Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : धरणगाव तालुक्यातील बालाजी लोंढे तलाठी पाळधी बु. आणि सुमित गवई तलाठी चांदसर यांना प्रांताधिकारी एरंडोल विनय गोसावी यांनी निलंबनाचे आदेश निर्गमित केले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तलाठी बालाजी लोंढे व सुमित गवई यांच्या बाबतीत नागरिक व शेतकरी यांना न्याय न देणे, मुख्यालयी न थांबणे,अतिवृष्टी याद्यामध्ये नावे वगळणे,शेतकरी व नागरिकांना फिरवणे, 7/12 साठी धरणगावला बोलावणे अशा अनेक तक्रारी नागरिक व शेतकऱ्यांच्या असल्यामुळे चौकशीअंती त्यांचा अहवाल तहसिलदार धरणगाव यांनी पाठविला होता. यात तलाठी पाळधी बालाजी लोंढे यांचा असमाधानकारक असल्याने तसेच तलाठी चांदसर यांनी खुलासा सादर न केल्यामुळे सदर निलंबन कारवाई त्यांच्यावर प्रांताधिकारी यांचेकडून करण्यात आली आहे.

Read More

अरबी समुद्रात लक्षद्वीपमध्ये येत्या 24 तासांत कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आवाहन लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: अरबी समुद्रात लक्षद्वीपमध्ये येत्या 24 तासांत कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता व बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) क्षेत्रात भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच 2 डिसेंबर, 2021 पर्यंत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिक, शेतकऱ्यांनी सतर्क राहात सुरक्षितस्थळी थांबावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. जळगाव जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व तापी नदीमधील पाण्याच्या पातळीत वाढ होवून हातनूर धरणाच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील शेतकरी व नदी काठच्या गावातील नागरिकांनी…

Read More

महात्मा फुले नसते तर शिवराय कळले नसते – लक्ष्मणराव पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: हनुमान नगर मित्र परिवार, बहुजन क्रांती मोर्चा आणि सत्यशोधक परिषद धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त हनुमान नगर येथे वैचारिक प्रबोधनपर व्याख्यान संपन्न झाले. या प्रबोधनपर व्याख्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी समाजाचे सल्लागार पंच हेमंत माळी सर यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळी समाजाचे ज्येष्ठ पंच सखाराम दुला महाजन होते. या वैचारिक प्रबोधन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक वक्ते प्रा.भरत शिरसाठ, पी.डी.पाटील, लक्ष्मणराव पाटील होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय, सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव शहरातील राजीव गांधीनगरात अंदाजे २० ते २२ महिन्याचे अर्भक  उकिरड्यावर मृतावस्थेत आढळून आले याप्रकरणी रामानंद पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आज सकाळी राजीव गांधीनगरात २० ते २२ आठवड्याचे अर्भक स्वप्नील चौधरी यांना उकिरड्यावर मृतावस्थेत टाकून दिले असल्याचे दिसून आले.यावेळी स्थानिक रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती. स्वप्नील चौधरी यानी घटनेची माहिती पोलिसांना दिली. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पो.काँ. नितेश बच्छाव, हरिश डोईफोडे, सुशिल चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन या बाळाला ताब्यात घेतले आणि पंचनामा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले . तेथे सीएमओ डॉ संदीप पाटील यांनी या बाळाला मयत घोषित केले . शासकीय रुग्णालयात रामानंद…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावळ येथील पोलीस उपनिरिक्षकावर हल्ला करून धमकावल्याच्या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. हे पोलीस निरीक्षक गस्तीवर होते. यातील मुख्य सूत्रधार निखील राजपूत हा अद्याप फरार असून त्याचा कसून शोध सुरू आहे. याबाबत सविस्तर असे कि तीन दिवसांपूर्वी मध्यरात्री शहरातील श्रीराम नगराजवळील हनुमान मंदिराजवळ टोळक्याने फौजदारावर जीवघेणा हल्ला केला होता. याप्रकरणी उपनिरीक्षक महेश धायतड यांच्या फिर्यादीनुसार निखिल राजपूतसह गोलू कोल्हे, नकुल राजपूत, आकाश पाटील, अभिषेक शर्मा, अक्षय न्हावकर उर्फ थापा, नीलेश ठाकूर व अन्य एका अनोळखी अशा ८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्वच्या सर्व संशयित फरार झाले होते. त्यातील चेतन…

