Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : संपूर्ण राज्यात ओमिक्रॉनचा धोका जास्त वाढला आहे. ओमिक्रॉनचा फैलाव वाढताना दिसत आहे. आता राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली होती.शासनाच्या आदेशाला अनुसरून जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नवीन आदेश जारी केले आहेत. अशी असेल नियमावली संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी असेल. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या १०० च्या…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : राज्यात ओमायक्रॉन रूग्णांची संख्या वाढत असून जिल्हा प्रशासन याच्या प्रतिकारासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून शासकीय रूग्णालयांमधील अग्नीशामन यंत्रणेसाठी ६ कोटी ५० लाखाचा निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉन रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर याला परतून लावण्यासाठी प्रशासन सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांना जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अद्ययावत आणि स्वयंचलीत अग्नीशामन यंत्रणा उभारण्यासाठी ६ कोटी ५० लक्ष १८ हजार ४९९ रूपयांचा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करण्यात आला आहे. यामुळे ३ उपजिल्हा, १७ ग्रामीण, एक कुटीर व २ ट्रामा केअर…

Read More

प्रतिनिधी प्रविण पाटील: नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील लखमापूर येथे आदिवासी मजुरांवर झालेल्या सामाजिक बहिष्कार व मारहाणीत संदर्भात एकलव्य संघटनेने जिल्ह्यात निवेदन देण्यात आले . नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील लखमापूर येथे 17 रोजी आदिवासी मजुरांवर झालेल्या सामाजिक बहिष्कार व मारहाणीत संदर्भात निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की देण्यात आले दिनांक 17  रोजी  नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातील लखमापुर येथे निंदनीय घटना घडली शेतकऱ्यांनी व ग्रामपंचायत यांनी मिळून नियमावली करण्यात आली होती की, आदिवासी शेतमजुर आपल्याकडे कमी मजुरीवर कामावर आले नाही तर त्यांच्यावर पुर्ण गावातुन सामाजिक बहिष्कार टाकण्यात येईल, असे लेखी पत्र काढुन व जे काही आदिवासी महिला दुसऱ्याकडे कामाला जात असतांना…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या परस्पर  तक्रारीवरून वाद निर्माण झाला असून या वादात रोहिणी खडसे यांनी वादग्रस्त स्टेटमेंट केल्यामुळे आज सायंकाळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी अप्पर पोलीस अधिक्षक यांची भेट घेऊन आपल्या जिवाला एकनाथराव खडसे व ऍडव्होकेट रोहिनी खडसे यांच्यापासून जीवाला धोका असल्याची माहिती पोलिस प्रशासनाला दिली याबाबत तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात फेसबुक वरील एका पोस्ट वरून वाद निर्माण झाला या वादातून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात परस्पर गुन्हे दाखल झाले आहे या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असता असेच सुरु राहिले तरं उद्या आम्ही…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : मुस्लिम समाजाला शिक्षणात आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी जळगाव मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांना निवेदनव्दारे करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्रात मुस्लीम समाजाची राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती अतिमागास झालेली आहे. मुस्लिम हा इस्लाम धर्माचा एक समूह आहे. उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजाचे ५ टक्के शैक्षणिक आरक्षण मान्य केले होते त्यावरून ही बाब स्पष्ट झाली आहे की, मुस्लिम आरक्षणात धर्माचा अडसर नाही. महाविकास आघाडीच्या सरकारला मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीने आरक्षणासाठी वेळीवेळी निवेदनही दिले आहे. याप्रसंगी राष्ट्रवादीचे एजाज मलिक, एमआयएमचे सनेर सय्यद, काँग्रेसचे महानगराध्यक्ष अमजद…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव शहरातील पिंप्राळा भागात राहणार्‍या १७ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे. विशेष बाब म्हणजे स्मार्टफोनचा कॅमेरा सुरू करून त्याने आपल्या आत्महत्येचे चित्रीकरण स्मार्टफोनमध्ये करून ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. घनश्याम संजय भोई (वय-१७ रा. पिंप्राळा हुडको जळगाव ) या तरूणाने आज सायंकाळी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. घनश्याम भोई हा आई मंदाबाई,वडील मोठी बहिण गीता भोई यांच्यासह सेट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा परिसर जळगाव येथे वास्तव्याला आहे. आईवडील आणि मोठी बहिण हे देवाच्या कार्यक्रम असल्यामुळे मुळगावी नेरी पिंप्री जामनेर येथे गेल्याने तो घरात एकटाच होता. आज अर्थात, शुक्रवारी २४…

