लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पावसामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात जाणारी क्रुझर गाडी 1 च्या रात्री 10.30 वाजेला पलटी होऊन त्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील हिरापुर गावा जवळ नांदगाव रस्त्यावर घडली आहे.
पाचोरा तालुक्यातील डोंगर गाव येथील काही मजूर नांदगाव कडे जात असताना चाळीस तालुक्यात असलेल्या हिरापूर गावाजवळ क्रुझर एम एच 19 ए सी 5604 ही गाडी पलटी झाल्याने त्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला . तर दहा जण जखमी झाले असून त्यातील दोन जण गंभीर असल्याने त्यांना धुळे येथे रात्री रवाना करण्यात आले आहे तर चार जणांवर चाळीसगाव सरकारी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत .
प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना धुळे रवाना केले असले तरी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे
जिल्ह्यात अवकाळी पासून सुरू असल्याने भरधाव वेगात जात असलेल्या क्रुझार गाडी वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली होती यातील चार जन गाडी खाली दबक्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर काही जण गाडीत अडकुंन पडले होते त्यांना परिसरातील नागरिकांनी मदतीला धाऊन येत रुग्णालयात भरती केले आहे त्यातील चार ते पाच जन गंभीर रित्या जखमी आहेत त्यांच्या वर चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत
एकाच गावातील हे मजूर ठार झाल्याने पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव परिसरात शोक कळा पसरली आहेल