लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: कन्नड घाटातून जाणार्या अवजड वाहनधारकांकडून वसुली करण्याची बाब स्टींग ऑपरेशनच्या माध्यमातून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी समोर आणली होती. यातील दोषी चार कर्मचार्यांना पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी निलंबीत केले आहे. याबाबत वृत्त असे की, आमदार मंगेश चव्हाण यांनी मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत कन्नड घाटात स्टींग ऑपरेशन केले. आ मंगेश चव्हाण स्वत: ट्रक ड्रायव्हर बनले होते. तेव्हा त्यांच्याकडून पाचशे रूपयांची मागणी करण्यात आली. तसेच अन्य वाहनधारकांकडूनही याच प्रकारची वसुली करण्यात आल्याचे या स्टींगमधून दिसून आले होते. आमदारांनी याबाबत पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली होती., पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी या प्रकरणी चौकशी करून यात दोषी आढळून आलेल्या गणेश…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावळ शहरातील श्रीराम नगर परिसरातील असलेल्या हनुमान मंदिराजवळ गुन्हेगारी टोळीची दहशत कायम ठेवण्याच्या हेतूने निखिल राजपूत व त्यांचे टोळीतील साथीदार यांनी पोलीस उपनिरीक्षक (प्रभारी)नेमणूक बाजारपेठ पोलीस स्टेशन भुसावळ यांचा गळा दाबून हल्ला केल्याची घटना रात्री घडली तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने निखिल राजपूत सह सहा आरोपीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाले आहे. सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी महेश भास्कर घायतड पोलीस उपनिरीक्षक बाजारपेठ पोलीस स्टेशन भुसावळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक २७ रोजी रात्री ००:३० चे सुमारास श्रीराम नगर परिसरातील असलेल्या हनुमान मंदिराजवळ निखिल राजपूत,अक्षय न्हावकर उर्फे थापा,गोलू कोल्हे,नकुल राजपूत,आकाश पाटील,अभिषेक शर्मा,निलेश ठाकूर एक…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चाळीसगाव शहरातील घाटरोड कोळीवाडा भागात राहत्या घरात शहर पोलीसांनी आज दुपारी टाकलेल्या छाप्यात सुमारे 1 लाख 66 हजार 620 रूपये किंमतीचा 11 किलो 214 ग्रॅम गांजा व रोख 58 हजार 370 रूपये असा 2 लाख 25 हजार रूपये 825 रूपयंाचा ऐवज जप्त केला आहे याप्रकरणी एका महिलेसह दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहर पोलीसांनी केलेल्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहीती अशी की, शहरातील घाटरोड, कोळीवाडा भागात गांजाविक्री होत असल्याची माहिती मिळाली असता पोलीस निरीक्षक के. के. पाटील, नायब तहसिलदार, महसुल चाळीसगांव विकास लाडवंजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले, विष्णु आव्हाड,…
क्रांतिसूर्य महात्मा फुले स्मृतीदिन विशेष विशेष प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे जीवन, कार्य व विचारांचे दर्शन घडविणारा महाग्रंथ सर्वांनी जरूर वाचावा असे प्रतिपादन या ग्रंथ निर्मिती मंडळामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे एरंडोल चे प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रांताधिकारी कार्यालय एरंडोल येथे गेलो असता मला विनयजी गोसावी यांच्या हस्ते क्रांतिरत्न महाग्रंथ भेट स्वरूप प्राप्त झाला. प्रसिध्द इतिहास लेखक प्रा. हरी नरके यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, कवी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे परिश्रम घेऊन हा ग्रंथ तयार केला आहे. यामध्ये धरणगाव येथील शतकोत्तर शाळा प.…
मुंबई वृत्तसंस्था : कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून सर्वच ठिकाणी सतर्कता बाळगली जात असतांना राज्य सरकारनेही या पार्श्वभूमिवर नवीन नियमावली जाहीर केली आहे. दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला आहे. हा व्हेरिएंट अत्यंत घातक आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज तातडीची बैठक घेऊन प्रशासनाला सूचना केल्या. या पार्श्वभूमिवर आता राज्य सरकारनेही खबरदारी घेऊन नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यात सार्वजनिक वाहतूकीत केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबत मॉल, सभागृह, कार्यक्रम याठिकाणी लसीचे दोन डोस असलेल्यांनाच प्रवेश देण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून युनिवर्सल पास देण्यात आले…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार हे 28 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे नामदार पवार हे दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाळधी येथे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र यांचा विवाह असल्याने त्याला शुभ आशीर्वाद देण्यासाठी येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार हे 28 रोजी जळगाव जिल्ह्यात येत आहे ते दुपारी दोन वाजेला पाळधी येथे गुलाबराव पाटील यांच्या घरी उपस्थित राहणार आहे.
