धरणगाव लक्ष्मण पाटील: सोनवद रस्त्यावरील स्मशानभूमीतील बंद खोलीत दारूच्या बाटल्या, झोपण्यासाठी गादी आणि कंडोमची पाकिटं आढळून आल्यानंतर या ठिकाणी वासनाकांड घडलंय का?, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर गावात प्रचंड खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता पालिका प्रशासनने संबधित मक्तेदाराला नोटीस बजावली कायदेशीर गुन्हा दाखल करणार आहे. या संदर्भात अधिक असे की, सोनवद रोडवरील स्मशाभभूमीत एका खोलीत दारूच्या बाटल्या, गादी, ताट, तांब्या, कंडोमचे पाकिट, तेलाचे डबे, ग्लास, एका पिशवीत कांदे, इतर पदार्थ आणि काही दुचाकी गांड्या नंबर प्लेट आढळून आल्या होत्या.मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेत ज्या मक्तेदाराकडे या स्मशानभूमीच्या देखरेखीचे काम दिले होते. त्या मक्तेदाराला १६ तारखेला नोटीस दिली…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात जिल्ह्यातील मतदारांशी संपर्क साधला असता मतदार संतती ही एकतर्फी निवडणूक आहे शंभर टक्के मते सहकार कडलक मिळतील असे चित्र संपूर्ण जिल्ह्यात निर्माण झाले असल्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी जळगाव येथे सहकार पॅनलच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना म्हणाले.जळगाव येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात आज सहकार पॅनल चा मेळावा झाला यावेळी मार्गदर्शन करताना माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर म्हणाले की जास्त वेळ घेणार नाही मंडळी बोर झालेली दिसते यावर हास्य पिकले पंधरा दिवसापासून वातावरण बघत आहेत सहकार पॅनल मध्ये सर्व उमेदवार हे अनुभवी उमेदवार आहे सहकार क्षेत्र असो कृषी क्षेत्र असो वा स्थानिक स्वराज्य क्षेत्र असो…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : आपल्या घरातील मंगल कार्याची पहिली पत्रीका ही कुलदैवतेच्या गाभार्यात ठेवली जाते हे आपणा सर्वांना माहित आहेच. याच प्रमाणे आपला पक्ष हेच आपले कुळ आणि याचे संस्थापक अर्थात, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच कुलदैवत असे मानणारे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपले चिरंजीव विक्रम यांच्या विवाहाची पहिली पत्रीका ही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर अर्पण करून आपली अनोखी दैवतनिष्ठा दाखवून दिली आहे.राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव विक्रम यांचा विवाह २९ नोव्हेंबर २०२१ रोजी पाळधी (ता. धरणगाव) येथे संपन्न होत…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या 9 व्या स्मृतिदिनानिमित्त काव्यरत्नावली चौक जळगाव येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन युवासेनेतर्फे करण्यात आले होते. शिबीराचे उद्घाटन बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण करून रक्तदान शिबीराला सुरूवात झाली. शिबीराला प्रथम रक्तदाते म्हणून गुणवंत सोनवणे यांनी रक्तदान केले. यानंतर एकूण 118 नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून बाळासाहेंबांना अभिवादन केले. यावेळी महापौर जयश्री महाजन व माजी महापौर नितिन लढ्ढा यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी महानगरप्रमुख शरद तायडे, जिल्हापरिषद सदस्य प्रताप पटील, युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवासेना विस्तारक किशोर भोसले, युवासेना जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, महिला आघाडी महानगर प्रमुख शोभा चौधरी, नगरसेवक…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मानवी सेवेत ताकद असल्याने समाजातील वंचित घटकांच्या मदतीसाठी प्रत्येकाने नेहमीच मदतीचा हात दिला पाहिजे. सामाजिक कार्याने प्रेरित संघटनेने दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्य वितरणाचा कार्यक्रम अनुकरणीय आणि कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी केले.चाळीसगाव जि. जळगाव येथे आज सायंकाळी वर्धमान धाडीवाल मित्र मंडळातर्फे दिव्यांग बांधवांना विविध साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दिव्यांग संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षी निकम, अनिल चौधरी, सामाजिक कार्यकर्ते वर्धमान धाडीवाल आदी उपस्थित होते.राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले, समाजातील वंचित, दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शहरातील विविध ठिकाणी विना परवानगी बॅनर लावल्याप्रकरणी दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. यात नऊ जणांविरुध्द मनपातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुबचंद साहित्या यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यासाठी मनपा अधिकारी धजावत नव्हते. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते दिपक गुप्ता यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी रात्री खुबचंद साहित्या यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.शहरातील विविध रस्त्यांवर विना परवानगी बॅनर लावण्यात आले होते. या बॅनर विरुध्द मनपाच्या अतिक्रमण पथकाकडून कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमण पथकातील लिपिक युवराज भानुदास नारखेडे यांचे फिर्यादी वरून महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा कलम ३,७ अनव्ये जिल्हापेठ पो.स्टे येथे अवैध बॅनर लावणारे चेतन किशोर…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: दहावी पास असणाऱ्या उमेदवारांनासाठी बीएसएफमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन सुरु झाली आहेत.बीएसएफ कॉन्स्टेबल भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे . केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सीमा सुरक्षा दल (BSF) ने इंजिनीअरिंग सेटअपमध्ये एएसआय, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, पगार, वयोमर्यादा, अनुभव यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. बीएसएफने प्रसिद्ध केलेल्या (ग्रुप पीसी/२०२१) जाहिरातीनुसार, एकूण ७२ पदांची भरती केली जाणार आहे. यापैकी ३२ पदे अनारक्षित आहेत, तर उर्वरित ४० पदे इडब्ल्यूएस,…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावळ शहरातील चितोळे वाणी मंगल कार्यालयासमोर गावठी कट्ट्यासह एकाला एलसीबीने अटक केली आहे. याप्रकरणी भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, भुसावळ शहरातील वाणी मंगल कार्यालय परिसरात संशयित आरोपी खूशाल उर्फ बंटी गजानन बोरसे (वय-२५) रा. खडका रोड रामदास वाडी भुसावळ हा तरूण बेकायदेशीर रित्या गावठी बनावटीचे कट्टा घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना मिळाली. मिळालेल्या माहिती नुसार सपोनि जालिदर पळे, सहाय्यक फैाजदार अशोक महाजन, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, संदीप साळवे, पोना किशोर राठोड, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, पोकॉ. विनोद पाटील, पोकॉ ईश्वर पाटील, विजय चौधरी हे…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहराचा विकास वाढला असला तरी आजवर महिला स्वच्छतागृहांची शहरात वानवा राहिली आहे. निधी फाऊंडेशनतर्फे वैशाली विसपुते यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून शहरात महिला स्वच्छतागृहे साकारली जाणार आहेत. फुले मार्केट समोर महिला स्वच्छतागृहाची उभारणी झाल्यानंतर सागर पार्क मैदानावरील अत्याधुनिक आणि वातानुकूलित स्वच्छतागृहाचे सोमवारी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील आणि महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. प्रसंगी निधी फाऊंडेशनतर्फे मान्यवरांचे आभार मानण्यात आले.शहराचा विस्तार आणि लोकसंख्या गेल्या १० वर्षात कितीतरी पट वाढली असली तरी महिला स्वच्छतागृहांची मात्र वानवा आहे. निधी फाऊंडेशनकडून २०१५ पासून महिला स्वच्छतागृहांसाठी पाठपुरावा केला जात आहे. जळगावच्या बाजारपेठेत आल्यानंतर प्रसाधनगृह अभावी महिलांची मोठी कुचंबना होत होती.…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पाचोरा शहरातील सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी भैय्या भरत गायकवाड रा. पाचोरा याला १० वर्षे सश्रम कारावास आणि ३५ हजार रूपयांचा दंड जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. श्रीमती एस.एन .माने यांनी ठोठावला आहे.याबाबत माहिती अशी की, पाचोरा शहरातील एका भागात राहणारी ७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. ७ मार्च २०१८ रोजी दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास आरोपी भैय्या भरत गायकवाड (वय-२२) रा. पाचोरा या तरूणाने पिडीत मुलीला मोबाईलवर गेम खेळायला चल असे बोलून त्याच्या घरात नेले. त्याठिकाणी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

