लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धरणगाव शहरामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने तरुणीची छेड काढल्याची घटना घडली या घटनेची माहिती समजताच संबंधित पोलिस अधिकाऱ्याला तात्काळ कंट्रोल रूम बदली करण्यात आले. शहरातील एका तरुणीची गवारे नामक पीएसआयने आज छेड काढली. यानंतर भेदरलेल्या तरुणीने याची माहिती कुटुंबियांना दिली. यानंतर परिसरातील नागरिक संतप्त झालेत. घाबरलेल्या पीएसआयने स्वतःला आपल्या घरात कोंडून घेतले. नागरिकांनी पोलिसांना घटना कळविल्यानंतर काही कर्मचारी संबंधित पीएसआयच्या घरी आल्यानंतर ते त्याला सोबत पोलीस स्थानकात घेऊन गेलेत. यानंतर पोलीस स्थानकात शहरातील राजकीय, सामाजिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी आमदार स्मिताताई वाघ, पीसीआब पाटील, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन, दीपक…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: तालुक्यातील शिरसोली ते जळगाव दरम्यान दापोरा शिवारात रेल्वे रुळाजवळ खांबा क्रमांक ४०६/२५ ते ४०६/२७ दरम्यान अंदाजे एका ३० ते ३५ वय गटातील इसमाचा मृतदेह आढळला आहे. शवविच्छेदन कामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव ते शिरसोली दरम्यान दापोरा शिवारातील रेल्वे रुळावर अंदाजे ३० ते ३५ वय गटातील पुरुष धावत्या रेल्वेतुन पडून खाली आल्याने मयत स्थितीत आढळला असल्याबाबत आज बुधवारी १ डिसेंबर रोजी पहाटे ४.४५ वाजता रेल्वे स्टेशनचे उप स्टेशन प्रबंधक सौरभ कुमार यांनी पोलीस स्टेशनला कळविले. त्यानुसार तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: ग्रामसेविका प्रियंका अशोक बाविस्कर यांना जिल्हाधिकार्यांचे ग्रामसेविकेला एक महिने न्यायालयीन कोठडीत टाकण्याचे आदेश दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या ग्रामसेविका भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील ग्रामपंचायतीचे दप्तर ताब्यात देत नव्हते. याबाबत सविस्तर असे की, भुसावळ तालुक्यातील किन्ही येथून बदली होऊनही आपल्या ताब्यातील दप्तर नियुक्त ग्रामसेवकास हस्तांतरित न करणार्या किन्ही येथील तत्कालीन ग्रामसेविका प्रियंका अशोक बाविस्कर यांच्यावर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कठोर कारवाई केली आहे. तत्कालीन ग्रामसेविका बाविस्कर यांनी चुंचाळेला(ता. यावल) बदली होऊनही त्यांच्या कार्यकाळातील ग्रामनिधी, पाणीपुरवठा स्वच्छ भारत मिशन, रोजगार हमी, १४वा वित्त आयोग, दलित वस्ती योजनेची कीर्द, कोणतेही दप्तर देण्याचे बाविस्कर यांनी टाळले होते. याबाबत जिल्हा परिषद…
चेअरमन पदी मुकेश गवंदे तर व्हा चेअरमन पदी रवींद्र वरपे यांची निवड लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: दापोरा येथील दापोरे दुध उत्पादक सहकारी संस्थेची सन २०२१/२०२६ साठी पंचवार्षिक निवडणूक सहकार विभागाकडून घेण्यात आली. सर्व संचालक मंडळ यांची बिनविरोध निवड झाली. या संस्थेच्या चेअरमन व व्हा चेअरमन पदी एक एक अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाली. सहकार विभागाकडून चेअरमन व व्हा चेअरमन पदासाठी सहकार अधिकारी वासुदेव पाटील यांच्या उपस्थित निवडणूक प्रक्रिया पार पडली चेअरमन पदासाठी मुकेश नाना गवंदे व व्हा चेअरमन पदासाठी रवींद्र कृष्णा वरपे यांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी संचालक रवींद्र वसंत काळे, दशरथ भिमराव…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मंत्रिमंडळाने नगरपालिका महानगरपालिकेच्या धर्तीवर नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या जागांमध्ये वाढ केली आहे जिल्हा परिषद ला दहा जागा तर पंचायत समितीसाठी 20 जागा जळगाव जिल्ह्यात वाढलेले आहे यात कोणत्या तालुक्याला किती मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद ला 67 जागा जळगाव जिल्ह्यात होते मंत्रिमंडळाच्या नवीन निर्णयामुळे त्यामध्ये दहा जागांची वाढ होऊन ही संख्या 77 वर गेली आहे जागांची संख्या वाढल्यामुळे अनेक इच्छुकांची संख्याही वाढणार आहे तसेच पंचायत समितीच्या जळगाव जिल्ह्यात 134 जागा होत्या त्यामध्ये 20 ने वाढ होऊन ते 154 वर गेले आहेत जळगाव जिल्ह्यात गट आणि गण यामध्ये झालेल्या वाढीव…
