संजय पाटील सर ठरले गरीब महिलेसाठी देवदुत
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव ग्रामीण शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील यांनी दोनगाव येथे जळगाव ग्रामीण शिवसेना आणि गोदावरी फाऊंडेशन जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबीराचे आयोजन दिनांक 18 डिसेंबर रोजी आयोजित केले होते. या शिबिरात दोनगाव परिसरातील पाचशे पेक्षा जास्त रूग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात तपासणी करत असताना सुनंदा नाना कोळी या महिलेची अचानक तब्येत सिरियस झाली असता गोदावरी फाऊंडेशन डॉक्टरांनी ताबडतोब गर्भपिशवीच्या गाठीची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. संजय पाटील आणि प्रतापराव पाटील यांनी तातडीने शिवसेनेची रुग्णवाहिका बोलुन तिला गोदावरी हाॅस्पिटल मध्ये दाखल करून तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली त्या मुळे या गरिब महिलेचे प्राण वाचविण्यात यश आले त्याबद्दल तिच्या नातेवाईकांनी संजय पाटील आणि *प्रतापराव पाटील यांचे आभार मानले.या आरोग्य शिबीराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले.
शिबिरात मधुमेह तपासणी, ईसीजी , टुडी इको , नेत्रतपासणी , नाक कान घसा तपासणी , अस्थिरोग तपासणी , मुत्रपिंड तपासणी , जनरल मेडिकल तपासणी अशा विविध आजारांवर मोफत तपासणी करण्यात आली. तपासणी नंतर अनेक रुग्णांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया , हृदयाच्या ऐंजिओग्राफी आणि ऐंजिओप्लॅस्टी जिवनदायिनी योजनेतून मोफत करण्यात येणार आहे . या शिबिरात जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील , माजी सभापती मुकुंद भाऊ नन्नवरे , किशोर राघो पाटील, रेलचे सरपंच प्रशांत पाटील , लाडलीचे सरपंच गजानन पाटील , चोरगाव चे सरपंच ज्ञानेश्वर सोनवणे , विभागप्रमुख सुधाकर पाटील , दिपक सावळे , टाकळी चे उपसरपंच किरण पाटील , संजय चौधरी , संजय माळी , माजी जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील , शेरी चे माजी सरपंच दत्तात्रय ठाकुर , कवठळ चे मिलिंद पाटील , शिवसेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. शिबिरा यशस्वी करण्यासाठी सुरेश पाटील , अमोल पाटील , राहुल पाटील , जितेंद्र पाटील , गोपाल पाटील , दिपक पाटील जगदीश पाटील , इंद्रजित जाधव , किशोर पाटील , भावलाल पाटील , ज्ञानेश्वर पाटील , राजेंद्र पाटील , गणेश पाटील , भगवान आबा यांनी परिश्रम घेतले.
या शिबिरात पाळधी जिल्हा परिषद गटातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी , आशा वर्कर्स , अंगणवाडी सेविका ,मदतनीस यांचा कोरोना योध्दा प्रमाणपत्र देऊन प्रतापराव पाटील यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.