मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक… लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा फैलाव वाढत असल्याचं राज्य सरकारची डोकेदुखी आणि नागरिकांसाठी चिंता वाढली आहे. राज्यात आज ओमिक्रॉनचे 23 नवे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सची बैठक झाली. राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर या बैठकीत चर्चा झाली. टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे सण-उत्सव लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल, तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : 17, 18 व 19 तारखेला सोलापूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय 8 व्या स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन स्पर्धेत जळगाव जिल्हा टीमने चांगले प्रदर्शन करत घवघवीत यश मिळवले आहे. जळगाव जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दिव्या भोसले व जिल्हा सचिव योगेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्याने सोलापूर येथे राज्यस्तरीय स्पर्धेत नेतृत्व केले. स्पर्धेत जळगाव जिल्हा टीम तर्फे कबड्डी, व्हॉलीबॉल, कुस्ती, धावणे, आर्चरी, स्विमिंग, बॅडमिंटन,चेस व गोळा फेक या स्पर्धेत जिल्हाभरातून 98 खेळाडू सहभागी झाले होते. त्यात व्हॉलीबॉल टीम (चोपडा) ला सिल्व्हर मेडल, स्विमींग मध्ये ऋषिकेश पाटील (चोपडा) गोल्ड मेडल, चेस स्पर्धेत मध्ये राहुल लोहार यांना गोल्ड मेडल (चोपडा),…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : चोपडा येथील नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कुंटनखान्यावर पोलीसांनी छापा टाकला आहे. या छाप्यात २३ तरूणींची सुटका करण्यात आली आहे. यावेळी वेश्या व्यवसाय करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी ११ महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागच्या परिसरात अवैधरित्या कुंटनखाना सुरू असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक ऋषीकेश रावले यांना मिळाली होती. सहाय्यक अधीक्षक रावले यांच्या माहितीनुसार चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण आणि चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्यासह पथकाने बुधवारी २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास नगरपालिकेच्या पाठीमागच्या परिसरात असलेल्या…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जामनेर तालुक्यातील पाचोरा रस्त्याकडे जाणाऱ्या टाकळी गावाजवळ नागदेवता मंदिर परिसरात भरधाव जाणाऱ्या आयशर वाहनाने इंडिका कारला कट मारल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. इंडिका कार नाल्यात कोसळून त्यातील एक पुरुष व महिला जागीच ठार झाले उपचार सुरू असताना एकाचा मृत्यू झाला आहे आज रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. यात आणखी 2 जण अत्यवस्थ असून सहा महिन्याचे बाळ अपघातातून वाचले आहे. याबाबत माहिती अशी की, भुसावळ येथील नागरिक पाचोराच्या दिशेने लग्नकार्याच्या निमित्ताने इंडिगो कार क्र. (एम एच १८ डब्ल्यू २४१२) ने निघाले होते.कार पकंज गोविंदा सैंदाणे (वय-२५, रा. तुकाराम नगर, भुसावळ) हे चालवत होते. कारमध्ये सुजाता…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : यावल तालुक्यातील किनगाव येथील २७ वर्षीय तरूणाने प्रेमभंग झाल्याच्या कारणावरून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील किनगाव येथील राजू महाजन हे पत्नी व दोन मुले आणि सुन असे वास्तव्याला आहे. शेतीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बुधवार २२ डिसेंबर रोजी सकाळी राजू पाटील हे पत्नी व लहान मुलगा योगेश आणि सुन असे शेतात कामासाठी निघून गेले. त्यावेळी त्यांचा मोठा अविवाहित मुलगा समाधान राजू महाजन (वय-२७) हा घरी एकटाच होता. घरी कुणीही नसतांना समाधान याने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.…