वार्ताहर भाईदास पाटील: येथील ग्रुप ग्रामपंचायत भवरखेडे बु येथे ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला व तसेच आपल्या महाराष्ट्र मधल्या मुंबई येथे झालेल्या 26.11.2008 रोजी दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या हुतात्म्यांना व नागरीकांना अभिवादन करण्यात आले भावपूर्ण आदरांजली वाहून त्यांचे नमन करण्यात आले . सर्व प्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सरपंच किरण पाटील यांनी पुष्प गुच्छ अर्पण केले त्यानंतर सामुहिक संविधान वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,यावेळी उपसरपंच अजय ब्राम्हणे यांनी सामुहिक संविधान वाचन केले,आपल्या मनोगतात त्यांनी भारतीय संविधान सर्वाना समान अधिकार देऊन सन्मानाने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देते भारतीय संविधान दिनाचे महत्त्व सांगुन…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील – धरणगाव येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संविधान दिनानिमित्त पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे ‘ माझे संविधान,माझा अभिमान ‘ या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक ए.एस.पाटील हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे तर प्रमुख वक्ते प्रा.भरत शिरसाठ व पी.डी.पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक बळवंत पाटील,जी.पी.चौधरी हे होते. यावेळी विद्यायात रांगोळी,निबंध लेखन,वकृत्व व पोस्टर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी प्रमुख वक्ते पी. डी.पाटील यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्याचा गौरव करीत भारतीय संविधानाच्या ३९५ कलम व गुरू शिष्य परंपरा यांची ओळख उपस्थितांना करुन दिली तसेच दुसरे वक्ते प्रा.भरत…
धरणगाव लक्ष्मण पाटील: तालुक्यातील शेतीपंपाची वीज कनेक्शन अचानक पणे कट करण्याचे काम वीज कंपनीच्या वतीने सुरू आहे.शेतकऱ्यास कुठलीही माहिती न देता त्यांचे नुकसान करण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. शेतकऱ्याची रब्बी हंगामास सुरुवात झालेली असून पेरणी सुद्धा झालेली आहे,पिकांना पाण्याची आवश्यकता असतांना वीज कनेक्शन तोडल्याने पीक वाया जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.त्यासाठी आपण तात्काळ वीज कनेक्शन तोडणी थांबवून वीज कनेक्शन जोडणी करावी अन्यथा भारतीय जनता पार्टी धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल अश्या आशयाचे निवेदन म.रा.वि.कंपनीचे कार्यकारी अभियंता पवार साहेब यांना देतांना भाजपचे जेष्ठ नेते शिरीषआप्पा बयास,तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,ता.सरचिटणीस सुनील पाटील सर,ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील चौधरी,शहराध्यक्ष…
मुंबई वृत्तसंस्था : राज्यात कोरोना संसर्गामुळे हजारो रुग्णांचा मृत्यू झाला. काम करणारी तसेच कुंटुंबप्रमुख व्यतींचा या कोरोना महामारीमध्ये मृत्यू झाला. अनेक कुटुंबं उघड्यावर आली. मागील अनेक दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात यावी अशी मागणी केली जात होती. आता या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोविड-19 या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य देण्याची घोषणा सरकारने केली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून हा निधी देण्यात येईल. नातेवाईकास पन्नास हजार रुपये सानुग्रह सहाय्य दिले जाणार राज्य शासनाने मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा…

