Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आज पहाटे के.सी.पार्कजवळ भीषण अपघात झाला . ट्रॅक्टरने कारला धडक दिल्याने कारमधील दोन जण जागीच ठार झाले. या अपघातात अन्य दुसरी महिला व पुरुष जखमी झाले असून दोघांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले . बुधवारी डंपरच्या धडकेत एका अधिपरिचरिकेला जीव गमवावा लागला आज पहाटे गुरुवारी पहाटे भादली येथील पाटील कुटुंबीय नातेवाईकाला भेटण्यासाठी भोकर येथे कार ( क्रमांक एम एच -१४ – एफ सी ४५५०) ने जात होते. चालक बंडू पाटील होते. कानळदा रस्त्यावरील के.सी.पार्क जकात नाक्याजवळ समोरून भरधाव येणाऱ्या लाकडाने भरलेल्या ट्रॅक्टरने या कारलाजोरदार  धडक दिली. अपघातात कारचा पुढील भाग चेन्दामेन्दा झाला असून चालकासह एक महिला जागीच ठार…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : सुरत ते रायपूर असा रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवासी बॅगेतून पाच लाख 63 हजार चोरी केल्याचे प्रकार उघडकीस आला होता रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीला चोवीस तासाच्या आत सुरत येथून मुद्दे माला सह अटक केली आहे. आमदाबाद पुरी एक्सप्रेस ने 21 रोजी सुरत वरून रायपूर येथे जाण्यासाठी गीताबेन योगेश पटेल वय 38 या प्रवास करीत होत्या त्या प्रवास करीत असताना 22 रोजी  जळगाव ते भुसावळ दरम्यान पहाटे ४.२० ते ४.४५ वाजेच्या सुमारास चोरट्याने त्यांच्या डोक्याखाली ठेवलेली पर्स चोरून नेली. या पर्समध्ये सोन्याचे मंगळसूत्र, हार, २ चैन, एक रिंग, अंगठी, मोबाईल आणि रोख १ हजार असा ५…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे बोदवड नगरपंचायत साठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीत सर्वांचे लक्ष शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या विवर रचनेकडे राहील हे दोघेही एकत्र येऊन लढणार की आमने-सामने येणार हे पाहणे महत्वाचे राहणार आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायत पहिल्या निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला होता यानंतर खडसे भाजपा सोडून राष्ट्रवादीत गेल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी या ठिकाणी नगरसेवकांना शिवसेनेत आणले होते त्यानंतर दुसरी निवडणूक होत असल्याने सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.बोदवड नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम बोदवड नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे…