अनुदानीत शिक्षणसेवक पदासाठी मागीतली २ लाख ३० हजारांची ‘लाच’ लाईव्ह महाराष्ट्र न्यूज :जळगाव येथील आर.आर.विद्यालयात विनाअनुदानीत तत्वावरून अनुदानीत शिक्षण सेवक पदावर नियुक्तीच्या मान्यतेसाठी तब्बल २लाख,३०हजार रूपयांची लाच मागीतल्याप्रकरणी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपीक योगेश खोडपे याच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव येथील आर.आर.माध्यमिक विद्यालयात तक्रारदार यांचे भाउ शिक्षणसेवक म्हणून सन २०१४ पासून कार्यरत आहेत. त्यास अनुदानित तत्वावर शिक्षणसेवक पदावर नियुक्तीच्या मान्यतेसाठी जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षण विभागात कार्यरत वरिष्ठ लिपीक योगेश अशोक खोडपे, (रा.ममता राणे नगर,वाघनगर जळगाव,) याने १२ फेब्रुवारी २०२१ रोजी २ लाख ३० हजार रूपयांची मागणी वेळोवेळी करण्यात आली…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दि. २६ ते २९ डिसेंबर दरम्यान सांगली येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद ज्युनियर गटातील ३३व्या मुले व १७ व्या मुलींच्या स्पर्धेसाठी जळगाव शहर बॉक्सिंग असोसिएशन मधुन ४४-४६ किलो वजनगटात साक्षी मोरे, ४८ ते ५० किलो वजनगटात सेजल पाटील , ५० ते ५२ किलो वजनगटात गार्गी पाटील, ६० ते ६३ किलो वजनगटात अलिशा शेख व ७० ते ७५ किलो वजनगटात देवशीष चांगरे यांची निवड करण्यात आली . प्रशिक्षक म्हणून निलेश बाविस्कर, विशाल सोनवणे व व्यवस्थापक म्हणून टहेमटन जलगाववाला काम पाहत आहेत. खेळाडू व प्रशिक्षकांचे जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी मा. मिलिंद दिक्षीत, एकलव्य…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एका मुलाला मुलीसोबत काही इसम मारहाण करीत असल्याचे दिसत आहे याबाबत पोलिसांनी मरण झालेल्या युवकाचा शोध घेऊन त्याच्याकडून जबाब लिहून घेतला असून मारहाण करणाऱ्या मुलांचा शोध पोलीस घेत आहे. गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर तरुण-तरुणींना काही तरुण जबर मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही दोघं सोबत का फिरतात? या बद्दल विचारणा करून तरुण तरुणीला गावगुंडांनी जबर मारहाण केल्याचा या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. हे तरुण तरुणी सोबत फिरत असताना अचानक येऊन त्यांना जंगलात घेऊन जात लाकडी दांडक्याने मारहाण केली. सदर तरुणांच्या डोक्यात फरशी टाकत…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : धरणगाव तालुक्यातील चमगाव गावाजवळील शिवारात असलेल्या नदीच्या काठावर बिबट्याने एका वासरूचा फडश्याप पडल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे. सविस्तर माहिती की, गेल्या दोन महिन्यांपासून आतापर्यंत पाचवी घटना घडली असून याकडे वनविभागाकडून कारवाईची उदासिनता दिसून येत आहे. वनविभागाचे कर्मचारी पंचनामा करून घेवून पुन्हा याकडे दुर्लक्ष केले जाते. बिबट्याला पकडून जेरबंद करण्याची मागणी वारंवार करूनही याकडे दुलक्ष केले जात असल्याची ओरड ग्रामस्थांकडून केली जात आहे. बिबट्यामुळे एखाद्या पुरूषाचा बळी गेला तर याला जबाबदार कोण राहील असा सवाल केला जात आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी धरणगाव तहसीलदार नितींकुमार देवरे यांच्याकडे तक्रार…
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगाव जिल्ह्याच्या वतीने लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : विशेषांक प्रकाशन समारंभ अॅड.एस.ए.बाहेती महाविद्यालय जळगाव येथे पार पडला, त्या प्रसंगी डॉ.मिलींद बागुल हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ.अनिल लोहार हे होते.अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शिरीष चौधरी व कल्पना चौधरी यांनी केले. डॉ.मिलींद बागुल यांनी श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य आपल्या संविधानात आहे पण सध्या स्वैराचार पहायला मिळते आणि सोबतच कायद्याचा आदर करण्याचा आग्रह केला.त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन पत्रीका ही समाजाची किड दुरुस्त करण्याचे काम करीत आहे असेही सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ अनिल लोहार यांनी श्रद्धा, अंधश्रद्धा व विश्वास समजून घेण्यासाठी कार्यकारणभाव व वैज्ञानिक दृष्टिकोन…

