Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊनही तहसीलदार, मुख्यधिकारी कारवाई करीत नसल्याने  17  रोजी गायरान बचाव मंचाच्या वतीने पशुधन पालक, शेतकरी,इत्यादीसह शासकिय गायरान जमिनीच्या बचावासाठी शांततेचा मार्गाने मूक मोर्चाचे आयोजन केलेले आहे. अतिक्रमण मोर्चानंतर २२ हजार नागरीकांच्या सह्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात येईल धरणगाव शहरातील अमळनेर रोड लगत असलेल्या गट नं.१२४८ व १२४८/१,१२४८/२ मधील गायरान जमीन ३ हेक्टर ५१ आर असून त्या जमिनीचा पूर्वापार पासून गायरान म्हणून वापर केला जात आहे.आणि संबंधित गट नंबर वरील सातबाऱ्यावर देखील गायरानसाठी आरक्षित म्हणून उल्लेख आहे.असे असताना देखील धरणगावातील काही समाजकंटकांनी मानवसेवा संकल्प प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेला हाताशी धरून संगनमताने…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पाचोरा तालुक्यातील सावखेडा बु” येथील ३५ वर्षाचा जवान नक्षलवाद्यांशी लढतांना शनिवारी मध्यरात्री पठाणकोट (पंजाब) येथे शहिद झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे सावखेडा बु”, सावखेडा खु”, वरखेडी, डांभुर्णी, मोंढाळे ता. भुसावळ सह परीसरात मोठी शोककळा पसरली असून सावखेडा गावी घटनेची माहिती मिळताच मोठा जनसमुदाय लोटला होता. वृद्ध आई वडील, दोन भावंडासह नातेवाईक व गावकऱ्यांनी एकच आक्रोश केला. शहिद जवानाचे पार्थीव सोमवारी पठाणकोट येथून विमानाने औरंगाबाद येथे आल्यानंतर तेथुन मिलट्रीच्या वाहनातून गावी आणल्यानंतर सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.पाचोरा शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सावखेडा बु” येथील जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी (वय – ३५) हा…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवाजीमहाराजांचे चरित्र महाराष्ट्राच्या घराघरात नेणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे दीनानाथ रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले गेल्या 60 वर्षा पासून शिवाजी महाराज यांचा इतिहास त्यांनी  राज्यात नव्हे तर सातासमुद्रापार नेले आहे  शिवाजी महाराज यांचे व्याख्यानांच्या आणि अन्य कामांच्या निमित्ताने देशा-परदेशात अखंड भ्रमंती सुरू असलेल्या बाबासाहेबांनी नुकतेच शंभराव्या वर्षांत पदार्पण केले होते. त्यानिमित्ताने त्यांच्या झालेल्या अनेक मुलाखतींमधून त्यांनी उत्साहाने दीड-दीड तास आपले मनोगत व्यक्त केले होते. २६ ऑक्टोबरला सकाळी ते उठले असता त्यांचा तोल गेला आणि त्यांच्या डोक्याला इजा झाली. त्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.तेथेही पहिले दोन दिवस ते व्यवस्थित बोलत…

Read More

वार्ताहर भाईदास पाटील: तालुक्यातील भवरखेडे येथे कायदेविषयक शिबिर उत्साहात संपन्न झाले. जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाने दिवाणी व फौजदारी न्यायालय धरणगाव व तालुका वकील संघ यांच्यातर्फे भवरखेडे येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धरणगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश एस. डी. सावरकर साहेब होते. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भवरखेडा येथे दिनांक १३/११/२०२१ रोजी सकाळी ११ वाजता सदर कार्यक्रम विठ्ठल मंदिर भवरखेडे बु. येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात धरणगाव न्यायालयाचे न्यायाधीश एस. डी. सावरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. तद्नंतर धरणगाव न्यायालयाचे न्यायाधीश सावरकर साहेब यांचा सत्कार गावचे सरपंच किरण पाटील यांच्या…

