प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : धरणगाव जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ धरणगांव संचलित के.जी. गुजराथी मुक बधीर निवासी विद्यालय, मतिमंद निवासी व अनिवासी विद्यालय, मुक बधीर निवासी कार्यशाळा (I.T.T.) धरणगाव येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमोद पाटील (माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती धरणगाव) यांच्या हस्ते डॉ. हेलन केलर यांचे प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. प्रमुख अतिथी जयदीप पाटील सर,( दिव्यांग विभाग प्रमुख पंचायत समिती धरणगाव), विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना संतोष भडांगे सर यांनी केले. दिव्यांगांचे हक्क, अधिकार व कायदे याविषयी ॲड. संदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. तुळशिराम सैंदाणे सर (वि.…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : येथील पंचायत समितीच्या वतीने ३ डिसेंबर, आंतरराष्ट्रीय (अपंग) दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन केंद्र येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष धरणगाव पं. स. चे युडीआयडी समन्वयक जयदीप पाटील यांनी डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व उपस्थित दिव्यांगांना पुष्पगुच्छ व युडीआयडी कार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक वाल्मिकराव पाटील, संतोष भडांगे सर, दिपक पाटील सर, तुळशीराम सैंदाने सर आदी मान्यवरांनी दिव्यांगाच्या विविध योजनेविषयी माहिती दिली. यावेळी कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सल्ला व मार्गदर्शन…
प्रतिनिधी राजेंद्र पाटील : बेकायदेशीर गावठी बनावटीचा कट्टा, तीन जिवंत काडतुस व तलवार बाळगणाऱ्या एका तरुणाला तालुका पोलिसांनी बिबा नगर येथून शुक्रवार ३ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता अटक करत त्याच्या ताब्यातील गावठी बनावटीचा कट्टा व तलवार हस्तगत केली आहे, याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बिबा नगर परिसरात एक तरूण बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचा कट्टा, कडतुस आणि तलवार बाळगत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांना मिळाली. त्यानुसार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील, पोलीस नाईक विश्वनाथ गायकवाड, महेश महाले, रवींद्र मोतीराया, तुषार…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चोपडा येथे पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या विशेष पोलीस पथकाने उमर्टी येथील 36 वर्षीय इसमाला गावठी कट्टा मँगजीनसह आरोपीला अटक केली. गावठी कट्टा, काडतुसे बाळगणा-या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या विशेष पोलीस पथकाला यश आले. गुरजितसिंह अकबरसिंह बर्नाला (36),रा.उमर्टी ता.वरला जि.बडवानी (मध्य प्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्या ताब्यातून गावठी कट्टा (₹ 30000/-)रु., एक मँगजीन (₹2000 /-) असा एकुण ₹32000/ चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्याच्यावर चोपडा ग्रामीण पो.स्टे.ला गु.र.न. 215/2021 आर्म अँक्ट 3/25, 7/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कामगिरी पो.नि.बापू रोहम, सहायक फौजदार, बशिर तडवी, हे.कॉ. रामचंद्र बोरसे, पोलिस…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: एरंडोल येथील भूमिअभिलेख कार्यालयातील प्रमुख भूमापक संजय नामदेव पाटील ( वय-५२ ) यांनी वरिष्ठांच्या जांचाला २३ नोव्हेंबर रोजी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता .आज शुक्रवार ३ डिसेंबर रोजी दुपारी जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत वरिष्ठांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. याबाबत माहिती अशी की, संजय पाटील हे एरंडोल येथील भूमापक कार्यालयात एम.