लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: एरंडोल येथील भूमिअभिलेख कार्यालयातील प्रमुख भूमापक संजय नामदेव पाटील ( वय-५२ ) यांनी वरिष्ठांच्या जांचाला २३ नोव्हेंबर रोजी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता .आज शुक्रवार ३ डिसेंबर रोजी दुपारी जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत वरिष्ठांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. याबाबत माहिती अशी की, संजय पाटील हे एरंडोल येथील भूमापक कार्यालयात एम.एस. पदावर काम करतात. खडका येथून ते दररोज दुचाकीने अपडाऊन करत होते. सन २०१९ पासून त्यांना वरिष्ठांकडून कामाचा दबाव टाकत होते. त्यामुळे ते गेल्या अनेक महिन्यांपासून तणावात काम करत होते. हा त्रास सहन न…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: लग्नाचे आमिष दाखल जळगाव शहरातील एका भागात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार ३ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीला आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आईवडीलांसह वास्तव्याला आहे. तीन वर्षापुर्वी मुलीचे कुटुंबिय एरंडोल येथे वास्तव्याला होता. दोन वर्षांपुवी जळगाव शहरातील एका दुकानावर काम करणारा हसन असलम मोमीन रा. एरंडोल जि. जळगाव यांची आणि अल्पवयीन मुलीची ओळख निर्माण झाली. तेव्हा त्याने मुलीला लग्नाची मागणी घातली. परंतू हसनला घरच्यांनी परवानगी दिली नाही. पण मुलीच्या आईवडीलांनी विचारले असता आपण आईवडीलांना…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील प्रा.डी.आर.पाटील यांना दि. 3 जानेवारी 2022 रोजी आष्टी जिल्हा बीड येथे इतिहास संकलन संस्थेच्या अधिवेशनात ‘स्व सतीश मित्तल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, इतिहास क्षेत्रात काम करीत असताना संघटनेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. इतिहास संकलन समितीचे भूतपूर्व अध्यक्ष स्व. डॉ सतीश मित्तल यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो. पाचोरा येथील स्व. परशुराम कोंडीबा शिंदे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा हा पुरस्कार या वर्षी धरणगाव येथील दिलीप रामू पाटील यांना घोषित झाला आहे. निवड समिती मध्ये नगर चे प्रा.डॉ.राधाकृष्ण जोशी, बीड चे प्रा.डॉ.मुकुंद…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी आज निवडणूक पार पडली या निवडणुकीत महाविकासआघाडी च्या कोअर कमिटीने ठरविल्या प्रमाणे राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे विराजमान झाले असून उपाध्यक्षपदी शिवसेनेचे शामकांत सोनवणे यांच्या वर्णी लागली आहे.जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत महा विकास आघाडीने वीस जागांवर विजय मिळवला यात 11 जागा या बिनविरोध झाल्या होत्या त्यामुळे बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसवर शिवसेनेचे वर्चस्व आधीच प्रस्थापित झाले होते त्यात महा विकास आघाडीच्या कोर कमिटीने झालेल्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची साठी कोणाला किती संधी मिळणार याचा निर्णय घेण्यात आला होतात या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला तीन…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भडगाव येथे शिक्षण घेत असलेला 9 वितील विद्यार्थी दुपारी शाळा सुटल्या नंतर घरी जात असताना च्युईगम खात असताना च्युईगम त्याच्या श्वासनलिकेत चिपकल्याने त्याच्या मृत्यू झाला. भडगाव तालुक्यातील पाढरद येथील 15 वर्षीय उमेश गणेश पाटील हा विद्यार्थी भडगाव येथील लाडकुबाई विद्यामंदिर या शाळेत इयत्ता नववीतशिकत होता. गुरुवारी दुपारी शाळा 3.30वाजेला सुटल्यानंतर त्याने च्युईंगम घेतली. गावीजाण्यासाठी रिक्षात बसला. ही च्युईंगम त्याच्या श्वासनलिकेत अडकली. त्यामुळे त्याला अस्वस्थवाटू लागले.त्याला भडगाव येथे खाजगीदवाखान्यात आणण्यात आले. डॉक्टरांनी त्याला पाचोरा येथे घेऊन जाण्यास सांगितले. त्याला पाचोरायेथे नेत असतानाच वाटेतच त्याची प्राणज्योत मालविली. गुरुवारी त्याचा गणिताचा पेपर होता. त्याने परीक्षा दिली. दुपारी च्युइंगम चघळत असतानाच…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चोपडा येथील राहणाऱ्या युवकाने आपल्या पत्नीला तोंडी तलाक दिला होता.