Read More

पुणे प्रतिनिधी : शिरूर तालुक्यातीलपिंपळी जगताप येथे धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्पांतर्गत गायरान गट क्रमांक 60 येते गरुड झेप अकॅडमी यांच्या हस्ते अडीच हजार जणांचा टप्पा पूर्ण करण्यात आला. श्री धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील गायरान गट क्रमांक ६० येथे लोकसहभागातून वृक्षारोपण करण्यात येत आहे . वृक्षारोपणाचा अडीच हजार झाडांचा टप्पा आज महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले स्पर्धा परिक्षा केंद्र गरूड झेप अकॅडमी यांच्या हस्ते पूर्ण करण्यात आला. वनराई मध्ये ४० प्रकारच्या देशी वृक्षांची लागवड करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष श्री धर्मराज बोत्रे व विशाल बेंडभर यांनी दिली.  गरुड झेप अकॅडमीचे पिंपळे जगताप मधील चारशे विद्यार्थ्यांनी वनराई मध्ये श्रमदान…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आम्ही 25 वर्ष जोडीने संसार केला मात्र जयंत पाटील यांना तो मोडला आहे असे उदगार ना  गुलाबराव पाटील यांच्या सुपुत्र याच्या विवाहसोहळ्या वेळी आशीर्वाद रुपी मनोगत व्यक्त करताना व्यक्त केले. ना गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र विक्रम याच्या विवाह सोहळ्याला  महा विकास आघाडीचे नेते ना जयंत पाटील,ना बाळासाहेब थोरात, ना अब्दुल सत्तार,ना दादा भुसे, ना अदिती तटकरे, ना अनिल परब, ना संजय बनसोडे, ना दीपक केसरकर, ना सुनील केदार, आ मंगेश चव्हाण आ शिरीष चौधरी, आ गिरीश महाजन ,जैन इरिगेशन चे अनिल जैन, आशीर्वाद देण्यासाठी सर्व पक्षीय नेते  व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी वर वधूला आशीर्वाद देण्यासाठी आ गिरीश महाजन हे…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: कापूस व्यापारी स्वप्नील शिंदे याच्या खून प्रकरणात एलसीबी व स्थानिक पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे यात एक पोलीस कर्मचारी असल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक डॉक्टर प्रविण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली मात्र त्यांनी आरोपींची नावे सांगण्यास नकार दिला असून यात अजून काही आरोपी असू शकतात अशी शंका पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. जळगाव येथून हवाल्याचे सुमारे १५ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी यांचा पाळधी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास पैसे लुटण्याच्या प्रयत्नातून खून झाला होता. या प्रकरणी एलसीबीच्या पथकाने पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान,पाच…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: येथील आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने यंदाचा खान्देश भूषण मोहसिन खान अजीज खान यांना देण्यात आला. शैक्षणिक/सामाजिक/ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. २८ नोव्हेंबर रविवारी जळगाव येथील अल्पबचत भवन याठिकाणी वितरित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार (जळगाव) हे होते तर अंकुर साहित्य परिषद सहसचिव हकीम आर चौधरी मुक्ताईनगर, लोकनियुक्त सरपंच भावना माळी अडावद, सरकारी वकील कलंतरी, अब्दुल मजीद जकरीया जळगाव, अब्दुल करीम सालार जळगाव, संभाजी ब्रिगेड चे दिनेश भाऊ कदम मुक्ताईनगर, मण्यार बिरादरी जिल्हाध्यक्ष फारूक शेख, अल्पसंख्यांक सेवा संघाचे अध्यक्ष जहांगीर खान, हाजी फजल सेठ अडावद, रि.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : राज्याचे उपमुख्य मंत्री ना अजित पवार हे आज जळगाव दौर्‍यावर येणार होते जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील सुपुत्र विक्रम याच्या विवाह निमित्त त्याला आशीर्वाद देण्यासाठी पाळधी येथे उपस्थित राहणार होते मात्र राज्यात कोरोनाचे संकट उभे राहिले असल्याने तातडीची बैठक लागल्याने त्याचा जळगाव दौरा रद्द झाला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज पाळधी येथे दुपारी दोन वाजता आमदार गुलाबराव पाटील यांच्या घरी मुलाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार होते मात्र त्यांचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी दिली आहे.

Read More