एस. पदावर काम करतात. खडका येथून ते दररोज दुचाकीने अपडाऊन करत होते. सन २०१९ पासून त्यांना वरिष्ठांकडून कामाचा दबाव टाकत होते. त्यामुळे ते गेल्या अनेक महिन्यांपासून तणावात काम करत होते. हा त्रास सहन न…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: लग्नाचे आमिष दाखल जळगाव शहरातील एका भागात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार ३ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीला आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आईवडीलांसह वास्तव्याला आहे. तीन वर्षापुर्वी मुलीचे कुटुंबिय एरंडोल येथे वास्तव्याला होता. दोन वर्षांपुवी जळगाव शहरातील एका दुकानावर काम करणारा हसन असलम मोमीन रा. एरंडोल जि. जळगाव यांची आणि अल्पवयीन मुलीची ओळख निर्माण झाली. तेव्हा त्याने मुलीला लग्नाची मागणी घातली. परंतू हसनला घरच्यांनी परवानगी दिली नाही. पण मुलीच्या आईवडीलांनी विचारले असता आपण आईवडीलांना…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील प्रा.डी.आर.पाटील यांना दि. 3 जानेवारी 2022 रोजी आष्टी जिल्हा बीड येथे इतिहास संकलन संस्थेच्या अधिवेशनात ‘स्व सतीश मित्तल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, इतिहास क्षेत्रात काम करीत असताना संघटनेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. इतिहास संकलन समितीचे भूतपूर्व अध्यक्ष स्व. डॉ सतीश मित्तल यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो. पाचोरा येथील स्व. परशुराम कोंडीबा शिंदे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा हा पुरस्कार या वर्षी धरणगाव येथील दिलीप रामू पाटील यांना घोषित झाला आहे. निवड समिती मध्ये नगर चे प्रा.डॉ.राधाकृष्ण जोशी, बीड चे प्रा.डॉ.मुकुंद…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी आज निवडणूक पार पडली या निवडणुकीत महाविकासआघाडी च्या कोअर कमिटीने ठरविल्या प्रमाणे राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे विराजमान झाले असून उपाध्यक्षपदी शिवसेनेचे शामकांत सोनवणे यांच्या वर्णी लागली आहे.जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत महा विकास आघाडीने वीस जागांवर विजय मिळवला यात 11 जागा या बिनविरोध झाल्या होत्या त्यामुळे बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसवर शिवसेनेचे वर्चस्व आधीच प्रस्थापित झाले होते त्यात महा विकास आघाडीच्या कोर कमिटीने झालेल्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची साठी कोणाला किती संधी मिळणार याचा निर्णय घेण्यात आला होतात या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला तीन…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भडगाव येथे शिक्षण घेत असलेला 9 वितील विद्यार्थी दुपारी शाळा सुटल्या नंतर घरी जात असताना च्युईगम खात असताना च्युईगम त्याच्या श्वासनलिकेत चिपकल्याने त्याच्या मृत्यू झाला. भडगाव तालुक्यातील पाढरद येथील 15 वर्षीय उमेश गणेश पाटील हा विद्यार्थी भडगाव येथील लाडकुबाई विद्यामंदिर या शाळेत इयत्ता नववीतशिकत होता. गुरुवारी दुपारी शाळा 3.30वाजेला सुटल्यानंतर त्याने च्युईंगम घेतली. गावीजाण्यासाठी रिक्षात बसला. ही च्युईंगम त्याच्या श्वासनलिकेत अडकली. त्यामुळे त्याला अस्वस्थवाटू लागले.त्याला भडगाव येथे खाजगीदवाखान्यात आणण्यात आले. डॉक्टरांनी त्याला पाचोरा येथे घेऊन जाण्यास सांगितले. त्याला पाचोरायेथे नेत असतानाच वाटेतच त्याची प्राणज्योत मालविली. गुरुवारी त्याचा गणिताचा पेपर होता. त्याने परीक्षा दिली. दुपारी च्युइंगम चघळत असतानाच…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चोपडा येथील राहणाऱ्या युवकाने आपल्या पत्नीला तोंडी तलाक दिला होता.याच्या विरोधात चोपडा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला असून पतीचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. या संदर्भात माहिती अशी की, चोपडा येथील मुस्तफा कॉलनीतील रहिवासी रईसोद्दीन रफीयोद्दीन जहागीरदार याचा जुलै २०१९ मध्ये एका तरुणी सोबत विवाह झाला होता. विवाह होऊन तीन वर्षा झाले होते रईसोद्दीने आपल्या पत्नीला माहेरून पैसे आणावेत म्हणून छळ केला. यानंतर त्याने २४ नोव्हेंबर २०२१ रोजी आपल्या पत्नीला तोंडी तिहेरी तलाक देऊन तिच्या माहेरी पाठवून दिले. या अनुषंगाने संबंधीत महिलेच्या तक्रारीवरून रईसोद्दीन आणि त्याच्या आईच्या विरोधात चोपडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी…

