प्रतिनिधी जळगाव : कार्यकर्ता विकासाच्या दृष्टीने अभ्यासवर्ग महत्त्वाचा असतो. अभ्यासवर्गाचे स्वरूप प्रांत वर्ग, जिल्हा वर्ग, कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग अशा प्रकारे असते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव जिल्हा अभ्यास वर्ग दि. २० व २१ नोव्हेंबर २०२१ रोजी श्री क्षेत्र मंगळ ग्रह मंदिर, अमळनेर येथे संपन्न झाला. अभ्यासवर्गाचे उद्घाटन प्रांत संघटन मंत्री अभिजित पाटील, जिल्हा प्रमुख प्रा. डॉ. सुनील कुलकर्णी, जिल्हा संयोजक इच्छेश काबरा, वर्ग प्रमुख नितेश चौधरी यांच्या हस्ते झाला. अभ्यासवर्गात अभाविप परिचय व सैद्धांतिक भूमिका, अभाविप कार्यपध्दती, कार्यकर्ता व्यवहार, ORP, मुलाखत, भाषण सत्र, महाविद्यालय काम, प्रवास व संपर्क आदी सत्रांचे नियोजन कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाच्या दृष्ट्या करण्यात आले होते. विद्यार्थी परिषदेच्या वर्षभरातील…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील पिंप्री खुर्द ता. धरणगाव येथे संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला तसेच 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम विद्यार्थ्यांना सामूहिक संविधान उद्देशिका वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संविधान दिनानिमित्त शाळेत वक्तृत्व व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ज्यात विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. यावेळी आर.एस. पाटील सर यांनी संविधान विषयावर आपले मनोगत व्यक्त करत आपले हक्क अधिकार, व संविधानिक महत्त्व अधोरेखित केले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही.एम. चौधरी मॅम, उपशिक्षक आर.आर. पावरा, एस. के. शिंदे, एस.ए. पवार, जे.एस. पाटील, मनिषा पाटील मॅम आदी उपस्थित होते . आभार पुष्प शरीफ पटेल यांनी…
कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला जल्लोषलाईव्ह महाराष्ट्र न्यूज’:माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या घरकुल प्रकरणातील शिक्षेवरील स्थगितीबाबत दाखल याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.सामाजिक कार्यकर्ते पवन ठाकूर यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या शिक्षेवरील स्थगिती उठविण्याबाबत याचिका दाखल केली होती. दोन-तीन सुनवाईनंतर न्यायालयाने ठाकूर यांची याचिका फेटाळून लावल्यामुळे गुलाबराव देवकरांना ‘सर्वोच्च’ दिलासा मिळाला आहे. दरम्यान, यानिमित्ताने देवकर यांना भविष्यात कोणतीही निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. घरकुल प्रकरणी झालेल्या शिक्षेवर आरोपींनी स्थगिती मिळवली होती. दरम्यान, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी जिल्हा बँकेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी इतर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महाविकास आघाडीने या निवडणुकीत आधीच बहुमत मिळवले आहे.…
अमरावती वृत्तसंस्था : येथील पिंपळगाव बैनाई येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला. अनेक वेळा तलाठी कार्यालयात गावातील व परिसरातील शेतकरी वर्ग कामानिमित्त येतात. मात्र, तलाठी व त्याच्या काही मित्रांनी एक महिलेला तलाठी कार्यालयात बोलावले. आणि त्याच ठिकाणी त्यांनी अश्लील चाळे सुरू केले. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी त्यांना जोरदार चोप देण्यात नाला आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव बैनाई गावाच्या तलाठ्यानं व त्याच्या काही मित्रानी हा धक्कादायक प्रकार केल्याचं उघड झालं. तलाठी कार्यलयात एका महिलेला आणून तिच्या सोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक घटना घडली. हा संपूर्ण प्रकार गावकऱ्यांनी या तलाठ्याला व महिलेला रंगेहाथ पकडून समोर आणला आहे. त्यामुळं तलाठी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जामनेर तालुक्यातील सोनाळा येथून पहुर कडे जाणाऱ्या शेतकऱ्याचे शेतमालाची सात लाख रुपये घेऊन जात असताना दोन मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात लोकांनी बंदुकीचा धाक दाखवून लुटले होते. या गुन्ह्याप्रकारणी पहुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले व त्यांच्या पथकाने या गुन्हयाचा माग काढत पाच लुटारूंना मुद्देमालासह अटक केली आहे. जामनेर तालुक्यातील सोनाळा तेथील शेतकरी