Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी: जिल्हा पेठ पोलिसात नवरात्र उत्सव मंडळाच्या पदाधिकारी याची बैठक झाली यावेळी शासनाने दिलेल्या गाईड लाईन नुसार उत्सव पार पाडवा याबद्दल माहिती देण्यात आली.आज दिनांक 5 रोजी 11:15 ते 11.45 वाजे दरम्यान जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, जळगाव येथे नवरात्र उत्सव 2021 संदर्भात पोस्ट हद्दीतील दुर्गा देवी मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची सहाय्यक पोलीस अधीक्षक, कुमार चिंता उपविभाग, जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेण्यात आली. सदर मिटिंग मध्ये महाराष्ट्र शासन गृहविभाग यांचेकडून नवरात्र उत्सव 2021 बाबत covid-19 च्या अनुषंगाने देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. सदर मिटिंग आम्ही तसेच नवदुर्गा मित्र मंडळाचे 20 ते 25 पदाधिकारी यांची…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:  मुक्ताईनगर येथील नगरपंचायतीचे पाणी पुरवठा मुकादम भगवान वंजारी यांना नगरसेविकेचे पती बापू ससाणे यांनी धक्काबुक्की करत धमकावल्याने खळबळ उडाली असून कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. पूर्णा नदीला पूर आल्यामुळे पाणीपुरवठा मुक्ताईनगर मध्ये आणि अनियमित होत आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ८ मध्ये पाणी पुरवठा दोन तास उशिराने झाला. याच कारणाचा राग येऊन नगरसेविका  साधना ससाणे  यांचे पती बापू ससाने यांनी पाणीपुरवठा मुकादम भगवान वंजारी याना नगरपंचायत कार्यालय मध्ये येऊन धक्काबुक्की केली. आपल्या प्रभागात आता पाणी सोडल्यास हात पाय तोडून टाकेल अशी धमकी दिली. विशेष म्हणजे ही घटना पाणीपुरवठा अभियंते सोनवणे यांच्या समोर घडली.त्यामुळे सर्व पाणीपुरवठा कर्मचार्‍यांनी एकत्रित…

Read More

गट शिक्षणाधिकारी यांची शाळेला सदिच्छा भेट !धरणगांव प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेत दीड वर्षानंतर शाळेत किलबिलाट ऐकू आली त्यानंतर शाळेची  घंटा  वाजली शाळेत येणाऱ्या मुलांसाठी  रांगोळ्या घाण्यात आल्या होत्या याच्यासह विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले. तब्बल दीड वर्षानंतर शाळेची घंटा वाजली. त्यामुळे आज शाळेत दिवाळी दसरा प्रमाणे  शाळेला तोरण बांधुन सजावट करण्यात आली. शालेय परिसरात गेटसमोर रांगोळी काढण्यात आली. शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका . पी.आर. सोनवणे मॅडम, पर्यवेक्षक जे.एस.पवार व संपुर्ण स्टॉफ यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.सर्वप्रथम शाळेचे सेवक अशोक पाटील यांनी विद्यार्थ्यांचे हात  सॅनटाईझ केले. यानंतर क्रिडाशिक्षक हेमंत माळी…

