Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 10 जागांसाठी दुपारी 12 वाजेपर्यंत 53.5 टक्के मतदान झाले होते जिल्हा बँकेमध्ये मुख्यतः सहकार पॅनल व शेतकरी पॅनल यांच्यात लढत आहे सहकार पॅनल मध्ये शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचा समावेश आहे तर शेतकरी पॅनल मध्ये  भाजपा काँग्रेस व राष्ट्रवादीमधील बंडखोर या उमेदवारांचा समावेश आहे. जिल्हा बँकेच्या चार विविध कार्यकारी सोसायटी आणि पाच राखीव जागांसाठी आज मतदान होत आहे. यात ४२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. पंधरा तालुक्यांत मतदान केंद्र आहे. सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत मतदानाची वेळ आहे. एकूण दोन हजार ८५३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Read More

धरणगाव लक्ष्मण पाटील। तालुक्यातील साळवा येथील शिवारात गावठी हातभट्टील उध्दवस्त करून सुमारे ४५ हजार रूपये किंमतीचे रसायन नष्ट केले आहे. याप्रकरणी एकावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील साळवा शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून गावठी हातभट्टी सुरू असल्याची गोपनिय माहिती धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना शनिवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मिळाली. धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस पथकांने दुपारी ४ ते ५ वाजेच्या सुमारास साळवा शिवारात धडक कारवाई करत सुरू असलेली गावठी हातभट्टी उध्दवस्त केली. या कारवाईत सुमारे ४५ हजार रूपये किंमतीचे कच्चे व पक्के रसायन नष्ट करण्यात आले. संशयित…

Read More

चंदिगढ वृत्तसंस्था: हरियाणातील संपत येथे राहणाऱ्या पती-पत्नीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून वाद होत होते याच चरित्र संशयातून पतीने पत्नीवर तीस वार करून पत्नीचा खून केला याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरियाणातील सोनीपत शहरात तारानगर येथे पती शत्रुघ्न व पत्नी पूनम राहत होते. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचं त्याला वाटत होतं, यावरून त्यांच्यात वारंवार वादही व्हायचे. घटनेच्या दिवशीही याच संशयातून त्याने आधी पत्नीशी भांडण केले. त्यानंतर पूनमच्या अंगावर धारदार चाकूने जवळपास 30 वेळा वार केले. यामुळे पूनमचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सोनीपत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज वाढीव वीज बिल, वीज कनेक्शन तोडणे आणि एसटी कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत विलिनीकरण करण्यात यावे यासाठी महाराष्ट्र भरात बहुजन मुक्ती पार्टीतर्फे शहरातील नवीन बसस्थानकाच्या आवारात जेलभरो आंदोलन करण्यात आले. सविस्तर माहिती अशी की, महावितरण कंपनीने ग्राहकांना वाढीव वीज बिल देणे रीडिंग वेळेवर न घेणे, वाढीव वीज बिलापोटी लोकांचे वीज मीटर काढून घेणे, शेतकऱ्यांना रोहित्र जळाल्यानंतर महिना महिनाभर बसवून दिले जात नाही, तसेच या दिवाळीपासून महाराष्ट्रभरातील एसटी कर्मचारी खाजगीकरणाचा विरोध करून शासनात विलिनीकरणाची मागणी करत आहे. त्याप्रमाणे गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची आंदोलनाची कोणतेही सत्ताधारी पक्षाचे नेतेमंडळी दखल घेताना दिसत नाही. याउलट परिवहन मंत्री वेळोवेळी हायकोर्टाचा दाखला देत…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पोलीस भरतीला आलेल्या एका उमेदवाराने कॉपी करण्यासाठी माक्स चा उपयोग केला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिपाई पदासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथील न्यू इंग्लिश स्कूल केंद्रावर एका मैदानात कानात ज्वारीच्या दाणे एवढे ब्लूटूथ बसून मार्चमध्ये लपलेली होती हा सगळा प्रकार तपासणीत आडला मार्चमध्ये चिप पाहून पोलिसांनाही धक्का बसला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिपाई पदासाठी शुक्रवारी राज्यभरात परीक्षा पार पडल्या. एकूण 720 पदांसाठी राज्यभरातून 1 लाख 20 हजार उमेदवारांचे  अर्ज आले होते. या औरंगाबाद जिल्ह्यातील 80 केंद्रांवर 21 हजार उमेदवारांची सोय करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथील न्यू हायस्कूल केंद्रावरील एका उमेदवाराने अत्यंत हायटेक पद्धतीने कॉपी केल्याचे उघडकीस आले. एका उमेदवाराने…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: तालुक्यातील कुसुंबा गावाजवळील रायपूर फाट्याजवळ घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दोन जणांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावाजवळील रायपूर फाट्याजवळ असलेल्या एका पान टपरीमध्ये दोन जण घरगुती गॅसचा काळाबाजार करत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार शुक्रवार १९ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने सायंकाळी ७ वाजता छापा टाकला. यात ३ हजार ६२० रूपये किंमतीचे ४ भारत गॅस कंपनीचे सिलेंडर, ९०५ रूपये किंमतीचे रिकामे सिलेंडर, ७ हजाराचा इलेक्ट्रॉनिक काटा आणि १२ हजार रूपये किंमतीचे गॅस…

