Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव हे अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे विशेष करून जळगावचे सोने हे 52 कशी साठी प्रसिद्ध आहे मात्र गॅस सोन्याची किंमत प्रत्येकालाच कळते असे नाही. जळगाव तसेच खान्देशचे नेते नाथाभाऊ हेसुद्धा बावन कशी सोने आहे त्यांची किंमत राष्ट्रवादीला पकडली व ते आमच्या खातर राष्ट्रवादीत आले त्याचा आम्हाला अभिमान आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुसावळ येथील राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्यात मार्गदर्शन करताना काढले . जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भुसावळ नगरपरिषद च्या विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर भुसावळ येथील डी एस हायस्कूल प्रगणावर राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा मेळावा संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शेतातील विजेच्या डीपीवर काम करताना उच्च दाब विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने पंचवीस फुटांवरून खाली पडलेल्या तरुणावर येथील शिरसोली रस्त्यावरील देवकर हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेशिवाय यशस्वी उपचार करण्यात आले. पंधरा दिवसांच्या उपचारानंतर या रुग्णाला आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी नातेवाईकांनी येथील डॉक्टरांच्या टीमचे तोंड भरून कौतुक केले. निंभोरा ता. (धरणगाव) येथील रहिवासी असलेले विलास पुंडलिक बोरसे (वय 48) हे मका लागवडीसाठी शेतात गेले होते. त्यावेळी त्यांच्या कृषी पंपाला वीज पुरवठा करणाऱ्या ट्रांसफार्मर वरून वीज गेली. त्यामुळे विलास बोरसे हे ट्रांसफार्मरवर काम करण्यासाठी चढले. मात्र अनवधानाने त्यांचा हाताचा स्पर्श ट्रांसफार्मरवर असलेल्या उच्चदाब क्षमतेच्या तारांना लागला आणि ते पंचवीस फूट खाली…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : भुसावळ येथे झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भुसावळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह वीस सावदा येथील नगराध्यक्ष व इतर कार्यकर्ते यांनी नामदार अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यामुळे भुसावळ सावदा पळसपुर या ठिकाणी भाजपला मोठा धक्का बसला आहे. भुसावळ नगरपरिषद चे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण गोडे यांनी आज नामदार अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर या सोबत भाजपाचे वीस नगरसेवकांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून भुसावळ मध्ये भाजपाला मोठे खिंडार पडले आहे तर याच बरोबर सावदा येथील नगराध्यक्ष अनीता येवले फैजपूर येथील नगरसेवक कार्यकर्ते जामनेर येथील कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय आहे. या व्यवसायातून आर्थिक सुबत्ता येण्यास मदत होते. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सहकार चळवळीचे बळकटीकरण आवश्यक आहे. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत झाली पाहिजे, अशीच सरकारची भूमिका आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, जळगाव यांच्या पाच लाख लिटर क्षमतेचा नवीन आधुनिक दूध प्रक्रिया प्लँट आणि नवीन दुग्धजन्य पदार्थ उत्पादन प्लँटचा उदघाटन सोहळा आज सकाळी पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नवीन आधुनिक दूध प्रक्रिया प्लँटचे, तर पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते श्रीखंड, लस्सी व पनीर या…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : ओबीसी आरक्षण येत्या तीन महिन्यात मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून ओबीसींची जनगणना करण्यात येणार असून त्यातून  राजकीय आरक्षणाचा विषय सोडविण्यात येईल , तसा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाला असल्याचे   उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जळगावात  येथे झालेल्या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. तीन महिन्यानतंर एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणुका घेता येऊ शकतील, असेही ना अजित पवार म्हणाले असून एस टी कर्मचाऱ्यांनी तुटेपर्यंत ताणू नका. टोकाची भूमिका घ्यायला लावू नका’, अशा शब्दांत ना .अजित पवार यांनी संपात सहभागी एस.टी.कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. जळगाव येथे आज जिल्हा दौऱ्यावर आले असता सकाळी 9 वाजेला जिल्हा नियोजन भवनात आढावा बैठक संपन्न झाली .