संजय पाटील सर ठरले गरीब महिलेसाठी देवदुत लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव ग्रामीण शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील यांनी दोनगाव येथे जळगाव ग्रामीण शिवसेना आणि गोदावरी फाऊंडेशन जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबीराचे आयोजन दिनांक 18 डिसेंबर रोजी आयोजित केले होते. या शिबिरात दोनगाव परिसरातील पाचशे पेक्षा जास्त रूग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात तपासणी करत असताना सुनंदा नाना कोळी या महिलेची अचानक तब्येत सिरियस झाली असता गोदावरी फाऊंडेशन डॉक्टरांनी ताबडतोब गर्भपिशवीच्या गाठीची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. संजय पाटील आणि प्रतापराव पाटील यांनी तातडीने शिवसेनेची रुग्णवाहिका बोलुन तिला गोदावरी हाॅस्पिटल मध्ये दाखल करून तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली त्या मुळे…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : बोदवड नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचार सभेत बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की धरणगावातील रस्ते हे हेमामालिनीच्या गाला सारखे आहे तुम्हाला साधा बोदवड चा रस्ता करता आला नाही असा टोला त्यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांचा उल्लेख न करता मारला. बोदवड नगरपंचायती मध्ये शाही पक्षाने आपले उमेदवार उभे केले आहेत या नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचार आला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी 18 रोजी सायंकाळी सभा घेतली या सभेत बोलताना त्यांनी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे तीस वर्ष राहिलेले आमदार म्हणून एकनाथराव खडसे यांचं नाव न घेता उल्लेख करीत त्यांना चॅलेंज दिले की धरणगावात येऊन बघा हेमामालिनीच्या गाला सारखे रोड नसली तर…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील येथील जीपीएस कॅम्पस च्या विद्यार्थ्यांनी पाळधी पोलीस स्टेशनला भेट देऊन प्रत्यक्ष अनुभवातून पोलीस स्टेशन ही संकल्पना समजून घेतली. कृतीयुक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे. भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील स्कूल कॅम्पस पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल तसेच भाऊसाहेब गुलाबराव पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाळधी पोलीस स्टेशनला भेट देऊन प्रत्यक्ष अनुभवातून पोलीस स्टेशन ही संकल्पना समजून घेतली.कृतीयुक्त शिक्षण देणारी शाळा म्हणून अल्पावधीत जीपीएस ला नावलौकिक प्राप्त झाले आहे. दि 18 रोजी प्राचार्यांच्या कृतीयुक्त शिक्षण ह्या संकल्पनेतून सर्व विद्यार्थ्यांनी पाळधी पोलीस स्टेशनला भेट दिली, प्रसंगी पाळधी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेशजी बुवा यांचा सत्कार करण्यात आला,…
जळगाव/भुसावळ प्रतिनिधी । जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि रावेर पोलीसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत शनिवारी कोट्यावधी रूपयांची ब्राऊन शुगरसह एका ४५ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली होती. आज भुसावळ न्यायलयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यात अजून काही धागेदोरे उघडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यात ब्राऊन शुगर (हेरॉईन)ची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याची गोपनिय माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि रावेर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाई करत शनीवार १८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात धडक कारवाई करत सुमारे १ कोटी रूपये किंमतीचे अर्धा किलो…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील 20 रोजी जळगाव येथे विविध कार्यक्रमांचे उद्घाटन व विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांच्यासमवेत कायदा व सुव्यवस्था इतर विषयांच्या बैठकीसाठी जळगाव येथे येणार आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे 20 रोजी सकाळी 7:30 वाजेला मुंबई वरून जळगाव ला प्रयाण करतील आठ वाजून पन्नास मिनिटांनी जळगाव येथे आगमन होणार असून 10 वाजेला चोपडा येथे नवीन पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटनासाठी उपस्थित राहणार आहेत. दुपारी 1 वाजेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. 