लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: सावखेडा बुद्रूक, ता. पाचोरा येथील वीरजवान मंगलसिंह जयसिंह परदेशी यांच्या कुटुंबीयांची जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट घेवून सांत्वन केले. जवान मंगलसिंह परदेशी यांना 14 नोव्हेंबर, 2021 रोजी पठाणकोट येथे कर्तव्यावर असताना छातीत गोळी लागल्याने वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर 16 नोव्हेंबर, 2021 रोजी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आज पालकमंत्री श्री. पाटील यांनी सावखेडा येथे जावून परदेशी कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी परदेशी कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली. तसेच नियमाप्रमाणे मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे सांगितले. यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी वीरजवान मंगलसिंग परदेशी यांचे आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा-मुलगी…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्यातील ११३ नगरपंचायतींसाठी ३० नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर होणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्तांनी जाहीर केले असून यात जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीचा समावेश आहे. राज्यभरातील ११३ नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २३ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. ३० नोव्हेंबर २०२१ रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने एप्रिल २०२० ते मे २०२१ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या ८८, डिसेंबर २०२१ मध्ये मुदत समाप्त होणार्या १८ आणि ७…
नांदेड (वृत्तसंस्था) मुंबई एनसीबीने नांदेड-हैदराबाद मार्गावर गुप्त माहितीच्या आधारे मंजराम (तालुका – नायगाव) येथे तब्बल ११२७ किलोग्रॅम गांजा जप्त केला होता. याप्रकरणी गांजा तस्करी प्रकरणातील संशयित आरोपींना आज बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. १५ नोव्हेंबरला नायगाव तालुक्यातील मांजरम येथे मुंबई एनसीबीने एका ट्रकमधून ११ क्विंटल २७ किलो गांजा जप्त करत ट्रक चालक गोपू राजपूत (गोणबाची, पैठण) तर सुनिल महाजन (जळगाव) या दोन संशयित आरोपींना अटक केली होती. त्यावेळेस न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आज कोठडीतील मुदत संपल्याने संशयित आरोपींना बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दाेघांना…
धरणगाव( लक्ष्मण पाटील) सोनवद रस्त्यावरील स्मशानभूमीतील बंद खोलीत दारूच्या बाटल्या, झोपण्यासाठी गादी आणि कंडोमची पाकिटं आढळून आल्यानंतर या ठिकाणी वासनाकांड घडलंय का?, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर गावात प्रचंड खळबळ उडाली होती. याप्रकरणी आज पालिका प्रशासनने ती खोली बंद केली आहे. या संदर्भात अधिक असे की, सोनवद रोडवरील स्मशाभभूमीत एका खोलीत दारूच्या बाटल्या, गादी, ताट, तांब्या, कंडोमचे पाकिट, तेलाचे डबे, ग्लास, एका पिशवीत कांदे, इतर पदार्थ आणि काही दुचाकी गांड्या नंबर प्लेट आढळून आल्या होत्या. मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी या प्रकरणाची गंभीर घेत आज त्या खोलीचा अखेर आज दरवाजे बंद करण्यात आले आहे. या स्मशानभूमीच्या देखरेखीचे काम दिले होते. त्या मक्तेदाराला…
धरणगाव लक्ष्मण पाटील:- धरणगाव शिवसेनेतर्फे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत तथा हिंदुरुदय सम्राट मा.वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख मा.गुलाबरावजी वाघ यांनी मा.बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी भूतकाळातील काही घटनांना आज उजाळा देत आपल्या भावनांना वाट मोकळी केली,या प्रसंगी सांगताना ते म्हणाले की माझ्या आयुष्यात आज मी जे सर्वकाही आहे ते वंदनीय बाळासाहेबांमुळेच आहे. तसेच माझ्या आयुष्यात त्यांना भेटण्याचे बरेचसे प्रसंग आले परंतु एक प्रसंग असा होता की ते अगदी माझ्या जवळ म्हणजे मांडीला मांडी लावून बसले होते आणि त्यांचा हात माझ्या पाठीवर असताना मला जो अभिमान वाटत होता त्याला मी आज पोरका झालो आहे. असे…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: घरकुल घोटाळा प्रकरणी पाच वर्ष माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना इच्छा झाली असल्याने जिल्हा बँक निवडणुकीत त्यांना मज्जाव करण्यात यावा या मागणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दाखल याचिकेच्या सुनावणीसाठी पुढील 22 नोव्हेंबर तारीख देण्यात आली आहे यामुळे देवकर यांना दिलासा मिळाला असून जिल्हा बँक निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक २१ नोव्हेंबर रोजी होत असून यात महाविकास आघाडीच्या वतीने माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र गुलाबराव देवकर यांना जळगाव येथील बहुचर्चीत घरकूल घोटाळ्यात न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना पाच वर्षे शिक्षा आणि…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महापालिकेतील भाजपची सत्ता गेल्यानंतर फुटीर गटाने आपलं गटनेता निवडलं व माहितीचा अधिकार मध्ये भाजपाचे गटनेते दुसऱ्याची निघाले यामुळे महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदाबाबत भगत बालाणी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील निकाल दोन आठवड्यांनी लांबला आहे. याबाबत वृत्त असे की, महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे गटनेते नेमके कोण ? याबाबतचा वाद न्यायालयात पोहचला आहे. महानगरपालिकेत भाजपकडून भगत बालाणी तर बंडखोरांकडून ऍड. दिलीप पोकळे यांची गटनेतापदी निवड करण्यात आली आहे. दोन्ही गटनेत्यांनी आपणच अधिकृत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कोणत्या गटनेत्याने सुचवलेले नाव स्थायी समितीसाठी ग्राह्य धरावे हा वाद सुरू आहे. हा वाद आता औरंगाबाद खंडपीठात सुरू आहे. याच खटल्याची बुधवारी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धुळे नंदुरबार विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात भाजपाकडून अमरिशभाई पटेल यांना मैदानात उतरवण्यात आले आहे विधान परिषदेच्या राजकीय घडामोडींना वेग जरी आला असला ही निवडणूक अमरीश भाई पटेल बिनविरोध होतात की त्यांना या निवडणुकीत कडवी झुंज द्यावे लागणारे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेधुळे नंदुरबार जिल्हा म्हटलं ती त्या ठिकाणी अमरीश भाई पटेल यांचे नाव सर्वात आधी येते ते ज्या पक्षात असतील त्या पक्षाचा वरचष्मा या दोन्ही जिल्ह्यात दिसून येतो विधानपरिषद निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर जरी कसली असली तरी भाजपने यात आघाडी घेतली आहे भाजपाने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी विद्यमान आमदार अमरिशभाई पटेल यांची उमेदवारी जाहीर केली आहे तर…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावळ शहरातील एका लॉन जवळ युवक अवैध शस्त्र बाळगणे फिरत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी मी एका 23 वर्षीय युवकाला गावठी कट्टा सह अटक केली याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.भुसावळ बाजारपेठ पोलिसांना एक युवक हिरा हॉल परिसरात गावठी कट्टा कमरेला लावून फिरत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठपोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश घायतल,एएसआय तस्लीम पठाण, सहा.फौजदार शरीफोदिन काझी, हवालदार मिलिंद कंक, सत्तार शेख, नाईक दीपक कापडणे, योगेश माळी, प्रणय पवार आदींच्या पथकाने संशयीत…
धरणगाव लक्ष्मण पाटील: येथील साकरे गावातील शेतकऱ्यांना महिंद्रा कंपनीच्या संकरित भेंडीच्या वाणाबद्दल कंपनीचे विभागीय व्यवस्थापक भगवान पाटील यांनी सखोल मार्गदर्शन केले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, महिंद्रा कंपनीच्या वतीने साकरे गावात प्रात्यक्षिक पिक पाहणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. सर्वप्रथम साकरे येथील भेंडीचे व्यापारी भाऊसाहेब पाटील यांच्या हस्ते शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्ञानेश्वर पाटील यांच्या शेतातील भेंडीची गुणवत्ता प्रत्यक्ष पहायला मिळाली. ज्ञानेश्वर पाटील यांनी महिंद्रा कंपनीच्या भेंडी पिकाविषयी त्यांचा अनुभव शेतकऱ्यांना सांगितलं. तद्नंतर महिंद्रा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक भगवान पाटील यांनी संकरित भेंडी कीर्ती पिकाबद्दल माहिती देतांना फवारणी तसेच खतांचे व्यवस्थापन याबद्दल सखोल माहिती दिली.…

