेत मतपत्रिकेने निवडणुका घेण्यात याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.याप्रसंगी राष्ट्रीय किसान मोर्चाचे शहराध्यक्ष…
लाईव्ह महाराष्ट्र : धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथील गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू वाहतूक थांबवावी अशी मागणी एका निवेदनातून जिल्हाधिकारी, प्रातधिकरी,याच्या कडे मागणी केली आहे . धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथील गिरणा नदीपात्रातून व ग्रामपंचातय गावठाण जागेतून रात्री बे रात्री चोरी करुन वाळू वाहतूक करुन वाळू वाहतूकीचे वाहने चालवतात त्यामुळेग्रामस्थ,वयोवृध्द,लहान मुले स्त्रीया यांना खुप त्रास होतो.आम्ही गावातील लोकांना सोबत घेवून वाळू वाहतूक अडविण्याचा प्रयत्न केला असता ते ट्रक्टर अंगावर आणण्याचा प्रयत्न करतात व दादागीरी करुन पळून जातात. तसेच दिवसा व रात्री -बेरात्री गावातून सुसाट बेगान रेतीचे वाहन पळवतात त्यामुळे गावातील नागरीक व महिला खुप धाबरतात लहान मुलांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही…
भाजपच्या चाळीसगाव शहराध्यक्षांचा खळबळजनक आरोप, लाईव्ह महाराष्ट्र ; 2019च्या विधानसभा निवडणूकीत भाजपाने मंगेश चव्हाण यांना उमेदवारी दिली होती मात्र भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी मित्रत्वाला तडा देत आमदार चव्हाण यांच्या पराभवासाठी अनेक षडयंत्रे रचली असा खळबळजनक आणि खुला आरोप भाजपाचे चाळीसगाव शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांनी खासदार उन्मेष पाटील यांना लिहीलेल्या पत्रात केला आहे. सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल झाले आहे. पक्षात आजपर्यंत जी गटबाजी लपून होती किंवा फक्त चर्चेत होती ती आपण उघड केली असा आरोपही घृष्णेश्वर पाटील यांनी केला आहे. भाजपा शहराध्यक्षांकडूनच झालेल्या या आरोपबाजीमुळे खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांच्यातील पक्षांतर्गत अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे बोलले…
लाईव्ह महाराष्ट्र : चाळीसगाव तालुक्यातील खरजई गावात एका व्यक्तीजवळ गावठी पिस्तुल सह जिवंत कडतुस असे 20 हजार 500 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर दोन जणांविरुद्ध चाळीसगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.चाळीसगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांचे पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सपोनि दीपक बिरारी दीपक पाटील तुकाराम चव्हाण अमोल पाटील अमोल भोसले निलेश पाटील अशोक मोरे गणेश कुवर शरद पाटील या पथकाने चाळीसगाव तालुक्यातील खरजई गावातील कृषी केंद्र जवळ दीपक गणेश एरंडे (वय 23) याला ताब्यात घेतले असता. दीपक रँडच्या अंगझडती मधून एक गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत कडतुस सापडली त्याला ताब्यात घेऊन चाळीसगाव पोलिसात दीपक एरंडे…
अमळनेर प्रतिनिधी : तालुक्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक जयपाल हिरे याचा धरणगाव येथील प्रदेश तेली महासंघ युवक आघाडी जिल्हाध्यक्ष तर कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील पंढरीनाथ चौधरी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे चौधरी व इतर मान्यवर यांनी अमळनेर येथे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या कार्याचा गौरव म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची राज्याभिषेक फ्रेम देवून (12 सप्टेंबर) अमळनेर पोलिस निरीक्षक यांचा सत्कार करण्यात आला. अमळनेर तालुक्याचे नव्याने आलेले पोलीस निरीक्षक जयपाल हिरे एक कर्तव्यदक्ष अधिकारी तर गुन्हेगारांवर करडी नजर ठेवणारे म्हणून त्यांची ख्याती आहे. तर या आधी धरणगाव तालुक्यात देखील जयपाल हिरे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. म्हणूनच त्यांच्या कामाची…
लाईव्ह महाराष्ट्र : आत्महत्येचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर चर्चेत आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे याची बदली झाली असून त्याची बदली जळगाव येथे झाली आहे जळगाव येथे संजय गांधी निराधार योजनेचा पदभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गेल्या महिन्यात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमुळे पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे चर्चेत आल्या होत्या. क्लीपमध्ये लोकप्रतिनिधींच्या व्यापमुळे आत्महत्या करण्याचा उल्लेख असल्याने राज्यात खळबळ उडाली होती. क्लीपमध्ये कुणाचाही उल्लेख नसला तरी तो रोख आमदार निलेश लंके यांच्या दिशेने असल्याचे बोलले जाते. क्लीप प्रकारानंतर विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी ज्योती देवरे यांच्याविरुद्ध लोकायुक्त मुंबई यांच्याकडे भ्रष्टाचाराची तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती अँड.असीम सरोदे यांनी दिली. तक्रारदार राहुल…

