Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यातील रसिक आणि परमेश्‍वरावर नितांत “श्रध्दा असणारा भाविक” ही रूपे अनेकदा दिसून येतात. ते अनेकदा जसे चित्रपटातील गाणी म्हणतात तसेच भजन किर्तनातही रंगतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कव्वालीच्या माध्यमातून भक्तीरंगाचे प्रदर्शन घडविले होते. आता अगदी याच प्रकारे तालुक्यातील अंजनविहिरी गावात आयोजीत करण्यात आलेल्या भागवत सप्ताहात ना. गुलाबराव पाटील यांनी थेट किर्तनात भाग घेऊन उपस्थितांना चकीत केले. किर्तनाच्या माध्यमातून संस्कारक्षम जीवनाची दिशा मिळत असल्याचे प्रतिपादन करत त्यांनी जीवनातील परमेश्‍वर भक्तीवर केलेले भाष्य हे उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेले. तर याच कार्यक्रमात त्यांना दहीहंडीचा सन्मान देखील प्रदान करण्यात आला.…

Read More

विश्वकर्मा वंशीय समाज संस्थाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : सातारा जिल्ह्यातील ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तीची हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा करावी, या मागणीचे निवेदन शुक्रवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता विश्वकर्मा वंशीय समाज संस्थाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील सुतारवाडी येथील ७ वर्षाच्या अबोली या बालिकेवर अमानुष व मानवतेला काळिमा फासणारे कृत्य करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचा विश्वकर्मा वंशीय समाज संस्थेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत संशयित आरोपी संतोष थोरात याला फाशीची शिक्षा द्यावी, यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक…

Read More

जळगाव आरटीओ विभागाचा भोंगळ कारभार उघड लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : भुसावळ विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय सावकारे यांचे टोयोटा किर्लोस्कर कंपनीचे वाहनक्रमांक एम एच 19 सी झेड 5130 हे परस्पर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव आरटीओ कार्यालयाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांची चौकशी सुरू आहे. भुसावळ विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय वामन सावकारे यांची टोयोटा कंपनीचीएम एच 19 सी झेड 5130 या वाहनाची नोंदणी 23 फेब्रुवारी 2019 रोजी जळगाव आरटीओ कार्यालयात झालेली आहे ही गाडी परस्पर डिसेंबर 2021 महिन्यात अनिल दत्तात्रय परब राहणार रविकिरण को ऑफ सोसायटी बांद्रा ईस्ट मुंबई…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : यावल तालुक्यातील सावखेडा सीम येथे विनापरवाना गोमांस विक्री करणाऱ्या तरूणावर यावल पोलीसांनी कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील सावखेडा सीम परिसरात बेकायदेशीरित्या गोमांस विक्री होत असल्याची गोपनिय माहिती यावल पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुधिर पाटील यांनी पोलीसांना सुचना देवून कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, पोकॉ अनिल साळुंखे यांनी  कारवाई करत शेख कलीम शेख रशीद (वय-३२) रा. सावखेडा ता. यावल याच्याकडून गोमांस जप्त करण्यात आले. याप्रकरणी पो.कॉ. अनिल साळुंखे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : धरणगाव तालुक्यातील नांदेड शिवारात बिबट्या दिसून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक अर्ज देवूनही वनविभाग डोळे झाकून दुध पिण्याचे सोंग करत आहे. धरणगावातील नांदेड शिवारातील एका शेतात मध्यरात्री काही शेतकरी शेतात काम करत असतांना बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आला. यावेळी काही शेतकऱ्यांनी बिबट्याला मोबाईलमध्ये कैद केले आहे. यापुर्वी तालुक्यातील चमगाव गावाजवळील शिवारात असलेल्या नदीच्या काठावर बिबट्याने एका वासरूचा फडश्याप पडला होता. त्यावेळी तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या सुचना वनविभागाला दिल्या होत्या. मात्र वनविभाग कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आतापर्यंत पाच घटना घडल्या आहेत. बिबट्या…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचे संकेत आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संध्याकाळी दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्बंधांबाबत अंतिम निर्णय घेतील हे निर्बंध आज-उद्या लागू होतील, असंही ते म्हणाले होते. त्यानुसार आज गुरुवारी रात्री उशिरा राज्य सरकारकडून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढतोय. गुरुवारी राज्यात साडे पाच हजाराच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्याही साडे चारशेच्या पुढे गेली आहे. त्यातच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून 30 डिसेंबरला रात्री उशिरा नवी नियमावली…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव येथील एमआयडीसी भागांमध्ये अवैधरीत्या बायो डिझेल ट्रक चालकांना विक्री करण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचारी यांच्या संयुक्त कारवाईत 68 हजार 800 रुपयांचे बायोडिझेल व दोन वाहने व तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या सूचनेनुसार एमआयडीसी भागात अवैध बायोडिझेलची विक्री होत आहे त्याचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते या आदेशाप्रमाणे एम आय डी सी पोलीस ठाण्याचे प्रभारी अमोल मोरे पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे मुदस्सर काझी योगेश बारी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशलिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात सलग दुसऱ्या गुरुवारी 21 रुग्णांवर अत्यल्प दरात मोतीबिंदू व फेको शस्त्रक्रियांचा विक्रम करण्यात आला. पुढील गुरुवारी देखील 21 रुग्णांवर ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. रुग्णालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या मोतिबिंदू शस्त्रक्रिया अभियानाला रुग्णांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, मोफत नेत्र तपासणीसाठी दररोज रुग्णांची गर्दी वाढत आहे. तसेच रुग्णांकडून या महाअभियानाचे कौतुक केले जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हे अभियान राबविले जात असून यात 2500 रुपयात मोतीबिंदू व 6000 रुपयात फेको शस्त्रक्रिया केली जात आहे. तपासणी पूर्णपणे मोफत या महाअभियानांतर्गत ना नफा ना तोटा तत्त्वावर अभियान राबविले जात असल्याने…

Read More

चाळीसगांव प्रतिनिधी : छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जळगाव यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार, आमदार यांच्यासह चार ते पाच हजार जमावांवर चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याबाबत वृत्त असे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शहरातील सिग्नल चौकात काल दुपारी २ ते ४ वाजताच्या सुमारास करण्यात आले . यावेळी मोठ्या संख्येने   गर्दी झाली होती.  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आशालता चव्हाण, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक राजेंद्र पाटील, नगरसेवक संजय पाटील, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक शेख चिरागउद्दीन…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ‘ जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रकरण मोठ्याप्रमाणात समोर येत आहेत. गुरुवारी पहाटेच्या सुमारास वाहनातून होणारी गांजा तस्करी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गस्तीदरम्यान रोखत 33 किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी धुळ्यातील दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी मध्यरात्री बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला, हवालदार लतीफ शेख, कॉन्स्टेबल प्रणय पवार हे रेल्वे स्टेशन परीसरात नाकाबंदी करीत असताना मध्यरात्री 2.25 वाजेच्या सुमारास मारोती स्वीप्ट क्रमांक एम.एच.01 बी.टी.6682 हिची तपासणी केली असता वाहनातील दोघांची हालचाली संशयास्पद वाटू लागल्याने वाहनाची डिक्की उघडली असता त्यात प्लॅस्टीक बॅग उघडल्यानंतर त्यात गांजा आढळल्याने वाहनासह…

Read More