प्रतिनिधी प्रविण पाटील : जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पातील बाल विकास प्रकल्प अधिकारी सुधा गिंधवार या ३६ वर्षाच्या प्रदिघे सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याहस्ते मंगळवारी ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सत्कार करण्यात आला. याबाबत माहिती अशी की, जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पातील बाल विकास प्रकल्प अधिकारी सुधा गिंधेवाला हे ३० नोव्हेंबर रोजी ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने जिल्हा परिषदेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांच्याहस्ते सत्कार केला असून त्यांना पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आला. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: धरणगाव तालुक्यातील बांभोरी बु.येथील मोलमजुरी करणारे देविदास वसंत सोनवणे यांचा चिरंजीव पहेलवान अक्षय देविदास सोनवणे याने नुकतेच गोवा येथे झालेल्या नॅशनल ट्रॅडिशनल कुस्ती स्पर्धेत ‘मास रेसलिंग’ मध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. ऑल इंडिया रेस्टलिंग अंड पैक्रेषन चैम्पियनशिप २०२१ हि स्पर्धा २९ ते ३१ नोव्हेंबर दरम्यान गोवा येथे पार पडली. जागतिक स्तरावरील या स्पर्धेत सुवर्ण मिळविल्यानंतर अक्षयची निवड आंतरराष्ट्रीय स्पर्धेत झाली आहे. १६ डिसेंबर रोजी विदेशात फ्रीलेंड या ठिकाणी जागतिक स्तरावरील पुढील स्पर्धा होणार आहे. त्यात तो सहभागी होणार आहे. त्यासाठी त्याला तत्काळ स्वरुपात पासपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. अक्षयची निवड झाल्याबद्दल त्याच्या गावी त्याचा सत्कार करण्यात आला असून…
आरोपींच्या तात्काळ अटकेची पत्नी मीना जगताप यांची मागणी लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: न्यायालयीन कोठडीत असताना बेदम मारहाणीत मृत्यू झालेल्या चिन्या जगताप हत्याकांडात आज पोलिसांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात तत्कालीन कारागृह अधीक्षकांसह ४ कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे . दरम्यान , तब्बल १४ महिन्यांनी हा गुन्हा दाखल झाला आहे . तत्कालीन कारागृह अधीक्षक पीटर्स गायकवाड , तुरुंगधिकारी जितेंद्र माळी , कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत अशी या आरोपींची नावे आहेत . ११ सप्टेंबर २०२० रोजी जिल्हा कारागृहात झालेल्या मारहाणीत चिन्या उर्फ रवींद्र जगतापचा मृत्यू झाला होता . कारागृह अधीक्षक पीटर्स गायकवाड, तुरुंगधिकारी जितेंद्र माळी , कारागृह पोलीस कर्मचारी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव तालक्यातील बोरणार म्हसावद गटात रुग्णांना ने आण करण्यासाठी रुग्णवाहिका नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता मात्र माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या प्रेरणेने जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष बापूसाहेब परदेशी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष वावडदा सरपंच राजेश वाडेकर यांनी रुग्णवाहिका बुक केली आहे. बोरणार म्हसावद गटातील रुग्णांना जळगाव येथे आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असे त्यामुळे या गटामध्ये रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांच्या प्रेरणेने लवकरच रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे. आज जळगाव येथे जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बोरणार म्हसावद गटातील गोरगरीब रुग्णांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष बापूसाहेब…
प्रतिनिधी प्रविण पाटील : तालुक्यातील जवखेडा येथे 29 रात्री बारा ते सकाळी चार वाजेच्या दरम्यान शेतातील विजेच्या तारांची चोरी झाल्याची माहिती छोटू सरपंच यांनी विद्युत उपकेंद्राचे ज्युनिअर इंजिनिअर यांना दिली असून याची चौकशी करून पोलिसात तक्रार देणार असल्याचे ज्युनिअर इंजिनिअर यांनी सांगितले. तालुक्यातील जवखेडा लोणवाडी रस्त्यावरील २९नोव्हेंबर रात्री १२ते सकाळी ४च्या सुमारास जवखेडा शिवारात शेतातील १९तारांची चोरी झाली आहे .यात डि.पी.तारांची क्रमांक४२३८६९ छोटु सरपंच यांच्या शेतातील डि.पी.वरील ११गाल्यांच्या तारांची व डि.पी.क्रमांक४२३८७०दिपक लोटन पाटील यांच्या शेतातील डि.पी.वरील ८गाल्यांची तारांची चोरी झाल्याची माहिती म्हसावद विद्युत उपकेंद्राचे ज्यु.इंजिनिअर माने मॅडम यांनी दिली आहे. तरी माने मॅडम स्वतः व त्यांचे कर्मचारी शिवाजी काळे…

