धरणगाव लक्ष्मण पाटील : वर्ल्ड व्हिजन इंडिया व तहसिल कार्यालय धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमनाने पाळधी ला 50 निराधार महिलांना किराणा सामानाचा किट वितरित करण्यात आला.
तालुक्यातील पाळधी येथे 10 रोजी वर्ल्ड व्हिजन इंडिया व तहसिल कार्यालय धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण 50 निराधार महिलांना पत्तीशे रुपयांचा एका महिन्याचा किराणा किट व पुढील महिन्याचे किराणा व्हाउचर वितरित करण्यात आले. या प्रसंगी माजी सभापती मुकुंद नन्नवरे, सरपंच पाळधी सुधिरभाऊ पाटील, पं.स. सदस्य सचिन पवार, एकलग्न सरपंच संजय पाटील, तहसिलदार नितीनकुमार देवरे, वर्ल्ड व्हिजन चे मुख्य अधिकारी अनिल तेजप्पा, विजय राऊत, तलाठी प्रशांत पाटील, मंडळ अधिकारी अमोल पाटील हजर होते.