लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : दिव्यांग दिनाचे औचित्य साधत वर्धमान भाऊ धाडीवाल मित्र परिवाराच्या वतीने दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम अंधशाळा चाळीसगाव येथे संपन्न झाला. व्यासपीठावर चाळीसगावचे तहसीलदार श्री.अमोल मोरे साहेब,श्री.के. के.पाटील साहेब(पोलीस निरीक्षक),श्री.नंदकुमार वाळेकर साहेब(गट विकास अधिकारी),श्री.वर्धमान भाऊ धाडीवाल(जनसेवक), मीनाक्षीताई निकम,श्री. कापडणीस साहेब(सहाय्यक पोलीस निरीक्षक)श्री.चौधरी साहेब(समाज कल्याण विभागाचे अधिकारी)श्री. अरुण बापू निकम(सचिव राष्ट्रीय शिक्षण संस्था.)श्री किसनराव जोर्वेकर(संपादक दैनिक सर्वांचा ग्रामस्थ)श्री. रमेश चव्हाण(माजी उपनगराध्यक्ष),नगरसेवक श्री.सुरेश स्वार, श्री.रामचंद जाधव,श्री. दीपक पाटील ,श्री.सोमसिंग राजपूत,डॉ.अनुप पवार,डॉ. हरिष दवे,श्री.योगेश भोकरे श्री.पवार गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथमतः सर्व मान्यवरांना वृक्षाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर तहसीलदार अमोल मोरे यांनी आपल्या…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावळ येथून जवळ असलेल्या दिपनगर जवळ काल रात्री प्रहार जनशक्ती पक्षाचे भुसावळ तालुका अध्यक्ष यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. दरम्यान या घटनेचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून गुन्हा नोंद केला. दिपनगर नजीक हॉटेल सरगम जवळ महामार्गालगत मंगळवारच्या रात्री अज्ञात हल्लेखोरांनी महेश पटेल यांच्यावर हल्ला केला आहे. जखमी पटेल यांना वैद्यकीय उपचारार्थ सुरुवातीला ट्रामा केअर व नंतर साईपुष्प हॉस्पीटल भुसावळ येथे दाखल करण्यात आले आहे. विजय कैलास सोनवणे आणि महेश पटेल हे दोघे जण बुलेटने जात असतांना संतोष विश्वनाथ भगत याने दारुच्या नशेत दोघांना अडवले. तुला बघून घेईन तुझ्यावर अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेन असे म्हणत संतोष…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज – सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण रद्द करण्याच्या झालेल्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून सद्यस्थितीत जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीतील ओबीसी राखीव जागांवरील निवडणूक स्थगीत करण्यात येत असून अनुसूचित जाती, जमाती व सर्वसाधारण जागांवरील निवडणूक प्रक्रिया घेण्यात येत असल्याचे जाहिर केले आहे. त्यात जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीतील ओबीसी वार्ड मधील निवडणूक रद्द करण्यात येत असल्याचे निर्देश आहेत. तर जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीसाठी मंगळवारी ७ डिसेंबर अखेर अर्ज दाखल झाले असून ओबीसी वार्डच्या निवडणूकाच रद्दचे आदेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुप्रीम कोर्टाकडून महाराष्ट्र सरकारने निर्देशित केलेल्या स्थानिक स्वराज संस्थांमधील ओबीसी आरक्षणासाठी जाहिर करण्यात आलेल्या अध्यादेशाला स्थगिती दिली आहे. …
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 231ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आले होते तर 168 अर्जाचे टोकन जमा करण्यात आले होते मात्र या निवडणुकीत कोणत्या पक्षाने किती अर्ज भरले याचे चित्र अजूनही स्पष्ट झालेले नाही असे असले तरी सकाळ पासून बोदवड शहरात वीज गुल होती त्यामुळे उमेदवाराची अर्ज भरण्यासाठी धावपळ झाली. बोदवड नगरपंचायतीच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकी साठी आज नामनिर्देशन भरण्याची शेवटची तारीख होती मात्र बोदवड शहरात सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसून आली ,चार ते साडेचार वाजेच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन भरण्यासाठी एकच गर्दी केली होती . अर्ज…
धरणगाव (प्रतिनिधी)। धरणगाव तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका तरूणावर धरणगाव पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर संशयित आरोपी फरार आहे. धरणगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी, आई, बहिण आणि भावासोबत वास्तव्याला आहे. सोमवारी ६ डिसेंबर रोजी घरातील सर्वजण जेवण करून रात्री ८ वाजता झोपले. त्यावेळी अल्पवयीन मुलगी देखील झोपलेली होती. रात्री ९ वाजता पिडीत मुलगी लघुशंकेसाठी उठली असता त्याच गल्लीतील संशयित आरोपी योगेश दिनकर कोळी याने मागून येवून अल्पवयीन मुलीचे तोंड दाबले त्यानंतर तिला ओढत नेत त्याच्या…
