लाईव्ह महाराष्ट्र: धरणगाव तालुक्यातील मुख्य रस्ता हा खड्डेमय झाला आहे तरी याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने काँग्रेस च्या वतीने आज सार्वजनिक बांधकाम विभागात निवेदन देण्यासाठी गेले असता सहाय्यक अभियंता उपस्थित नसल्याने खुर्चीला हार घालीत असताना उपस्थित कर्मचाऱ्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना अरेरावी केल्याने तू तू मै मै हूँ पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला .
धरणगाव शहरातून उड्डाणपूल यापासून ते चोपडा रस्त्या पर्यंतच्या मुख्य रस्ता हा खड्डेमय आहे की खड्ड्यात रस्ता आहे असे कोडे शहरवासीयांना व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना प्रश्न पडलेला आहेत या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नेहमीच अपघात होऊन वाहनचालकांना आपला जीव गमवावा लागत आहे शुद्ध सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात आज गुरुवार रोजी धरणगाव तालुका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयास निवेदन देण्यासाठी गेले असता कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता एम.बी.ठाकूर हे हजर नसल्याने कार्यकर्त्यांनी सहायक अभियंता यांच्या खुर्चीला पुष्पहार घालून गांधीगिरी केली.
प्रसंगी कॉंग्रेस पदाधिकारी खुर्चीला पुष्पहार अर्पण करीत असतांना त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांशी हुज्जत घालत पदाधिकार्यांना अरे – रावी केल्याने पदाधिकार्यांनी संताप व्यक्त केला.
मुख्य रस्ता खड्डेमय झालेला आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने झोपेचे सोंग घेतले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुजोर अधिकारी हे कार्यालयात थांबतच नाहीत आपले कर्तव्य ते बहावत नाहीत. त्यांनी घरी बसून बायका – पोरं सांभाळावीत असा सल्ला गोपाल पाटील यांनी यावेळी दिला.
प्रसंगी कॉंग्रेस पदाधिकारी पत्रकारांना प्रतिक्रिया देत असतांना स्थापत्य अभियंता पवार यांनी पदाधिकाऱ्यांचे फोटो काढून कॉंग्रेस पदाधिकार्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पवार हे स्वतः कार्यालयात १२ वाजता येवून अरे रावी केल्याने कॉंग्रेस पदाधिकारी यांनी यावेळी संताप व्यक्त केला.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अश्या निष्क्रिय अधिकार्यांमुळे आघाडी सरकारचे नाव बदनाम होत असून अश्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्याकडे करणार असल्याची माहिती तालुका उपाध्यक्ष चंदन पाटील यांनी दिली.
येत्या तीन दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजले नाहीत तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असं इशारा यावेळी कॉंग्रेस तर्फे देण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस रामचंद्र माळी, विकास लांबोळे, गोपाल पाटील, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल मराठे, योगेश येवले आदि कार्यकर्ते उपस्थित होते.