Read More

महाराष्ट्रात नवी नियमावली जाहीर, काय आहेत नवे नियम ? लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : संपूर्ण राज्यात ओमिक्रॉनचा धोका जास्त वाढला आहे. ओमिक्रॉनचा फैलाव वाढताना दिसत आहे. आता राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. संसदीय मंत्री अनिल परब यांनी या नव्या नियमावलीची घोषणा केली आहे. आज रात्रीपासून राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही जमावबंदी आहे. राज्यात देखील गेल्या दोन दिवसात एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण दिसून येत आहेत. ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ प्रमाणे संपूर्ण राज्यात काही…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव येथील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयाने गुरुवारी एकाच दिवसात 21 जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांच्या दृष्टीला नवी चकाकी दिली आहे. जळगाव शहरातील विख्यात नेत्रतज्ञ डॉ वृषाली विवेक पाटील, भूलतज्ञ डॉ. स्नेहल गिरी, आॅप्थोमॅट्रेस जयेश वाल्हे, डॉ. विजय सरताळे यांच्या टीमने या शस्त्रक्रिया पूर्ण केल्या. समन्वयाचे काम डॉ. नितीन पाटील यांनी केले. रुग्णांना दुसऱ्याच दिवशी चष्मा वाटप करून घरी सोडण्यात आले. गेल्या आठवडाभरापासून देवकर रूग्णालयात ना नफा ना तोटा तत्त्वावर मोतिबिंदू शस्त्रक्रिया महाअभियान राबविले जात आहे. यात अवघ्या 2500 रुपयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व अवघ्या सहा हजार रुपयात फेको शस्त्रक्रिया केली जात आहे. या…

Read More

जळगाव प्रतिनिधी : वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या सहाय्यक अभियंत्यासह त्यांच्या कर्मचाऱ्याला थकित वीजबिल धारकाकडून शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार सकाळी ११ वाजता सिंधी कॉलनी परिसरात घडला. याप्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, दिक्षीतवाडी येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक अभियंता जयेश जनीकांत तिवारी यांच्यासह कार्यालयीन सहाय्यक योगेश शेषराव जाधव, तंत्रज्ञ नमो मधुकार सोनकांबळे, वरिष्ठ तंत्रज्ञ आत्माराम लोंढे यांनी गुरूवारी २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जळगाव शहरातील जोशी कॉलनी, सिंधी कॉलनी, बाबानगर परिसरात थकीत वीजबिल धारकांना विज बिल भरण्याबाबत सुचना करण्यासाठी दुपारी दीडवाजता गेले. त्यावेळी सिंधी कॉलनी येथील वीज ग्राहक टिकमदास…

Read More

प्रत्येक व्यक्तीचे समाधान हीच आमच्या कार्याची पावती – नितीनकुमार देवरे लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : येथील तहसिल कार्यालय येथे आज २४ डिसेंबर २०२१ रोजी “राष्ट्रीय ग्राहक दिवस” उत्साहात साजरा करण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज २४ डिसेंबर म्हणजेच “राष्ट्रीय ग्राहक दिनाचे” औचित्य साधून तहसिल कार्यालय धरणगाव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरवातीला अखिल भारतीय ग्राहक पंचायत व ग्राहक कल्याण फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांचा तहसिल प्रशासनाच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ग्राहक कल्याण फाउंडेशन चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहक दिनाची पार्श्वभूमी सांगून “राष्ट्रीय ग्राहक दिन” साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट केला. तद्नंतर अ.भा. ग्राहक…

Read More