कापूस विक्रीचे सात लाख रुपये घेऊन 24 रोजी सोनाळा वरून पहूरला जात असताना चार अज्ञात मोटरसायकल स्वरांनी अडवून चाकूचा व बंदुकीचा धाक दाखवून सात लाख रुपये घेऊन पसार झाले होते याप्रकरणी पहुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: संविधान साक्षरता अभियान घेऊन जळगावचा मुकेश कुरील अठरा दिवसांचा सायकलने प्रवास करून दिल्ली येथे पोहोचला दिल्ली येथे चार दिवस संविधानाचा प्रचार व प्रसार करणार आहे. संविधान साक्षरता अभियान अंतर्गत जळगांव शहरातील मुकेश राजेश कुरील यांचा दिल्ली पर्यंतचा प्रवास 18 दिवसात पूर्ण केला . ५ नोव्हेंबर या दिवशी जळगांव येथुनप्रवास सुरु झाला होता . अभियाना अंतर्गत सर्वांनी संविधान वाचाव आणि आत्मसात कराव असा संदेश देत होते.२३ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे कुरील यांचा संकल्प होता , परंतु मुकेश हे स्वत : शीच शर्यंत करत २२ रोजीच त्यांनी दिल्ली गाठली आहे . जळगांव , बुरहानपुर , आष्टा , भोपाल ,…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आज पहाटे के.सी.पार्कजवळ भीषण अपघात झाला . ट्रॅक्टरने कारला धडक दिल्याने कारमधील दोन जण जागीच ठार झाले. या अपघातात अन्य दुसरी महिला व पुरुष जखमी झाले असून दोघांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले . बुधवारी डंपरच्या धडकेत एका अधिपरिचरिकेला जीव गमवावा लागला आज पहाटे गुरुवारी पहाटे भादली येथील पाटील कुटुंबीय नातेवाईकाला भेटण्यासाठी भोकर येथे कार ( क्रमांक एम एच -१४ – एफ सी ४५५०) ने जात होते. चालक बंडू पाटील होते. कानळदा रस्त्यावरील के.सी.पार्क जकात नाक्याजवळ समोरून भरधाव येणाऱ्या लाकडाने भरलेल्या ट्रॅक्टरने या कारलाजोरदार धडक दिली. अपघातात कारचा पुढील भाग चेन्दामेन्दा झाला असून चालकासह एक महिला जागीच ठार…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : सुरत ते रायपूर असा रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवासी बॅगेतून पाच लाख 63 हजार चोरी केल्याचे प्रकार उघडकीस आला होता रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीला चोवीस तासाच्या आत सुरत येथून मुद्दे माला सह अटक केली आहे. आमदाबाद पुरी एक्सप्रेस ने 21 रोजी सुरत वरून रायपूर येथे जाण्यासाठी गीताबेन योगेश पटेल वय 38 या प्रवास करीत होत्या त्या प्रवास करीत असताना 22 रोजी जळगाव ते भुसावळ दरम्यान पहाटे ४.२० ते ४.४५ वाजेच्या सुमारास चोरट्याने त्यांच्या डोक्याखाली ठेवलेली पर्स चोरून नेली. या पर्समध्ये सोन्याचे मंगळसूत्र, हार, २ चैन, एक रिंग, अंगठी, मोबाईल आणि रोख १ हजार असा ५…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे बोदवड नगरपंचायत साठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीत सर्वांचे लक्ष शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या विवर रचनेकडे राहील हे दोघेही एकत्र येऊन लढणार की आमने-सामने येणार हे पाहणे महत्वाचे राहणार आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायत पहिल्या निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला होता यानंतर खडसे भाजपा सोडून राष्ट्रवादीत गेल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी या ठिकाणी नगरसेवकांना शिवसेनेत आणले होते त्यानंतर दुसरी निवडणूक होत असल्याने सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.बोदवड नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम बोदवड नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे…
चोपडा प्रतिनिधी: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय चोपडा येथील आदरणीय डॉ. शैलेश वाघ यांच्या संकल्पनेतून पर्यावरणाला पूरक केक फ्री ग्रीन कॅम्पस या उपक्रमाला दिनांक २१ नोव्हेंबर २०१९ पासून सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाला दोन वर्ष पूर्ण झालेले असून (21 Nov. 2019 To 21 Nov. 2021) महाविद्यालयातील सर्व बंधू-भगिनींनी सदर उपक्रमास स्वयंम प्रेरणेने सहभाग नोंदविला यामध्ये महाविद्यालयातील कर्मचारीवृंद आपल्या वाढदिवसाला केक न कापता वृक्ष लागवड करून वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प सर्व कर्मचारीवृंद यांनी घेतला. यामुळे पर्यावरण विषयक पोषक वातावरण निर्मिती करण्याच्या उद्देशाने सदर उपक्रम राबविण्यात येत आहे व हाच संकल्प आजही सर्व कर्मचारी वृंद स्वयंप्रेरणेने…