Read More

धरणगांव प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात शासनाच्या आदेशानुसार कोरोना नियमांचे काटेकोर पणे पालन करून 4 रोजी सोमवार सकाळी ११:३० वाजता मोठया उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाच्या पहिल्या दिवसी ३२४ विद्यार्थी (३५%) विद्यार्थी यांनी उपस्थितीदिली. विद्यार्थ्यांवर पुष्प वर्षाव तसेच गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पालक रविंद्र धनगर सपत्निक हजर होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरूणजी कुळकर्णी, उपाध्यक्ष व्ही. टी. गालापूरे सर, संस्थेचे सचिव डॉ. मिलिंदजी डहाळे, संस्थेचे आदर्श संचालक अजयजी पगारीया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एस. बिराजदार यांनी शुभेच्छा दिल्या.संचालक अजयशेठ पगारीया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: धरणगाव येथील योगिता हॉटेल जवळ झालेल्या कार व मोटारसायकलच्या अपघातात होळ येथील लक्झरी ड्रायव्हर छोटूलाल आधार पाटील (वय – ४७) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.याबाबत सविस्तर माहिती अशी की, MH 19 AX 0890 या क्रमांकाच्या इंडिका व्हिष्टा या कारने MH 19 F 2283 क्रमांकाची 4 S कावासाकी या मोटारसायकल ची समोरासमोर धडक झाली. या अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या छोटूलाल पाटील यांना ग्रामीण रुग्णालय धरणगाव येथे आणले असता येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीष चौधरी यांनी तपासणी करून मृत घोषित केले. या अपघातात कार व मोटारसायकल यांचे जास्त नुकसान झालेले नाही परंतु एका व्यक्तीच्या जीव मात्र गेला.या घटनेचा पुढील तपास…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: धरणगाव येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये आज इयत्ता ८ वी ते १० वी चे वर्ग सुरू झाले. शाळेच्या पहिल्या दिवशी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व विद्यार्थ्यांचे स्वागत करून पहिल्या दिवसाची उत्साहात सुरवात झाली.याबाबत सविस्तर वृत्त असे की, शासन निर्देशांचे पालन करून शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या. यानुसार आज गुड शेपर्ड स्कुल धरणगाव येथे शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात उत्साहात झाली. सर्वप्रथम शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे पूर्व प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:- जामनेर तालुक्यातील तळेगाव आणि गाडेगाव परिसरातील हातभट्टींवर आज पोलीस निरिक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापे टाकून तब्बल २ लाख ७४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील तळेगाव व गाडेगाव या गावाच्या परिसरात अवैध हातभट्टी दारू बनवत असल्याची तक्रार नागरिकांनी पोलिसांना केली होती त्याआधारे  पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालीसहाय्यक फौजदार संजय पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल रमेश कुमावत, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घुगे, तुषार पाटील, रामदास कुमार यांच्या पथकाने जितेंद्र नथु कोळी व प्रकाश नथु कोळी राहणार तळेगाव या दोघांना ताब्यात घेतले असता यांच्याकडे १४० लिटर हातभट्टी दारू किंमत दहा हजार रुपये व दोन…

Read More

मी ईडीला घाबरत नाही. मी फक्त कोर्टाला घाबरतो, खडसे लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी चार्जशीट दाखल झाल्यामुळे आता ईडीचा विषय संपला आहे मी फक्त कोर्टाला घाबरतो असल्याचे सांगत  माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजप च्या नेत्यावर  जोरदार हल्लाबोल केला आहे. तुम्ही छळतात म्हणून मी पर्याय निवडला माझ्याकडे अनेक पर्याय होते परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश घेतला आणि माझा पक्ष माझ्या पाठीमागे भक्कम पणे उभा आहे गिरीश भाऊ म्हणतात ना करा चौकशी घाबरू नका   चौकशी सुरू आहे असेही खडसे म्हणाले कार्यकर्त्यांनी सीडी बद्दल विचारले असता पोलीस चौकशी करत आहेत त्यांना त्यांचा वेळ घेऊ द्या  माझ्या कडे अली होती सीडी…

Read More

जळगाव प्रतिनिधी: शहरातील रस्ते अमृत योजनेमुळे  खड्डेमय झाले होते त्यात पुन्हा भूमिगत गटारीचे कामे सुरू आहे त्यात पावसाळा सुरू असल्याने रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे रेल्वे प्रशासनाला निवेदन देऊनही ही कामे होत नसल्याने आज आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महानगरपालिकेसमोर झोपा काढा आंदोलन करण्यात आले .शहरामध्ये जवळपास दोन ते तीन वर्षापासून रस्त्यांचे तसेच भूमिगत गटारीचे काम सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांची पूर्णत: वाताहात झालेली आहे. त्यातच ऐन पावसाच्या दिवसामध्ये तर जनतेला खराब रस्त्यांमुळे नरक यातना सहन कराव्या  लागत आहेत. याबाबत आम्ही आपणांकडे निवेदने दिले असता तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वेळोवेळी आंदोलने करून सुध्दा हे प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्र प्रदेश बाराबलुतेदार महासंघाच्या जळगाव शाखेतर्फे जळगाव जिल्ह्यातील नवनिर्वाचित बाराबलुतेदार समाज घटकातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व नगरसेवक यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र प्रदेश बाराबलुतेदार महासंघाच्या जळगाव येथील बलुतेदार महासंघ जळगाव जिल्हा व महानगर जळगाव आयोजित जिल्ह्यातील नवनिर्वाचित भारत बाराबलुतेदार समाज घटकातील ग्रामपंचायत सदस्य व नगरसेवक यांचा नुकताच सत्कार करण्यात आला यावेळी सोनवद ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य सुकलाल कुंभार यांचाही मानचिन्ह देऊन जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे महापौर जयश्री जयश्री महाजन व बाराबलुतेदार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

Read More