लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांचे सर्व सामान्य नागरीकांशी दबंगिरीने वागणूक देत आहे. पो.नि. धनवडे यांची तीन दिवसात बदली करावी, अशी मागणी शिवसेना युवा सेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याकडे करण्यात येत आहे. जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे वाद झाला होता वाद झाल्यानंतर दोन्हीकडील मंडळी पहुर स्थानकात आली होती स्थानिक वाद असल्याने युवा सेना चे पदाधिकारी अजय भोई दोघं मधील वाद मिटवण्याचा प्रयत्न करीत असताना पहुर स्थानकाचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी भोई यांच्या कानशिलात लगावली यामुळे आज युवा सेनेचे शिवराज पाटील व पदाधिकारी यांनी एसपी प्रवीण मुंडे यांना निवेदन देऊन त्यांची…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
नवी दिल्ली वृत्तसंस्था : सीबीआय आज(मंगळवार) लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ बनवून शेअर केल्याप्रकरणी देशातील 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 76 ठिकाणी छापे टाकत आहे. याप्रकरणी 14 नोव्हेंबर रोजी 83 आरोपींविरुद्ध 23 नामांकित एफआयआर नोंदवण्यात आल्याचेसीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी आता सीबीआयने कठोर पावले उचचली आहेत. सीबीआयने विविध ठिकाणी छापेमारी सुुरु केली आहे. आज सकाळपासून मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, ओडिसा, तामिळनाडू, राजस्थान, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेशमध्ये विविध ठिकाणी अनेक लोकांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील 3 मोठ्या शहरांमध्येही छापे टाकण्यात येत आहेत. सायबर पोर्नोग्राफीची सर्वाधिक प्रकरणे यूपीमध्ये2020 च्या NCRB…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जामनेर तालुक्यातील पाळधी शिवारातून १२ क्विंटल कापूस चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीसात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, रमेश दामू सुशिर (वय-६९) रा. पाळधी ता. जामनेर जि.जळगाव यांचे पाळधी शिवारात शेत आहे. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता गावातील भावलाल दामु सुशिर (वय-७१), परमेश्वर भावलाल सुशिर (वय-२७), ज्ञानेश्वर भावला सुशिर (वय-३२), दिलीप माधव सुशिर (वय-४५), संजय माधव सुशिर (वय-४३), राजेश माधव सुशिर (वय-४१) आणि बेबाबाई दिलीप सुशिर (वय-४१) रा. पाळधी यांनी शेतातून ८० हजार रूपये किंमतीचे १० ते १२ क्विंटल कापूस चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी रमेश दामू…
प्रतिनिधी प्रविण पाटील: तालुक्यातील विटनेर येथे सर आईसाठी गेलेल्या गुरांमधील गायीची शिकार बिबट्याने सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास केली यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तालुक्यातील विटनेर येथे वनविभागात चरण्यासाठी गेलेल्या गुरांमधुन बिबट्याने रविंद्र मुरलीधर नावडे यांच्या मालकीच्या गाईची शिकार केल्याचे संध्याकाळी ५च्या सुमारास लक्षात आले या घटनेमुळे या भागातील शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी याठिकाणी येऊन संबंधित घटनेची चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठववा व संबंधित गायमालकाला योग्य ती मदत करावी तसेच येथील शेतकरी तसेच ग्रामस्थ यांना आपले व आपल्या जनावरांचे कसं संरक्षण करावे यासाठी मार्गदर्शन करावे अशी चर्चा या भागातील नागरिकांनमध्ये…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्ह्यात जलग्रामोत्सव या नावाने प्रसिद्ध असलेले जळगाव नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची परंपरा असलेले श्रीराम मंदिर संस्थानतर्फे दरवर्षी रथोत्सव मोठया उत्साहात पार पडतो. यावर्षी रथोत्सवाचे हे १४९ वे वर्ष असून श्रीराम मंदिर संस्थानचे विश्वस्त गादीपती हभप मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता मंदिराच्या प्रांगणात श्रीराम रथाचे महापुजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्तिक प्रबोधिनी एकादशीनिमित्त जळगाव शहरातून रथोत्सवास मोठया उत्साहाने भक्तीभावाने करण्यात येते. त्यानुसार १५ नोव्हंेंबर कार्तिक शुद्ध एकादशी सोमवारी सकाळी ४ वाजता काकडआरती, प्रभूरामचंद्रांच्या मूर्तीस महाभिषेक, सकाळी ७ वाजता महाआरतीनंतर पंचपदी सांप्रदायिक भजनाने वातावरण मंत्रमुग्ध होउन गेले होते. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास मंदिराच्या प्रांगणात गादीपती…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: गर्भवती महिला दोन्ही नणंदा सह रस्त्यावर शतपावली करीत असताना दारूड्या दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत तिचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील वावडदा येथे घडली असून संबंधीत महिलेच्या कुटुंबियांनी दोषीवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोवर तिचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने तणावाचे वातावरण पसरले आहे. या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील वावडदा येथील ज्योती दीपक गोपाळ (वय २१) ही गर्भवती महिला आपल्या मीनी आणि दीपाली या दोन्ही नणंदांच्या सोबत वावडदा ते म्हसावद या रोडवर शतपावली करत होत्या. इतक्यात सुपडू विक्रम जाधव (रा. वावडदा, ता. जळगाव) हा दुचाकीस्वार भरधाव वेगाने आला. त्याने ज्योतीला मागील बाजूने जोरदार धडक देऊन तिला…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथील कापूस व्यापारी भावजयीच्या अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत घरातून ३ लाख ७० हजाराची रक्कम चोरट्यानी लंपास केली. या चोरीचा मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथील कापूस व्यापारी काशिनाथ गुजराती (वय-६२) यांच्या वाहिनीचे निधन झाल्याने ते त्यांच्या अंत्यविधीसाठी घोडसगाव येथे गेले होते. घोडसगाव येथे जाण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या घरातील कपाटात तीन लाख ७० हजार रुपयांची रक्कम ठेवून कपाटाची चावी एका पिशवीत ठेवली होती. अंत्यविधी आटोपल्यानंतर ते त्याच दिवशी दुपारी निमखेडीत परतले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी पैसे काढण्यासाठी कपाट उघडले, त्यावेळी त्यांना कपाटात ठेवलेले पैसे नसल्याचे दिसून आले होते. त्यांनी पत्नी…
धरणगाव लक्ष्मण पाटील । शहरापासून जवळ असलेल्या सोनवद रस्त्यावर असलेल्या स्मशानभूमीतील बंद खोलीत दारूच्या बाटल्या, झोपण्यासाठी गादी आणि कंडोमचे पाकिटे आढळले आहे. यामुळे धरणगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर माहिती अशी की, सोनवद रोडवर स्मशाभभूमी आहे. ही खोली नेहमी कुलूप लावून बंद असते. दरम्यान अंत्यसंस्कारासाठी काही वस्तू असतील म्हणून याकडे सर्वांचे दुर्लक्ष असते. दरम्यान आज सोमवारी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी अज्ञात व्यक्तीने खोलीचे कूलूप तोडले असता खोलीत दारूच्या बाटल्या, गादी, ताट, तांब्या, कंडोमचे पाकिट, तेलाचे डबे, ग्लास, एका पिशवीत कांदे, इतर पदार्थ आणि काही दुचाकी गांड्या नंबरे प्लेटा आढळल्या आहे. त्यामुळे हा प्रकार नेमका काय आहे याची माहिती अद्याप…
प्रतिनिधी प्रविण पाटील: तालुक्यातील म्हसावद ते जळगाव रेल्वे रुळावर 14 रोजी रात्री ११वाजेच्या सुमारास कुर्हाडदा गावाच्या जवळ असलेल्या रेल्वे पुलाजवळ खांबा क्रमांक ४०३/१०,११दरम्यान नाशिक मुंबई अपलाइनला एक अनोळखी व्यक्तीचा रेल्वे अपघात मृत्यू झाला आहे याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यू नोंद झाली आहे. म्हसावद ते जळगाव रेल्वे रुळावर कुर्हाडदा गावाच्या जवळ असलेल्या रेल्वे पुलाजवळ खांबा क्रमांक ४०३/१०,११दरम्यान अंदाजे ३०ते३५वर्ष असल्याचं सांगितलं जातं तसेच मयत व्यक्तीने काळ्या रंगाची पॅन्ट व चेक्सच शर्ट परिधान केलेले दिसते तसेच वर्ण निमगोरा आहे रेल्वे कर्मचारी यांनी कळविल्या नंतर आज २:२०च्या सुमारास औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशन जळगाव येथे अकस्मात मृत्यूची नोंद १३९/२०२१क्रमांकाने करण्यात आली आहे.सदर अपघातात मयताचे वय…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: दोन हजारांची लाच स्वीकारताना भुसावळ दुय्यम कारागृहातील तुरूंग रक्षक अनिल लोटन देवरे यांना जळगाव एसीबीच्या पथकाने सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. तक्रारदार यांच्या नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल आहे. ते भुसावळ येथील दुय्यम कारागृहात आहे त्यांना भेटण्यासाठी दुय्यम कारागृहातील तुरूंग रक्षक अनिल लोटन देवरेयांनी तीन हजारांची लाच मागितली होती मात्र दोन हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली व सापळा रचण्यात आला.सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास भुसावळ कारागृहात तक्रारदाराकडून देवरे यांनी दोन हजारांची लाच स्वीकारताच त्यांना पंचांसमक्ष अटक करण्यात आली. हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील व पोलीस…