याच्या विरोधात चोपडा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला असून पतीचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. या संदर्भात माहिती अशी की, चोपडा येथील मुस्तफा कॉलनीतील रहिवासी रईसोद्दीन रफीयोद्दीन जहागीरदार याचा जुलै २०१९ मध्ये एका तरुणी सोबत विवाह झाला होता. विवाह होऊन तीन वर्षा झाले होते रईसोद्दीने आपल्या पत्नीला माहेरून पैसे आणावेत म्हणून छळ केला. यानंतर त्याने २४ नोव्हेंबर २०२१ रोजी आपल्या पत्नीला तोंडी तिहेरी तलाक देऊन तिच्या माहेरी पाठवून दिले. या अनुषंगाने संबंधीत महिलेच्या तक्रारीवरून रईसोद्दीन आणि त्याच्या आईच्या विरोधात चोपडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील। तालुक्यातील लोणे गावाजवळ भरधाव आयशरची दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. ट्रक चालकाला नागरीकांनी चोप देवून पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील लोणी फाटा गावाजवळून दुचाकी (एमएच १९ डीपी ८६०२) ने ट्रीपल सीट जात असतांना समोरून येणाऱ्या आयशर (एमएच १९ झेड ३२४३) ने जोरदार धडक दिल्याची घटना आज शुक्रवार ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता घडली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. तर अन्य दोन गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीन धरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल…
अध्यक्षपदी तीन वर्ष राष्ट्रवादी या दोन वर्षे शिवसेनाफॉर्म्युला ठरला लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका पार पडल्या असून जिल्हा मध्यवर्ती बँकेवर 21 पैकी 20 संचालक महा विकास आघाडीचे आले आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी व शिवसेनेला संधी राहील तर उपाध्यक्षपदी तिन्ही पक्षांच्या उमेदवारांना संधी मिळणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत नुकतीच निवडणूक पार पडली यात जिल्हा मध्यवर्ती बँकेत महा विकास आघाडीचे 20 संचालक निवडून आले आहेत आज अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी बैठक पार पडली या बैठकीत राष्ट्रवादीकडून एकनाथराव खडसे शिवसेनेकडून पालक मंत्री गुलाबराव पाटील काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्यासह सर्व संचालक मंडळ…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसमधील खात्यातून पैसे काढून बँकेत जाणाऱ्या वृद्धाच्या पिशवीला चिरा मारून अज्ञात चोरट्यांनी १ लाख रुपये लांबवल्याची घटना आज जळगावात घडली . रामेश्वर कॉलोन परीसरात एकनाथनगरातील रहिवाशी देवराम बाबुलाल चौधरी ( वय ७२ ) मजुरी करून उदरनिर्वाह करतात . त्यांनी जळगाव शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसमधील बचत खात्यात दीड लाख रुपये बचतीतून जमवले होते . पोस्टातील बचत खात्यात व्याज कमी मिळते म्हणून त्यांना ते पैसे इतर बँकेतील खात्यात टाकायचे होते . त्यासाठी घरी आणलेली पैसे काढण्याची स्लिप त्यांनी नातवाकडून भरून घेतली आणि पोस्ट ऑफिसमधून आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास पैसे काढले . पैसे काढल्यावर पोस्टातील रोखपाल…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पावसामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात जाणारी क्रुझर गाडी 1 च्या रात्री 10.30 वाजेला पलटी होऊन त्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील हिरापुर गावा जवळ नांदगाव रस्त्यावर घडली आहे. पाचोरा तालुक्यातील डोंगर गाव येथील काही मजूर नांदगाव कडे जात असताना चाळीस तालुक्यात असलेल्या हिरापूर गावाजवळ क्रुझर एम एच 19 ए सी 5604 ही गाडी पलटी झाल्याने त्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला . तर दहा जण जखमी झाले असून त्यातील दोन जण गंभीर असल्याने त्यांना धुळे येथे रात्री रवाना करण्यात आले आहे तर चार जणांवर चाळीसगाव सरकारी रुग्णालयात…

