लाईव्ह महाराष्ट्र : धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथील गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू वाहतूक थांबवावी अशी मागणी एका निवेदनातून जिल्हाधिकारी, प्रातधिकरी,याच्या कडे मागणी केली आहे .
धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथील गिरणा नदीपात्रातून व ग्रामपंचातय गावठाण जागेतून रात्री बे रात्री चोरी करुन वाळू वाहतूक करुन वाळू वाहतूकीचे वाहने चालवतात त्यामुळे
ग्रामस्थ,वयोवृध्द,लहान मुले स्त्रीया यांना खुप त्रास होतो.आम्ही गावातील लोकांना सोबत घेवून वाळू वाहतूक अडविण्याचा प्रयत्न केला असता ते ट्रक्टर अंगावर आणण्याचा प्रयत्न करतात व दादागीरी करुन पळून जातात.
तसेच दिवसा व रात्री -बेरात्री गावातून सुसाट बेगान रेतीचे वाहन पळवतात त्यामुळे गावातील नागरीक व महिला खुप धाबरतात लहान मुलांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही सरपंच, ग्रामसेवक,व ग्रामस्थ यांनी सदर चोरटी वाळू वाहतुक बंद करण्यासाठी खुप प्रयत्न केले तरी चोरटी वाळू वाहतूक थांबत नाही.
त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त मिळावा जेणे करुन चोरटी वाळू वाहतूकीला आला बसेल व ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होणार नाही.अशा आशयाचे निवेदन सरपंच यांनी लेखी निवेदन म.प्रांताधिकारी,जिल्हाधिकारी, धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक याना दिले आहे.