प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: तालुक्यातील मौजे वंजारी बुद्रुक येथे आत्मा अंतर्गत स्थापित ‘खानदेशी शेतकरी बचत गट’ अंतर्गत योगेश काकडे व रामकृष्ण चौधरी यांनी ऍडव्हान्टा कंपनीची कुमकुम वाणाची लाल भेंडी लागवड केली. जिल्ह्यात प्रचार होणेसाठी उत्पादित झालेली भेंडी अभिजित राऊत जिल्हाधिकारी जळगांव यांना देते प्रसंगी उपस्थित जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगांव ठाकुर साहेब, उपसंचालक अनिल भोकरे, आत्मा उपसंचालक मधुकर चौधरी, तालुका कृषी अधिकारी किरण देसले, आत्मा बी टी एम दीपक नागपुरे, बिटीएम सोनू पाटील आणि ऍडव्हांटा कंपनी प्रतिनिधी प्रकाश पवार उपस्थित होते. सदरील लाल भेंडी ही आरोग्यवर्धक आहे या भेंडीच्या सेवनामुळे शुगर, बिपी, लठ्ठपणा नियंत्रित राहतो. ही भेंडी शरीरासाठी मेडिसीनल मूल्यवर्धक आहे.…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जामनेर तालुक्यातील सोनाळा येथून मोटारसायकलवर पहुरला जात असलेल्या कापसाच्या व्यापाऱ्याला अज्ञात चार गुंडांनी बंदुकीचा धाक दाखवत त्याच्याकडील 7 लाख रुपये हिसकावून नेल्याची घटना आज सकाळी 8.15 वाजेच्या सुमारास घडली . जामनेर तालुक्यातील सोनाळा येथील संजय रामकृष्ण पाटील हे पहूर येथे कपाशीचा व्यापार करतात आज ते नेहमीप्रमाणे सकाळी सोनाळा येथून पहुरकडे मोटरसायकलने येत असताना सोनाळा गाव ते सोनाळा फाटा दरम्यान फॉरेस्ट तलावाजवळ अज्ञात चार जणांनी बंदुकीचा धाक दाखवून सात लाख रुपये हिसकावुन घेतल्याची घटना आज सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडली. सोनाळा येथून हे अज्ञात संशयित त्यांचा पाठलाग करीत होते दोन जण तलावाजवळ आधीच थांबलेले होते दोन जणांनी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भरधाव वाळू डंपरच्या धडकेत जिल्हा सामान्य रुग्णालयात अधिपरिचारिका असलेल्या महिलेचा जळगाव –भुसावळ दरम्यान महामार्गावर तरसोद फाट्यानजीक अपघातात मृत्यू झाला आहे. जिल्हाभरात अवैध वाळू वाहतुकीमुळे होणारे अपघात नित्याचेच झाले आहे. अपघात जळगाव–भुसावळ दरम्यान महामार्गावर तरसोद फाट्यानजीक दुपारी वाळू डंपर क्रमांक एमएच.१९.वाय.७७७३ ने दुचाकीस्वार महिलेला जोरदार धडक दिली. या धडकेत प्रेरणा देविदास तायडे वय-३२ रा.कंडारी, ता.भुसावळ हिचा जागीच मृत्यू झाला आहे तर तिच्या स्कुटीचा चुराडा झाला आहे. घटनेची माहिती कळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, सहाय्यक फौजदार अलीयार खान, कर्मचारी हसरत सैय्यद, महिला कर्मचारी लिना लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात इतका भयंकर होता कि दुचाकी डंपरच्या खाली दाबली जाऊन…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चाळीसगाव शहरातील कोदगांव शिवारातील शेडमध्ये बांधलेल्या २५ हजार रुपये किंमतीची जर्शी गाय अज्ञाताने चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील कोदगांव येथील समाधान वामन चौधरी यांनी कोदगांव शिवारातील आपल्या शेतातील शेडमध्ये जर्शी वानीची गाय बांधलेली असताना अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. हि घटना २२ रोजी रात्री ८ ते २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तत्पूर्वी समाधान वामन चौधरी यांनी गायीला परिसरात शोधाशोध केली. मात्र गायी मिळून आले नाही. म्हणून २५,००० हजार रुपये किंमतीची जर्शी…
धरणगाव लक्ष्मण पाटील : आज रोजी धरणगाव शहर काँग्रेस यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग धरणगाव येथे निवेदन देण्यात आले. कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्याल जळगाव रोड येथे रबरी स्पिड ब्रेकर बसविण्याबाबत हे निवेदन देण्यात आले. ग्रामीण व शहरी भागातील विध्यार्थी तसेच शिक्षक कर्मचारी वर्ग व जिनींग चे कामगार पायी प्रवास करीत असतात व त्या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचे गती रोधक व फलक नाहीत या म्हणून धरणगाव शहर काँग्रेस पक्षाचे वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी वरिष्ठ लिपिक खाटीक व वाघ साहेब यांच्या कडे निवेदन दिले. त्यावेळेस शहर अध्यक्ष राजू न्हायदे यांनी ठाकूर साहेब यांच्याशी दूरध्वनिवरून संपर्क साधला त्यांना वरील विषयी त्यांच्या शी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: प्रवासी बस तक्रारदार