Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

महात्मा फुले यांचे जीवन कार्य म्हणजे अखंड ऊर्जेचा स्रोत – पी.डी.पाटील सर धरणगांव लक्ष्मण पाटील: महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला आनोरे गावात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त वैचारिक प्रबोधनपर व्याख्यान संपन्न झाले. या प्रबोधनपर व्याख्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरी तुकाराम महाजन यांनी केले.                सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय, सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांना ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. वैचारिक प्रबोधनाचे प्रमुख वक्त्यांचा परिचय पिंप्री चे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सतीश शिंदे सर यांनी करून दिला.              प्रथमतः वक्ते पी.डी. पाटील यांनी तात्यासाहेबांचा जीवनपट…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील समस्त पाटील समाज पंच मंडळाचे संचालक नवल पाटील यांचे सुपुत्र प्रमोद पाटील यांची आर्मी ट्रेनिंग पूर्ण झाल्याबद्दल मित्र परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आल्या. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आर्मी जवान प्रमोद पाटील यांनी त्यांची ९ महिन्यांची ट्रेनिंग बंगळुरू (कर्नाटक) येथे पूर्ण केली. प्रमोदची पहिली पोस्टिंग जम्मू काश्मीर येथे झालेली असून देशसेवेसाठी ते आज रवाना होत आहेत. त्यांचे वडील नवल पाटील यांनी अतिशय कष्टमय जीवनाच्या संघर्षमय प्रवासातून प्रमोदची जडणघडण केली. रसवंती, सेंटिग काम, शेतीची कामे अशी अनेक कष्टाची कामे करून हलाखीच्या परिस्थितीत वडिलांनी मुलाला शिक्षण दिले. मुलाने देखील आई – वडिलांच्या कष्टाचे चीज केले आणि सैन्यात भरती…

Read More

धरणगाव लक्ष्मण पाटील: येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील N S S व रोव्हर रेंजर तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुष्पाजली वाहन्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.बी.एल. खोंडे यांचा हस्ते माल्यर्पण करण्यात आले. वरिष्ठ शिक्षक प्रा.डी.डी. पाटील, प्रा.ए.आर. पाटील, प्रा.एस.आर. पाटील, प्रा. एम. एस. कांडेलकर, माजी N S S कार्यक्रम प्रमुख प्रा.आर.जे. पाटील मॅडम, प्रा. अमित बागुल, प्रा.एन.डी. सोनवणे, प्रा.व्ही टी. बिराजदार, सौरभ डहाडे आदी नी गुलाब पुष्प वाहिली. N S S विभाग तर्फे कार्यक्रम अधिकारी प्रा.पी.सी. साळवे, सहाय्यक कार्यक्रम अधीकारी प्रा.एस.झेड. पाटील, प्रा.यू.व्ही. पाटील, सहाय्यक महिला कार्यक्रम…

Read More

मुंबई वृत्तसंस्था : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ओबीसी समुदायाला २७ टक्के आरक्षण देता येणार नसल्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने  आज राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. याद्वारे राज्य सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती मिळाली असून हा राज्य सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडीनं पाठवलेल्या सुधारित अध्यादेशावर २३ सप्टेंबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली होती. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता मार्गी लागण्याची शक्यता व्यक्ती केली जात होती. राज्यपाल कोश्यारी यांनी अध्यादेशावर सही केल्यानंतर आता त्याचं कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. यानंतर या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. याच्या सुनावणीचा निकाल आज लागला आहे. यात न्यायमूर्ती…