Read More

चोपडा प्रतिनिधी: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय चोपडा येथील आदरणीय डॉ. शैलेश वाघ यांच्या संकल्पनेतून पर्यावरणाला पूरक केक फ्री ग्रीन कॅम्पस या उपक्रमाला दिनांक २१ नोव्हेंबर २०१९ पासून सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाला दोन वर्ष पूर्ण झालेले असून (21 Nov. 2019 To 21 Nov. 2021) महाविद्यालयातील सर्व बंधू-भगिनींनी सदर उपक्रमास स्वयंम प्रेरणेने सहभाग नोंदविला यामध्ये महाविद्यालयातील कर्मचारीवृंद आपल्या वाढदिवसाला केक न कापता वृक्ष लागवड करून वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प सर्व कर्मचारीवृंद यांनी घेतला. यामुळे पर्यावरण विषयक पोषक वातावरण निर्मिती करण्याच्या उद्देशाने सदर उपक्रम राबविण्यात येत आहे व हाच संकल्प आजही सर्व कर्मचारी वृंद स्वयंप्रेरणेने…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: तालुक्यातील मौजे वंजारी बुद्रुक येथे आत्मा अंतर्गत स्थापित ‘खानदेशी शेतकरी बचत गट’ अंतर्गत योगेश काकडे व रामकृष्ण चौधरी यांनी ऍडव्हान्टा कंपनीची कुमकुम वाणाची लाल भेंडी लागवड केली. जिल्ह्यात प्रचार होणेसाठी उत्पादित झालेली भेंडी अभिजित राऊत जिल्हाधिकारी जळगांव यांना देते प्रसंगी उपस्थित जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगांव ठाकुर साहेब, उपसंचालक अनिल भोकरे, आत्मा उपसंचालक मधुकर चौधरी, तालुका कृषी अधिकारी किरण देसले, आत्मा बी टी एम दीपक नागपुरे, बिटीएम सोनू पाटील आणि ऍडव्हांटा कंपनी प्रतिनिधी प्रकाश पवार उपस्थित होते. सदरील लाल भेंडी ही आरोग्यवर्धक आहे या भेंडीच्या सेवनामुळे शुगर, बिपी, लठ्ठपणा नियंत्रित राहतो. ही भेंडी शरीरासाठी मेडिसीनल मूल्यवर्धक आहे.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जामनेर तालुक्यातील  सोनाळा येथून मोटारसायकलवर पहुरला जात असलेल्या कापसाच्या व्यापाऱ्याला अज्ञात चार गुंडांनी बंदुकीचा धाक दाखवत त्याच्याकडील 7 लाख रुपये हिसकावून नेल्याची घटना आज सकाळी 8.15 वाजेच्या सुमारास घडली . जामनेर तालुक्यातील सोनाळा येथील संजय रामकृष्ण पाटील हे पहूर येथे कपाशीचा व्यापार करतात आज ते नेहमीप्रमाणे सकाळी सोनाळा येथून पहुरकडे मोटरसायकलने येत असताना सोनाळा गाव ते सोनाळा फाटा दरम्यान फॉरेस्ट तलावाजवळ अज्ञात चार जणांनी बंदुकीचा धाक दाखवून सात लाख रुपये हिसकावुन घेतल्याची घटना आज सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडली. सोनाळा येथून हे अज्ञात संशयित त्यांचा पाठलाग करीत होते दोन जण तलावाजवळ आधीच थांबलेले होते दोन जणांनी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भरधाव वाळू डंपरच्या धडकेत जिल्हा सामान्य रुग्णालयात अधिपरिचारिका असलेल्या महिलेचा जळगाव –भुसावळ दरम्यान महामार्गावर तरसोद फाट्यानजीक अपघातात मृत्यू झाला आहे. जिल्हाभरात अवैध वाळू वाहतुकीमुळे होणारे अपघात नित्याचेच झाले आहे. अपघात जळगाव–भुसावळ दरम्यान महामार्गावर तरसोद फाट्यानजीक दुपारी  वाळू डंपर क्रमांक एमएच.१९.वाय.७७७३ ने दुचाकीस्वार महिलेला जोरदार धडक दिली. या धडकेत प्रेरणा देविदास तायडे वय-३२ रा.कंडारी, ता.भुसावळ हिचा जागीच मृत्यू झाला आहे तर तिच्या स्कुटीचा चुराडा झाला आहे. घटनेची माहिती कळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, सहाय्यक फौजदार अलीयार खान, कर्मचारी हसरत सैय्यद, महिला कर्मचारी लिना लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात इतका भयंकर होता कि दुचाकी डंपरच्या खाली दाबली जाऊन…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चाळीसगाव  शहरातील कोदगांव शिवारातील  शेडमध्ये बांधलेल्या २५ हजार रुपये किंमतीची जर्शी गाय अज्ञाताने चोरून नेल्याची   घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील कोदगांव येथील समाधान वामन चौधरी यांनी कोदगांव शिवारातील आपल्या शेतातील शेडमध्ये जर्शी वानीची गाय बांधलेली असताना अज्ञात इसमाने चोरून नेल्याची  घटना उघडकीला आली आहे.  हि घटना २२ रोजी रात्री ८ ते २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तत्पूर्वी समाधान वामन चौधरी यांनी गायीला परिसरात शोधाशोध केली. मात्र गायी मिळून आले नाही. म्हणून २५,००० हजार रुपये किंमतीची जर्शी…

Read More

धरणगाव लक्ष्मण पाटील : आज रोजी धरणगाव शहर काँग्रेस यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग धरणगाव येथे निवेदन देण्यात आले. कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्याल जळगाव रोड येथे रबरी स्पिड ब्रेकर बसविण्याबाबत हे निवेदन देण्यात आले. ग्रामीण व शहरी भागातील विध्यार्थी तसेच शिक्षक कर्मचारी वर्ग व जिनींग चे कामगार पायी प्रवास करीत असतात व त्या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचे गती रोधक व फलक नाहीत या म्हणून धरणगाव शहर काँग्रेस पक्षाचे वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी वरिष्ठ लिपिक खाटीक व वाघ साहेब यांच्या कडे निवेदन दिले. त्यावेळेस शहर अध्यक्ष राजू न्हायदे यांनी ठाकूर साहेब यांच्याशी दूरध्वनिवरून संपर्क साधला त्यांना वरील विषयी त्यांच्या शी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: प्रवासी बस तक्रारदार यांचे वडिलांचे नावावर हस्तांतर करण्याच्या मोबदल्यात दोन आरटीओ एजट यांनी 10 हजाराची लाच घेताना एसीबीने ररंगेहाथ पकडण्यात आले आहे. तक्रारदार यांनी साधारण प्रवासी बस विकत घेतली आहे ती   बस तक्रारदार याच्या  वडिलांचे नावावर हस्तांतर करण्याच्या आरटीओ कार्यालयात आले असता बस हस्तांतर करण्याच्या  मोबदल्यात आरोपी शुभम राजेंद्र चौधरी,वय-२३, व्यवसाय आरटीओ एजंट जळगाव ,राम भिमराव पाटील, वय -३७, व्यवसाय आरटीओ एजंट जळगाव  यांनी आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नावाने 10 हजार रुपयांची मागणी केली. एसीबीचे डी वाय एस पी शशिकांत एस. पाटील, पोलीस निरीक्षक .संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील,पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर,…

Read More