Read More

धरणगाव लक्ष्मण पाटील : सा.बां. विभागाने जळगाव – अमळनेर महामार्गावर लावलेल्या फलकांवर नजर टाकली असता असलेलं गाव आणि फलकांवर असलेलं नाव याचा ताळमेळ लागत नाही. यात अजून एक उच्चांक तो काय तर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या पुढे कोविड सेंटर कडे जो रस्ता जातोय तिथे चक्क ‘मेहरूण’ असे नाव पाहून माणूस चक्रावून जातो. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की, पिंप्री – धरणगाव रस्त्यावर गिरणा निम्न प्रकल्पा अंतर्गत पाटचारी आहे. या पाटचारी वरून जाणारा रस्ता सरळ न घेता चंद्रकोर प्रमाणे तिरकस घेण्यात आला आहे. नेमकं यामुळे रस्त्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी कदाचित बांधकाम विभाग प्रयत्न तर करत नाहीये अशी शंका मनात येते. त्याठिकाणी पाण्याचा…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 10 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात आहे यांच्यासाठी रविवारी आठ ते चार वाजेच्या दरम्यानजिल्हा बँकेसाठी रविवारी मतदान आठ ते चार वाजेच्या दरम्यान जिल्ह्यातील 15 ठिकाणी मतदान होणार आहे या 42 उमेदवारांची चे उद्या मतपेटीत जिल्हा बँकेत प्रवेश करण्याचे स्वप्न बंद होणार आहे. १० संचालकांसाठी ४२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्हा बँक संचालक मंडळाच्या १० संचालक पदांच्या ४२ उमेदवारांसाठी २१ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व १५ तालुकास्तरावर सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रकिया पार पडणार आहे. यात जळगाव येथे सु.ग.देवकर शाळा, भुसावळ म्युनसिपल हायस्कूल, यावल जि.प.मराठी मुलींची शाळा, कमलाबाई अगरवाल हायस्कूल रावेर, जे.ई.हायस्कूल मुक्ताईनगर, जि.प.मुलींची शाळा बोदवड,…

Read More

दिल्ली वृत्तसंस्था: 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने महिलेची हत्या  करून थांबला नाही तर त्याने खून केल्यानंतर महिलेच्या प्रायव्हेट पार्टला त्याने आग लावली. पोलीस तपासात ही बाब समोर आली आहे. डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्याने महिलेचा खून केला, त्यानंतर तिचा मृतदेह मारुती व्हॅनमध्ये टाकून डाबरी परिसरात टाकण्यात आला. 15 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील डाबरी भागात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता, कोणाची तक्रार नसल्याने पोलिसांनी तपास सुरू केला होता या तपासात सीसीटीव्ही फुटेज तपासले असतात त्या अनोळखी महिलेची ओळख पटली सीसीटीव्हीमध्ये एक अल्पवयीन युवक व्हॅनमधून मधून मृतदेहाची विल्हेवाट लावताना दिसून आला तांत्रिक तपास दारे तो मुलगा त्या ठिकाणी असल्याचे लोकेशन हे…

Read More

रोज महाप्रसाद सेवेसाठी भव्य स्वयंपाक गृहाचे भूमिपूजन प्रतिनिधी प्रफुल्ल पाटील: भारतीय संस्कृतीमध्ये तुलसी विवाहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुलसी विवाहानंतर वधू- वरांच्या ब्रह्मगाठी विवाह सोहळ्यातून बांधल्या जातात. ही परंपरा टिकून राहावी, मंदिरात मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या विवाह इच्छुकांच्या इच्छापूर्तीसाठी परमेश्वराची विशेष आराधना करावी , या उद्देशाने मंगळग्रह सेवा संस्थेने श्री मंगळदेव ग्रह मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य प्रमाणात तुलसी विवाहाच्या महासोहळ्याची परंपरा सुरू केली आहे . गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे हा कार्यक्रम अत्यंत मर्यादित स्वरूपात होत होता. यावर्षी मात्र कोरोनाचा कहर बऱ्यापैकी ओसरल्याने हा विवाह महासोहळा भव्य प्रमाणात करण्यात आला . प्रारंभी वराच्या विषयातील श्रीकृष्णाच्या मूर्तीची सजवलेल्या रथात व श्री मंगळदेव ग्रहाची…

Read More