Read More

जळगाव प्रतिनिधी । बांभोरी पुलाजवळ सकाळच्या घटनेनंतर आज दुपारी पुन्हा त्याच ठिकाणी कंटेनर अडकल्याने गेल्या दोन तासांपासून वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. यावेळी दोन्ही बाजूची वाहतूक पुन्हा थप्प झाली असून वाहनधारकांना मनस्ताप करावा लागत आहे. जळगाव येथून जवळ आलेल्या बांभोरी पुलाजवळ आज सकाळी १२ वाजेच्या सुमारास वाळूचे ट्रक्टरचे चाक निखळल्याने राष्ट्रीय महामार्गावर ट्रक्टर बंद पडले होते. यावेळी अर्धा तास दोन्ही बाजूने असलेली वाहतूक थप्प झाली होती. शहर वाहतूक शाखा आणि तालुका पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून ट्रक्टर बाजूल करून रस्ता मोकळा केला होता. ही घटना घडल्यानंतर पुन्हा दुपारी ४ वाजेच्या सुमारास हॉटेल मराठा मटन समोर महामार्गावर पुन्हा कंटेनर अडकले होते.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:  शहरातील रामेश्वर कॉलनीतील मेहरूण परिसरात वादातून चाकूने सपासप वार करून जखमी झालेल्या  पवन उर्फ घातक मुकुंदा सोनवणे याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या गुन्ह्यात दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, रामेश्वर कॉलनी परिसरातील सोळा खोल्या येथे सागर पूनम कंडारे आणि विशाल विजय सपकाळे रा. सिंध्दार्थ नगर रामेश्वर कॉलनी हे अज्ञात कारणावरून शनिवारी ४ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास वाद करत होते. त्यावेळी सागर कंडारे हा मोठमोठ्याने आवाज करून तुमच्या ‘एरीयाचा दादा पवन घातक याला बोलव, तो साला खूप माजला आहे, त्याला सुध्दा बघतो’ असे ओरडत होते. त्यावेळी पवन हा त्याच्या…

Read More

नवी दिल्ली वृत्तसंस्था: कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉनवेरिएंटचा पाचवा रुग्ण दिल्लीत सापडला आहे .नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. आता पर्यत भारतात पाच रुग्ण आढळले आहे.यात कर्नाटकमध्ये 2, गुजरातच्या जामनगरमध्ये 1 आणि महाराष्ट्रात एक आणि आता दिल्लीत एक अशा पाच रुग्णांची नोंद झाली आहे. नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या वक्तीला लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला व्यक्ती 37 वर्षांचा आहे. दिल्ली प्रशासन यामुळं सतर्क झालं आहे. टांझानियातून आला रुग्ण ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला रुग्ण हा टांझानियातून आला होता. संबंधित व्यक्तीचा ओमिक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं आता भारतातील…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव शहरातील पिंप्राळा रोड परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेचा चक्क तीस लाख रुपयांसाठी पतीसह सासरच्यांनी छळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पतीसह चार जणांविरुध्द शनिवार ४ डिसेंबर राेजी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पिंप्राळा रोड परिसरातील लक्ष्मणनगर येथील हर्षा यांचा कलकलत्ता येथील क्रिष्णेंद्र मनोरंजन कुंडू यांच्याशी विवाह झाला आहे. लग्नानंतर काही दिवसांनी पती क्रिष्णेंद्र यांच्यासह सासू नणंद व नंदोई यांनी विवाहिता हर्षा हिस वेळोवेळी शिविगाळ करत मारहाण केली. तसेच माहेरहून तीस लाख रुपये आणावेत म्हणून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला. छळाला कंटाळून हर्षा या माहेरी निघून आल्या. याप्रकरणी हर्षा कुंडू यांच्या तक्रारीवरून शनिवारी पती क्रिष्णेंद्र…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : धरणगाव तालुक्यातील बोरगाव बु. येथील ग्रामसेवक शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या घरात राहत असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना ग्रामपंचायत सदस्या म्हणून पुढे राहण्यास अपात्र घोषित करण्यात आलं आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की, अशोक धोंडू मराठे यांनी वरील प्रकरणी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या नावाने तक्रार अर्ज केला होता. तो मंजूर करत दिलेल्या अर्जानुसार जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडून कार्यवाही करण्यात आली. प्रस्तुत प्रकरणी गुरुवार, दि. २ डिसेंबर २०२१ रोजी जळगाव उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्या वतीने काढलेल्या निकालाच्या सूचना पत्रात धरणगाव तालुक्यातील बोरगाव बु. येथील ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्या मिराबाई शिवाजी पवार यांना शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या घरात राहत असल्याचे सिद्ध झाले…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्ह्य मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष गुलाबराव देवकर यांचा राष्ट्रवादीतर्फे सत्कार राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या कार्यालयात करण्यात आला. त्यावेळी “पुढील निवडणुकांमध्येही यशाची परंपरा अबाधित ठेऊया” असे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे अध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील आणि गुलाबराव देवकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. “गेल्या महिनाभरापासून निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात फिरतोय आणि त्याचे फलित म्हणजे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला विजय झाला.असे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील म्हणाले. शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष देत कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने आपलं कार्य केले आहे. सर्व शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी आपण काम करू या.अधिक चांगल्या पद्धतीने ‘शेतकरी बँक’ म्हणून ओळखली जाणारी…

Read More