या…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख अनिल बाबुलाल सूर्यवंशी यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांचेकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. पाचोरा येथील प्रो. डॉ. जिजाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनात हिंदी विषया अंतर्गत “ज्ञानप्रकाश विवेक की ग़ज़लों का चिंतनपरक अनुशीलन” या विषयावर त्यांनी पीएच.डी.चा संशोधन प्रबंध सादर केला. या पीएच.डी. संशोधन कार्यासाठी कला शाखेचे माजी आधिष्ठाता प्रा.डॉ. मधु खराटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. अनिल बाबुलाल सूर्यवंशी यांना शिक्षण क्षेत्रातली पीएच.डी. ही उच्च पदवी मिळाल्याबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष एड. संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्षा श्रीमती. आशाताई पाटील, सचिव डॉ. स्मिताताई…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : अमळनेर येथील बोरी नदीपात्रात आज सकाळी पोलीस प्रशासन, महसूल व आरटीओ विभाग यांनी  बैलगाडीच्या सहाय्याने वाळू चोरी करणाऱ्यांवर संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली. अमळनेर येथील बोरी नदीपात्रात आज सकाळी पोलीस प्रशासन, महसूल व आरटीओ विभाग यांनी वाळू चोरी करणाऱ्यांवर संयुक्तरित्या कारवाई केली. बोरी नदीपात्रात  बैल गाडी च्या सहाय्याने वाळू चोरी करणाऱ्यांना पकडून पोलीस बंदोबस्तात थेट तहसील कार्यालयात आणण्यात आले होते. कारवाईत जप्त केलेल्या बैल गाड्या 15 असून 30 बैल जोडी  व 15 धुरकरी  जमा करण्यात आले आहे याना तहसील कार्यालय येथून गुन्हे दाखल करण्यासाठी सायंकाळी  पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. कारवाईत टेम्पो धारकांवर वाळू चोरीचे गुन्हे दाखल…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज (विशेष प्रतिनिधी) नंदुरबार जिल्ह्यातील सारंखेडा यात्रा घोडेबाजार साठी जसे प्रसिद्ध आहे तशीच ती येतील दत्त मंदिरासाठी हे प्रसिद्ध आहे यावेळी जरी घोडेबाजार भरणार असला तरी मात्र इतर दुकानांना प्रशासनाने परवानगी नाकारल्याने व्यापारी व छोटे दुकानदारांचा हिरमोड झालेला दिसत आहे. कोरोना मुळे घोडेबाजार व दत्त भगवान ची यात्रा बंद होती कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळेया वर्षी घोडेबाजार असल्याने अश्वप्रेमी खरेदीदार आणि व्यापाऱ्यांमध्ये चैतन्य दिसत आहे. मात्र प्रशासनाने इतर खेळणी साहित्य, मनोरंजनाचे, शेती साहित्य, मसाले पदार्थ दुकान, कटलरी, शीतपेये दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने आदी सर्व स्टॉल यांना परवानगी दिलेली नाही यामुळे या विक्रेत्यांचा हिरमोड झाला आहे.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शुक्रवार दि.17 डिसेंबर 2021 रोजीचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे. शुक्रवार दि. 17 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.55 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन. नंतर मोटारीने प्रयाण. सकाळी 8.15 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 8.55 वा मोटारीने प्रयाण. सकाळी 9.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आगमन. सकाळी 9.00 वा. जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा व जळगाव जिल्ह्यातील कोविड-19 विषाणू प्रादूर्भाव व उपाययोजनांचा आढावा. सकाळी 10.50 वा. मोटारीने प्रयाण. सकाळी 11.00 वा. जळगाव जिल्हा दुध संघाचे आवार, शिवाजीनगर, जळगाव येथे आगमन. सकाळी 11.00 वा. जळगाव जिल्हा सहकारी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत जळगाव व भुसावळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून यासाठी जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जळगाव उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवार दिनांक १७ डिसेंबर रोजी जिल्हा दौर्‍यावर येणार आहेत. जळगाव आणि भुसावळ येथे आयोजीत करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. जिल्हा दूध संघाच्या नवीन प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. १७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता अजिंठा विश्रामगृहावर भेटी आणि बैठक, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर भुसावळ येथे आयोजीत कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तर भुसावळ येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासह अन्य…

Read More