1ते 1.30 अरुण गुजराथी याच्या घरी 1.45 ते 2.15 चोपडा तालुका सूतगिरणी जिनिग व प्रेसिग प्रकल्पाचे भूमिपूजन समारंभ 2.15मोटारीने जळगांव आगमन 3.15 ते 4 वाजेला…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : रावेर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज सकाळी १० वाजेच्या सुमारास एका महिलेकडून 1 कोट्यवधी रुपये किंमत असलेली 500 ग्रॅम ब्राउन शुगर एलसीबीच्या पथकाने जप्त केली आहे. याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. रावेर शहरात एक महिला ब्राऊन शुगर घेऊन काही व्यक्तींशी व्यवहार करणार असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले आणि त्यांच्या टीमने रावेर शहरात सापळा रचला. त्यानुसार सकाळी १० वाजेच्य सुमारास डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात अख्तरी बानो या महिलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यातून 500 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त केली.…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव हे अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे विशेष करून जळगावचे सोने हे 52 कशी साठी प्रसिद्ध आहे मात्र गॅस सोन्याची किंमत प्रत्येकालाच कळते असे नाही. जळगाव तसेच खान्देशचे नेते नाथाभाऊ हेसुद्धा बावन कशी सोने आहे त्यांची किंमत राष्ट्रवादीला पकडली व ते आमच्या खातर राष्ट्रवादीत आले त्याचा आम्हाला अभिमान आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुसावळ येथील राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्यात मार्गदर्शन करताना काढले . जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भुसावळ नगरपरिषद च्या विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर भुसावळ येथील डी एस हायस्कूल प्रगणावर राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा मेळावा संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शेतातील विजेच्या डीपीवर काम करताना उच्च दाब विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने पंचवीस फुटांवरून खाली पडलेल्या तरुणावर येथील शिरसोली रस्त्यावरील देवकर हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेशिवाय यशस्वी उपचार करण्यात आले. पंधरा दिवसांच्या उपचारानंतर या रुग्णाला आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी नातेवाईकांनी येथील डॉक्टरांच्या टीमचे तोंड भरून कौतुक केले. निंभोरा ता. (धरणगाव) येथील रहिवासी असलेले विलास पुंडलिक बोरसे (वय 48) हे मका लागवडीसाठी शेतात गेले होते. त्यावेळी त्यांच्या कृषी पंपाला वीज पुरवठा करणाऱ्या ट्रांसफार्मर वरून वीज गेली. त्यामुळे विलास बोरसे हे ट्रांसफार्मरवर काम करण्यासाठी चढले. मात्र अनवधानाने त्यांचा हाताचा स्पर्श ट्रांसफार्मरवर असलेल्या उच्चदाब क्षमतेच्या तारांना लागला आणि ते पंचवीस फूट खाली…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : भुसावळ येथे झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भुसावळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह वीस सावदा येथील नगराध्यक्ष व इतर कार्यकर्ते यांनी नामदार अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यामुळे भुसावळ सावदा पळसपुर या ठिकाणी भाजपला मोठा धक्का बसला आहे. भुसावळ नगरपरिषद चे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण गोडे यांनी आज नामदार अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर या सोबत भाजपाचे वीस नगरसेवकांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून भुसावळ मध्ये भाजपाला मोठे खिंडार पडले आहे तर याच बरोबर सावदा येथील नगराध्यक्ष अनीता येवले फैजपूर येथील नगरसेवक कार्यकर्ते जामनेर येथील कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय आहे. या व्यवसायातून आर्थिक सुबत्ता येण्यास मदत होते. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सहकार चळवळीचे बळकटीकरण आवश्यक आहे. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत झाली पाहिजे, अशीच सरकारची भूमिका आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, जळगाव यांच्या पाच लाख लिटर क्षमतेचा नवीन आधुनिक दूध प्रक्रिया प्लँट आणि नवीन दुग्धजन्य पदार्थ उत्पादन प्लँटचा उदघाटन सोहळा आज सकाळी पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नवीन आधुनिक दूध प्रक्रिया प्लँटचे, तर पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते श्रीखंड, लस्सी व पनीर या…