Read More

धरणगाव लक्ष्मण पाटील: इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या अवमान केल्याबद्दल त्रिपुरा सरकार तात्काळ बरखास्त करण्यात यावी व काल रोजी त्रिपुरा घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्रात अन्यत्र ठिकाणी काही समाजकंटकांनी जाळवपोळ केली, त्यासंदर्भात कठोर कार्यवाही करावी. या मागणीचे राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुकाध्यक्ष नगरभाई मोमीन यांच्या नेतृत्वाखाली धरणगाव पोलिस ठाण्यात व तहसिल मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे प्रदेश सदस्य आबासाहेब राजेंद्र वाघ यांनी पोलिस निरीक्षक शेळके साहेब व नायब तहसिलदार जे. पी. भट यांना निवेदन सादर प्रसंगी सांगितले की, उत्तरप्रदेशात वसीम रिजवी याने हजरत मोहम्मद पैगंबर व पवित्र कुराण संदर्भात टिप्पणी केल्याबद्दल मुस्लिम समाजाच्या भावना दुखावून…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील जि.प.प्राथमिक उर्दू शाळा क्रमांक  १चे शिक्षक मोसिन खान अजीज खान यांची खानदेश भूषण पुरस्कार व आदर्श शिक्षक पुरस्कार 2021″साठी निवड करण्यात आली, त्याबद्दल शिवसेना धरणगाव तर्फे त्यांच्या सन्मान व सत्कार करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील  आदिलशहा फारुकी या संस्थेतर्फे  यावर्षी दिला जाणारा खानदेश भूषण पुरस्कार व मौलाना अब्दुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय यांच्यातर्फे आदर्श शिक्षक 2021 साठी ह्या पुरस्कारासाठी  येथील जि.प.प्राथमिक उर्दू शाळा नंबर 1 चे शिक्षक मोहसीन खान अजीज खान यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तसेच शाळेत विविध सामाजिक, राष्ट्रीय उपक्रम राबविल्या बद्दल यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्याबद्दल त्यांचा शिवसेना धरणगाव तर्फे…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील अजिंठा हौसिंग सोसायटीत येथे काहीही कारण नसंताना एका महिलेला मारहाण करून तिच्या जवळील दुचाकी व मोबाईल जबरी हिसकावून मारहाण केल्याची घटना २७ ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी, दिपीका सत्यजीत सोनवणे (वय-२५) रा. अजिंठा हाऊंसिंग सोसायटी जळगाव हे कुटुंबियांसह राहतात. त्यांच्याकडे (एमएच १९ डीयू ४२८२) क्रमांकाची ज्यूपीटर दुचाकी आहे. २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता त्या त्यांच्या घरी असतांना संशयित आरोपी सत्यजीत रविंद्र सोनवणे रा. वाघ नगर याने विवाहितेला काहीही कारण नसतांना मारहाण करून तिच्या ताब्यातील ५० हजार रूपये किंमतीची दुचाकी व ३ हजाराचा मोबाईल…

Read More

जिल्हा परिषद , पंचायत समिती आरक्षण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँकेचे निवडणुक पार पडत नाही तोच मिनी विधानसभा निवडणुकीचे आरक्षण सोडत जाहीर होणार आहे यामुळे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्ता व नेता यांचे लक्ष मिनी विधानसभेकडे राहणार आहे यामिनी विधानसभेत गेल्या वेळेस भाजपाला काठावर बहुमत मिळाले होते त्यांनी काँग्रेसची काठी घेऊन आपले बहुमत सादर केले होते मात्र या वेळेस महाविकासआघाडी होणार की प्रत्येक पक्ष भविष्यातील विधानसभा व लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्या पक्षाची ताकद त्याची चाचपणी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे यात सर्व पक्षांची ताकद जरी लागणार असली तरी दोन नेत्यांचे कसब पणाला लागणार हे मात्र निश्चित आहे.मिनी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जळगाव शहरात घरगुती गॅसचा वापर गैर पध्दतीने वापर करत असल्याची गोपनिय माहिती पोलीसांनी मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन पथकाने शुक्रवारी १२ नोव्हेंबर रोजी शहरातील शाहू नगर आणि शनीपेठ परिसरात छापा टाकून एकुण ११ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकुण ११ लाख ५६ हजार ६६० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ, शनीपेठ आणि शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळे पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जळगाव शहरातील शाहू नगरातील शाहू नगर कॉम्लेक्स, ट्राफीक गार्डन परिसर आणि शनीपेठ परिसरात अवैधपणे घरगुती सिलिंडरमधून गॅस वाहनांमध्ये भरून दिले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावळ शहरातील खडका रोड भागांमध्ये पटे ल कॉलनीत अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडर मधून वाहनांमध्ये गॅस भरताना तीन जणांना अटक करण्यात आली असून त्या ठिकाणावरून एक लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला भुसावळ शहरातील खडका रोड भागातील पटेल कॉलनीत अवैधरीत्या घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस वाहनात भरला जात असल्याची माहिती नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक यांच्या पथकाला मिळाल्यानंतर पथकाने शुक्रवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास अचानक धाड टाकत दोन रीक्षा चालकांसह अवैधरीत्या रीफिलिंग करणार्‍याच्या मुसक्या आवळल्या. नऊ सिलिंडरसह दोन रीक्षा व अन्य मुद्देमाल मिळून एक लाख सात हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात…

Read More