धरणगाव लक्ष्मण पाटील : येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयातील 18 वर्ष आतील मुलींच्या गटातून जिल्हा स्तरावर झालेल्या क्रॉसकंट्री अजिंक्यपद स्पर्धेत शाळेतील रूपाली विजय कुंभार ही जिल्ह्यातून प्रथम प्रीती तापीराम इंगळे ही द्वितीय आली यांनी 3 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत जिल्हा स्तरावर घवघवीत यश संपादन केले. त्यांची आता राज्यस्तरावर निवड झालेली असून त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे सचिव प्रा. रमेश महाजन यांनी विद्यार्थिनी खेळाडूंचं गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केलं व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे अध्यक्ष हेमलालशेठ भाटिया व उपाध्यक्ष अंकुश पाटील आणि सर्व संचालक मंडळ यांनी सुद्धा त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : येथील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल चे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांना ओ.बी.सी.शिक्षक असोशिएशन तर्फे दिला जाणारा “गुरुगौरव पुरस्कार – २०२१” जाहीर झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, ओ.बी.सी. विद्यार्थी – शिक्षक – पालक विकास असोसिएशन यांच्या वतीने दरवर्षी २८ नोव्हेंबर तात्यासाहेब महात्मा ज्योतीराव फुले यांच्या स्मृतीदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करित असते. या दिनाचे औचित्य साधून अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या पाच जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना “गुरुगौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येत असते. यावर्षी २८ उपक्रमशील शिक्षकांना पुरस्कार देऊन दि. २५ डिसेंबर, २०२१ रोजी धुळे येथे गौरविण्यात येणार असल्याची माहिती ओ.बी.सी.शिक्षक असोसिएशनचे अध्यक्ष…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: यावल तालुक्यातील किनगाव येथील तरूण कौटुंबिक वादातून बेपत्ता झाला होता. आज या बेपत्ता झालेल्या तरूणाचा गावालगत असलेल्या शेतविहीरीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. किनगाव येथील मयत तुषार गोपाळ राणे (वय-३२) असे तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, किनगाव तालुका यावल येथील रहिवाशी तुषार राणे, आई आशा गोपाळ राणे आणि पत्नी रत्ना तुषार राणे हे वास्तव्याला असून तुषार व त्याची पत्नी अशा यांच्यात कौंटुबिक वाद सुरू होता. त्यामुळे तुषार हा गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. रविवारी ५ डिसेंबर रोजी तुषार व त्याची आई आशा यांनी…
धरणगाव लक्ष्मण पाटील : शहरालगत असलेल्या १ एकर जागा ही गायरानसाठी राखीव असतांना त्यावर अतिक्रमण केले जात आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते शिरीष बयस यांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. याच्या निषेधार्थ ८ डिसेंबर २०२१ रोजी शांततेत मुक मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत माहिती अशी की, धरणगाव शहराच्या लगत असलेल्या अमळनेर रोडवर ३ हेक्टर ५१ आर जागा ही पुर्वापार गायरान म्हणून वापर केला जात आहे. सातबारा उताऱ्यावर देखील गायरान असल्याचा उल्लेख आहे. परंतु शहरातील काही समाजकंटकांनी मुंबई येथील मानवसेवा संकल्प प्रतिष्ठानला हाताशी घेवून सदरील गायरानची जागा हडप करण्याच्या हेतूने या जागेवर बेकायदेशीर बांधकाम केले आहे. यासंदर्भात सामाजिक…
धरणगाव लक्ष्मण पाटील : येथील शतकोत्तर परंपरा असलेल्या पी. आर. हायस्कूल मध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. ज्येष्ठ शिक्षक बापू शिरसाठ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. उपमुख्याध्यापक आर. के. सपकाळे, ज्येष्ठ शिक्षक कैलास वाघ, उमाकांत बोरसे, एनसीसी आफिसर डी.एस. पाटील , सी.ए. शिरसाठ , डॉ. वैशाली गालापुरे मॅम, सुरेखा तावडे मॅम, वंदना डहाळे मॅम, ग्रंथपाल विराग बाजपेयी, यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने पूजन करून अभिवादन केले. शाळेचे कला शिक्षक राजेश खैरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे…

