धरणगाव लक्ष्मण पाटील : सा.बां. विभागाने जळगाव – अमळनेर महामार्गावर लावलेल्या फलकांवर नजर टाकली असता असलेलं गाव आणि फलकांवर असलेलं नाव याचा ताळमेळ लागत नाही. यात अजून एक उच्चांक तो काय तर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या पुढे कोविड सेंटर कडे जो रस्ता जातोय तिथे चक्क ‘मेहरूण’ असे नाव पाहून माणूस चक्रावून जातो. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की, पिंप्री – धरणगाव रस्त्यावर गिरणा निम्न प्रकल्पा अंतर्गत पाटचारी आहे. या पाटचारी वरून जाणारा रस्ता सरळ न घेता चंद्रकोर प्रमाणे तिरकस घेण्यात आला आहे. नेमकं यामुळे रस्त्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी कदाचित बांधकाम विभाग प्रयत्न तर करत नाहीये अशी शंका मनात येते. त्याठिकाणी पाण्याचा…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 10 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात आहे यांच्यासाठी रविवारी आठ ते चार वाजेच्या दरम्यानजिल्हा बँकेसाठी रविवारी मतदान आठ ते चार वाजेच्या दरम्यान जिल्ह्यातील 15 ठिकाणी मतदान होणार आहे या 42 उमेदवारांची चे उद्या मतपेटीत जिल्हा बँकेत प्रवेश करण्याचे स्वप्न बंद होणार आहे. १० संचालकांसाठी ४२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्हा बँक संचालक मंडळाच्या १० संचालक पदांच्या ४२ उमेदवारांसाठी २१ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व १५ तालुकास्तरावर सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रकिया पार पडणार आहे. यात जळगाव येथे सु.ग.देवकर शाळा, भुसावळ म्युनसिपल हायस्कूल, यावल जि.प.मराठी मुलींची शाळा, कमलाबाई अगरवाल हायस्कूल रावेर, जे.ई.हायस्कूल मुक्ताईनगर, जि.प.मुलींची शाळा बोदवड,…
दिल्ली वृत्तसंस्था: 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने महिलेची हत्या करून थांबला नाही तर त्याने खून केल्यानंतर महिलेच्या प्रायव्हेट पार्टला त्याने आग लावली. पोलीस तपासात ही बाब समोर आली आहे. डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्याने महिलेचा खून केला, त्यानंतर तिचा मृतदेह मारुती व्हॅनमध्ये टाकून डाबरी परिसरात टाकण्यात आला. 15 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील डाबरी भागात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता, कोणाची तक्रार नसल्याने पोलिसांनी तपास सुरू केला होता या तपासात सीसीटीव्ही फुटेज तपासले असतात त्या अनोळखी महिलेची ओळख पटली सीसीटीव्हीमध्ये एक अल्पवयीन युवक व्हॅनमधून मधून मृतदेहाची विल्हेवाट लावताना दिसून आला तांत्रिक तपास दारे तो मुलगा त्या ठिकाणी असल्याचे लोकेशन हे…
रोज महाप्रसाद सेवेसाठी भव्य स्वयंपाक गृहाचे भूमिपूजन प्रतिनिधी प्रफुल्ल पाटील: भारतीय संस्कृतीमध्ये तुलसी विवाहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुलसी विवाहानंतर वधू- वरांच्या ब्रह्मगाठी विवाह सोहळ्यातून बांधल्या जातात. ही परंपरा टिकून राहावी, मंदिरात मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या विवाह इच्छुकांच्या इच्छापूर्तीसाठी परमेश्वराची विशेष आराधना करावी , या उद्देशाने मंगळग्रह सेवा संस्थेने श्री मंगळदेव ग्रह मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य प्रमाणात तुलसी विवाहाच्या महासोहळ्याची परंपरा सुरू केली आहे . गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे हा कार्यक्रम अत्यंत मर्यादित स्वरूपात होत होता. यावर्षी मात्र कोरोनाचा कहर बऱ्यापैकी ओसरल्याने हा विवाह महासोहळा भव्य प्रमाणात करण्यात आला . प्रारंभी वराच्या विषयातील श्रीकृष्णाच्या मूर्तीची सजवलेल्या रथात व श्री मंगळदेव ग्रहाची…
पाटणा वृत्तसंस्था: बिहारमध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आली आहे. अल्पवयीन प्रेम युगल एकांतात बसलेले पाहून काही नराधमांनी पोलिस असल्याचा बनाव करून त्यांचे फोटो काढून नंतर प प्रियकराला पोलीसओलीस ठेवून प्रियसीवर बलात्कार केलं दावा करण्यात येत आहे. 13 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या प्रियकरासह निर्जन ठिकाणी असताना तिच्यावर बलात्काराची ही लाजिरवाणी घटना घडली आहे. या प्रेमी युगुलाचा पाठलाग करणाऱ्या चार नराधमांनी पोलिस असल्याचं खोटं सांगून आधी दोघांचा फोटो काढला आणि नंतर प्रियकराला ओलिस करून प्रेयसीला घाबरवलं. त्यानंतर प्रियकराच्या समोरच प्रेयसीला झुडपात नेऊन एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे या घटने नंतर या गुन्हेगारांनी आपला मोबाईल क्रमांकही दिला. कोणतीच भीती बाळगू…
