त्याग, समर्पण आणि बलिदान म्हणजेच बाबासाहेब- पी.डी.पाटील सरधरणगाव लक्ष्मण पाटील : येथील पिंपरी खु. येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रबोधनपर व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. वैचारिक प्रबोधनपर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श शिक्षक सतिश शिंदे यांनी केले. प्रास्ताविकात बहुजन महापुरुषांची विचारधारा जनमानसात रुजविणारे वैचारिक कार्यक्रम झाले पाहिजेत आणि त्याच उद्देशाने आजचा कार्यक्रम आयोजित केला, असे मत कार्यक्रमाच्या सुरवातीला शिंदे सरांनी व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपीन रावत व त्यांच्या सर्व साथीदारांना सार्वजनिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
धरणगाव लक्ष्मण पाटील : वर्ल्ड व्हिजन इंडिया व तहसिल कार्यालय धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमनाने पाळधी ला 50 निराधार महिलांना किराणा सामानाचा किट वितरित करण्यात आला. तालुक्यातील पाळधी येथे 10 रोजी वर्ल्ड व्हिजन इंडिया व तहसिल कार्यालय धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण 50 निराधार महिलांना पत्तीशे रुपयांचा एका महिन्याचा किराणा किट व पुढील महिन्याचे किराणा व्हाउचर वितरित करण्यात आले. या प्रसंगी माजी सभापती मुकुंद नन्नवरे, सरपंच पाळधी सुधिरभाऊ पाटील, पं.स. सदस्य सचिन पवार, एकलग्न सरपंच संजय पाटील, तहसिलदार नितीनकुमार देवरे, वर्ल्ड व्हिजन चे मुख्य अधिकारी अनिल तेजप्पा, विजय राऊत, तलाठी प्रशांत पाटील, मंडळ अधिकारी अमोल पाटील हजर होते.
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : पाचोरा शहरातील सिंधी कॉलनी परिसरात तरूणाचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी ३ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने पोबारा केला आहे. पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कैलास सुरेशकुमार कुकरेजा (वय-३४) रा. सिंधी कॉलनी पाचोरा, हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ८ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या दरम्यान कैलास कुकरेजा हे घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. आज्ञात चोरट्यांनी अवघ्या २० मिनीटात घराचा कडी कोयंडा तोडून घरातील ३ लाख ८ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने लांबविले. याप्रकरणी कुकरेजा यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : भडगाव तालुक्यातील गुढे ते कोळगाव रोडवर वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरवर महसूल विभागाने पहाटे कारवाई केली. यात एकाला ताब्यात घेतले परंतू कारवाई करत असताना सोबत असलेल्या दुसऱ्याने वाळूने भरलेले ट्रक्टर घेवून पसार झाला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील गुढे ते कोळगाव रस्त्यावर वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार महसुल पथकातील कोतवाल राजेंद्र तुकाराम थोरात (वय-४५) रा. कोळगाव ता. भडगाव यांनी ९ डिसेंबर रोजी पहाटे चार वाजता कारवाई करत संशयित आरोपी दादु उर्फ कैलास पाटील याला ताब्यात घेतले. महसूल विभागाने कारवाई केल्याचे पाहून…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगावात एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या एक महिन्यापासून संप सुरू आहे या संपात सहभागी असलेल्या रावेर डेपोतील बस चालकाला निलंबित करण्यात आले होते यामुळे आज दुपारी एक वाजेच्या सुमारास काहीतरी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र उपस्थित कर्मचारी च्या सावधगिरी मुळे त्याचे प्राण वाचले. रावेर तालुक्यातील तांदळवाडी येथील रहिवासी राहुल विश्वनाथ कोडी वय वर्ष 35 हा रावेर डेपो मध्ये बस चालक आहे गेल्या एक महिन्यापासून सुरु असलेल्या संपामध्ये तोही सहभागी झालेला असून या कारणामुळे त्याला आज निलंबित करण्यात आल्याचे पत्र मिळाले होते एकीकडे संपत सुरू आहे तर दुसरीकडे निलंबनाची कारवाई यामुळे नैराश्य आलेल्या कोंडीने आज…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : वरणगाव महामार्गावर असलेल्या हॉटेल व ढाब्यांवर उभ्या असलेल्या गाड्यांमधून डिझेल चोरी करणारे तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्याकडून गाडी ,डिझेल व डिझेल चोरी करण्याचे साहित्य असे 4 लाख 79 हजाराचा 10 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महामार्गावर असलेल्या हॉटेल्स व ढाब्यांवर उभे राहणाऱ्या गाड्यांमधून गेल्या वर्षभरापासून डिझेल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती अशाच डीजल चोरी करणार्या टोळीची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले याना मिळाली होती . मिळालेल्या माहितीच्या आधारे पोउनि अमोल देवढे,सफै अशोक महाजन युनूस शेख सुनील दामोदरे जयंत चौधरी दीपक पाटील महेश महाजन नंदलाल पाटील प्रमोद…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील एका तरुणांची लोन मजूर करण्यासाठी विविध प्रकारे त्याच्याकडून ऑनलाईन ८ लाख ३४ हजाराचा गंडा घातला. याप्रकरण सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबात माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथे गजानन लक्ष्मण सोनवणे (वय-३७) हा आपल्या कुटुंबा सोबत राहत असून तो २७ सप्टेंबर रोजी त्यांला बजाज फायनान्स प्रतिनिधी नावाने बनावट कॉल आला. त्यांनी बजाज फायनान्स कडून ५ लाख रूपयांचे पर्सनल लोन मंजूरी करून देण्याच्या बहाण्याने वेगवेगळ चार्जेस लावण्यात आल्याचे सांगून त्यांच्याकडून ८ लाख ३४ हजार ८१७ रूपये ऑनलाईन पध्दतीने स्वाकारले. त्यानंतर समोरील व्यक्तीने बजाज फायनान्सचे लोन मंजूरीचे बनावट…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पनवेल एक्सप्रेसमधून प्रवास करणार्या महिलेची पर्स लांबविणार्या चोरट्याला लोहमार्ग पोलिसांनी सहा तासात गजाआड केले आहे.त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संदर्भात वृत्त असे की, मुंबईतील अंधेरी ईस्ट या भागातील रहिवासी मोहंमद अहमद अब्दुल गनी (वय ३५) हे कुटुंबासह मंगळवारी पनवेल एक्स्प्रेसने नवागढ ते पनवेल असा प्रवास करत होते. ही गाडी भुसावळ जंक्शनवर थांबली.मोहंमद अहमद अब्दुल गनी याच्या पत्नी वॉशरुमला गेल्या होत्या आणि , तर मोहंमद अहमद अब्दुल गनी हे प्लॅटफॉर्मवर उतरले होते. या संधी फायदा घेत चोरट्याने मोहंमद गनी यांच्या पत्नीची पर्स चोरली. त्यात 57 हजार 72 रूपयांचे सोन्याचे दागिने, 10 हजार 500 रूपयांचा मोबाइल होता.असा…
जळगाव प्रतिनिधी : मद्यधुंद अवस्थेत जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात गोंधळ घालणार्या दोघांना अटक करण्यात आली आहे.त्याच्याविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याबाबत वृत्त असे की, जितेंद्र अरुण चांगरे (वय ४५, रा. सिंधी कॉलनी) व निखिल राजू सोनवणे (वय २२, रा. कुसुंबा) हे दोघे सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत पोलिस अधीक्षक कार्यालयात गेले होते. तेथे त्यांनी आरडाओरड करून गोंधळ घातला. सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी जिल्हापेठ पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणले. त्यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांनी मद्यपान केल्याचे तपासणीत आढळून…
बोदवड नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम बोदवड नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे यात अंतिम प्रभाग निहाय याद्या अधिप्रमाणित 29 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात याव्यात. जिल्हाधिकाऱ्याने निवडणूक कार्यक्रम 30 नोव्हेंबर रोजी जाहीर करावा नामनिर्देशन पत्र व राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याचा कालावधी -1 डिसेंबर 2021 सकाळी 11 वाजेपासून ते 7 डिसेंबर 2021 दुपारी 2 वाजेपर्यंत नाम निदर्शन पत्र स्विकारण्याची कालावधी –1 डिसेंबर 2021 ते 7 डिसेंबर 2021 11 ते 3 वाजे दरम्यान राहील तसेच 4 डिसेंबर 5 डिसेंबर या दिवशी सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशन पत्रांची छाननी व वैधता रित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात…