यांचे वडिलांचे नावावर हस्तांतर करण्याच्या मोबदल्यात दोन आरटीओ एजट यांनी 10 हजाराची लाच घेताना एसीबीने ररंगेहाथ पकडण्यात आले आहे. तक्रारदार यांनी साधारण प्रवासी बस विकत घेतली आहे ती बस तक्रारदार याच्या वडिलांचे नावावर हस्तांतर करण्याच्या आरटीओ कार्यालयात आले असता बस हस्तांतर करण्याच्या मोबदल्यात आरोपी शुभम राजेंद्र चौधरी,वय-२३, व्यवसाय आरटीओ एजंट जळगाव ,राम भिमराव पाटील, वय -३७, व्यवसाय आरटीओ एजंट जळगाव यांनी आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नावाने 10 हजार रुपयांची मागणी केली. एसीबीचे डी वाय एस पी शशिकांत एस. पाटील, पोलीस निरीक्षक .संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील,पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर,…
प्रतिनिधी प्रविण पाटील: जामनेर जिल्ह्यातील आदिवासी भिल्ल समाजासाठी शासनाच्या नियमानुसार प्रत्येक गावात दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी व ती 7/12 वर नोंद करावी यासह विविध मागण्यांसाठी जळगाव जामनेर येथील प्रांत कार्यालयात एकलव्य संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आलं जळगांव जिह्यातील जळगांव जामनेर येथील विभागीय प्रांतकार्यालय येथे आज एकलव्य संघटनेच्या वतीने आदिवासी भिल समाजासाठी प्रमुख मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. १) आदिवासी भिल समाजासाठी शासन जीआर नुसार आदिवासी भिल समाज राहात असलेल्या प्रत्येक गावामध्ये दफनभूमी उपलब्ध करुन आदिवासी भिल समाजदफनभूमी जागा असा उल्लेख करून ७/१२ उताऱ्यावर नोंद करण्यात यावे. २) आदिवासी भिल समाज राहत असलेल्या जागा नावे करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा व…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महा विकास आघाडी ला स्पष्ट बहुमत मतदानापूर्वी मिळाले होते त्यामुळे सुज्ञ मतदारांनी बहुमताचा कल ओळखून मतदान केले आणि तसेही महा विकास आघाडीला स्पष्ट बहुमत असल्याने निवडणुकीची फक्त औपचारिकता बाकी होती असे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र लाईव्ह बोलताना व्यक्त केले. महाविकास आघाडीला अकरा जागा बिनविरोध झाल्याने आधीच स्पष्ट बहुमत मिळाले होते त्यात भाजपाने निवडणुकीतून माघार घेतल्याने फक्त निवडणुकीची औपचारिकता उरली होती मतदारांनी बहुमताचा कल ओळखून मतदान केले आणि समोर नगण्य असे उमेदवार होते महा विकास आघाडीने संपूर्ण जागा जिंकलेले आहे महा विकास आघाडीच्या सभासदांकडून शेतकऱ्यांची हीच अपेक्षा आहे की शेतकऱ्यांना…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव शहरातून घटनांमधून तीन मोबाईल चोरणारे चोरणाऱ्या चोरट्यांना जिल्हापेठ पोलिसांनी जळगाव मधून मुसक्या आवडल्या आहे त्यांच्याकडून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे शहरातील नितेश प्रशांत बरहाटे 21 रोजी आईबरोबर मोबाइलला टफन ग्लास लावण्यास गणेश कॉलोनी येथे गेले असता दोन अज्ञात इसमाने वय 20 ते 25 वर्ष यांनी फिर्यादीचा ओप्पो कंपनीचा 12 हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून मोटर सायकलवर पळून गेले होते त्यानंतर त्यांनीच कु गायत्री अमरलाल अडवाणी रा सिंधी कॉलोनी यांचा सिंधी कॉलोनी येथून मोबाइल हिसकावून पळून गेले होते त्यानंतर अनुप पवार रा गणेश कॉलोनी यांचा…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: येथील अग्रवाल चौकात महामार्गावर ट्रक थांबवून ट्रक ओव्हरलोड असल्याचे सांगितले ट्रक चालकाने वजनकाटा केला असून ट्रक ओव्हरलोड नसल्याचे सांगत दंड भरण्यास नकार दिला असता, आरटीओच्या अधिकार्यांसह कर्मचार्यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी ट्रकचालकाच्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात अधिकार्यासह कर्मचारी अशा तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. छत्तीसगढ राज्यातील रहिवासी चालक विनोद मुकूंदलाल चौरे वय ३७ हे त्यांच्या ताब्यातील मालाने भरलेला ट्रक घेवून जळगावहून जात होते. १५ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास एम.एच. ०४ के.आर. ६४१९ या शासकीय वाहनातून आलेल्या आरटीओ विभागाच्या अधिकार्यांसह दोन कर्मचारी अशा तिघांनी चौरे यांचा ट्रक महामार्गावर जळगाव शहरात अग्रवाल चौकात ऍक्सेस ब्रेन हॉस्पिटलच्या समोर अडविला. तसेच…