अ’ ब , वर्ग नगरपरिषदेसाठी-2 ने सदस्यसंख्येत वाढ तर क वर्ग नगर पालिकेच्या संख्येत 3 ने वाढ लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मुदती संपणाऱ्या व नवनिर्मित नगरपरिषदांच्या निवडणुकांकरिता प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्याबाबतचे आदेश आज जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले आहेत.अ’ ब , वर्ग नगरपरिषदेसाठी-2 ने सदस्यसंख्येत वाढ झाली असली तरी तर क वर्ग नगर पालिकेच्या संख्येत 3 ने वाढ केली आहे तर अ वर्ग नगर पालिकेत किमान सदस्य संख्या 40 असेल आणि 75 पेक्षा अधिक नसेल,व ब नगरपरिषदेसाठी किमान सदस्य संख्या 25 असेलआणि 37 पेक्षा अधिक नसेल ‘क’ वर्ग नगरपरिषदेसाठी किमान सदस्य संख्या 20 असेल आणि 25 पेक्षा अधिक नसेल. राज्यातील यापूर्वी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: केंद्र सरकाने तयार केलेले तीन कृषी कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी हे कायदे मागे घेत असल्याची जाहीर केल्याने लोकसंघर्ष मोर्चातर्फे फटाके फोडून व पेढे वाटून या स्वागत करत जल्लोष केला. हे कायदे रद्द करावेत; या मागणीसाठी देशात आंदेालन सूरू आहे. केंद्र शासनाकडून तीन कृषी शेतकरी कायदे लागू केले होते. मात्र याला शेतकरींसह विरोधी पक्षातील नेत्यांचा विरोध होता.हे कायदे रद्द करण्यासाठी गेल्या वर्षा भरापासून शेतकरींचे आंदोलन करीत आहे. अनेकांनी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला पाठींबा दिला होता. तीन कृषी कायदे अन्यायकारक असल्याने ते रद्द करावेत या मागणीसाठी झालेल्या आंदोलनता आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना प्राण गमवावा लागला होते. अखेर आज…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील हनुमान नगर परिसरातून बुलेट चोरी करणा-या दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,14 नोव्हेंबर रोजी शहरातील हनुमान नगर परिसरातून राजेंद्र नवल पाटील यांच्या मालकीची बुलेट चोरीला गेली होती. त्यानंतर 16 नोव्हेंबर रोजी याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर बुलेट चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, मिलिंद सोनवणे, रामकृष्ण पाटील, रमेश चौधरी, किशोर पाटील, सचिन पाटील, योगेश बारी यांनी शुभम उर्फ कोयता शेखर पाटील (19) रा. पंढरपूर नगर गोदावरी कॉलेज जवळ जळगाव,…
21 डिसेंबर रोजी होणार मतदान लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्ह्यातील निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या 162 ग्रामपंचायतीमधील 229 जागांसाठी पोटनिवडणुकींचा कार्यक्रम 17 नोव्हेंबर, 2021 रोजीच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. ग्रामपंचायतीतील रिक्त पदांच्या पोटनिवडणूक कार्यक्रम असा राहील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिध्द केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेच्या सुधारणा करण्याचा सोमवार 22 नोव्हेंबर 2021 पर्यंत राहील. तहसिलदार सोमवार, 22 नोव्हेंबर, 2021 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करतील, नमुना ‘अ’ मध्ये नमूद ठिकाणी 30 नोव्हेंबर 2021 (मंगळवार) …
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी घडली. हाणामारी सोडवत असतांना एका कैद्याने चक्क कारागृह पोलिस कर्मचार्याला कडाडून चावा घेतला. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की, जळगाव जिल्हा कारागृहात अमोल ऊर्फ कार्तिक नाना सोनवणे (मराठे) (वय-29 रा. खेडी ब्रुदूक ता. जळगाव) हा न्यायबंदी खुनाच्या गुन्ह्यात 1 ऑक्टोबर 2019 पासून बॅरेक नं.12 मध्ये दाखल आहे. गुरुवारी कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर हे कारागृह गस्त घालत होते.यावेळी कैदी अमोल सोनवणे हा त्याच्या बॅरेकच्या बाहेर निघुन त्याने बॅरेक 9 मध्ये जावुन टिव्ही लावला. यावेळी न्यायबंदी समाधान वाल्मीक शेवाळे याने…

