लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : महाविकास आघाडी सरकारला राज्यात दोन वर्ष पुर्ण होत आहे. यात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना मंत्रीपद मिळून दोन वर्ष पुर्ण झाले आहे. या निमित्ताने शिवसेनेचे उपनेते पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा दोनगावचे सामाजिक कार्यकर्ते किशोर राघो पाटील यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नाना सोनवणे, रविंद्र चव्हाण, जळगाव पंचायत समितीचे उपसभापती डॉ. कमलाकर पाटील, नगरसेवक मनोज चौधरी यांच्यासह अन्य उपस्थित होते.
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : तालुक्यातील भादली खुर्द येथील शेतकऱ्याला काहीही कारण नसतांना सहा जणांना बेदम मारहाण करून खिश्यातील ५० हजारांची रोकडसह सोन्याची चैन आणि अंगठी जबरी लूट केल्याप्रकार घडला होता. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहीती अशी की, निवृत्ती गंगाराम साळुंखे (वय-३७) रा. भादली खुर्द ता. जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेतकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेतातील केळी तालुक्यातील किनोद येथील व्यापाऱ्याला विक्री केले होते. त्याचे पैसे घेण्यासाठी निवृत्ती साळुंखे हे दुचाकीने मंगळवारी २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता किनोद येथे गेले होते. पैसे घेतल्यानंतर ते कठोरा गावाच्या मार्गाने भादली खूर्द येथे…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज। शहरातील शांतीनगर येथे एका घरातून अज्ञात चोरट्याने रोकड आणि दागिने लंपास केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, कैलास बाबुराव चव्हाण (वय-४०) रा. शांतीनगर पोतदार शाळेच्या मागे, सावखेडा शिवार जळगाव हे मजुरी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २८ ते २९ डिसेंबर रोजी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत घरातील ६० हजार रुपयांची रोकड आणि १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कैलास चव्हाण यांनी तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून २९ डिसेंबर…
धरणगाव लक्ष्मण पाटील : येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ॲड.रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ व हल्लेखोरांवर कारवाई करणे बाबत निवासी नायब तहसिलदार लक्ष्मण सातपुते यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, पुष्पाताई महाजन, तालुका अध्यक्ष धनराज माळी, जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, युवक अध्यक्ष नाटेश्वर पवार, माजी जि.प. सदस्य रवींद्र पाटील, जेष्ठ नेते मोहन पाटील, सामाजिक न्याय अध्यक्ष अरविंद मानकरी, जिल्हा सरचिटणीस एन. डी. पाटील, तालुका कार्य अध्यक्ष अरविंद देवरे, महिला तालुका अध्यक्ष सुरेखा पाटील, प्रदीप पाटील, दोनगाव सरपंच क्रांतिकुमार कोळी, सागर वाजपेयी, सिताराम मराठे, शामकांत पाटील, शालीग्राम पाटील, धनराज पाटील, गौतम सैंदाने, आकाश राणे, बिलखेडा सरपंच…
धरणगाव लक्ष्मण पाटील : येथील गंगापुरी बु. ग्रामपंचायत तर्फे जन आरोग्य कार्ड तयार करून ते वितरित करण्यात येणार आहेत. हे जन आरोग्य कार्ड बनविण्यासाठी ग्रामस्थांनी आपल्या घरातील कुटुंब प्रमुखांचा पासपोर्ट १ फोटो, आधार कार्ड झेरॉक्स प्रत व पूर्ण कुटूंबासाठी १५०/- रूपये फी. घेऊन सकाळी ०९ वाजता गावातील समाज मंदिर ओट्यावर पिंपळाच्या झाडाखाली हे कार्ड तयार करून मिळणार आहेत. ज्यांना कोणाला कार्ड काढायचे आहे त्यांनी हे कार्ड अवश्य काढा. हे कार्ड खाजगी दवाखान्यात वापरता येते. आरोग्य कार्ड पूर्ण परिवारा करिता आहे. आरोग्य कर्डात परिवारामधील अकरा लोकांची नावे टाकून मिळतात. आरोग्य कार्ड लगेच बनवून मिळेल. जन आरोग्य कार्ड नोंदणीत ओपीडी, आयपीडी बिलामध्ये…
गडकिल्ले हेदाखविले आपले जीवन स्मारक आहेत त्यांना जीवित करणे गरजेचे आहे – छत्रपती खा संभाजी राजे भोसले चाळीसगांव प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज हे योद्धे तर होतेच त्यासोबत राज्य कसे चालले पाहिजे हे त्यांनी दाखवून दिले, रयतेवर महिलांवर अन्याय अत्याचार केला त्यास शासन कसे करावे हे महाराजानी दाखवून दिले आज चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण होत आहे हा सर्वांसाठी आनंदाचा दिवस असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा अनावरण प्रसंगी केले महाराष्ट्र मध्ये राहणारे टाटा, अंबानी, शिवभक्त, शिवप्रेमी यांना सोबत घेऊन किल्ले संवर्धन साठी फोर्थ फेडरेशन…
तक्रार : फेर प्रभाग रचनेची मागणी!आमदार शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीची निवडणूक आयोगाकडे धाव लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : अमळनेर नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचना फुटी प्रकरणी अखेर निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करण्यात आलेली असून फेर प्रभाग रचनेची मागणी करण्यात आलेली आहे. आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीचे गटनेते प्रविण पाठक यांनी याबाबत तक्रार दिलेली असून तक्रारीच्या प्रति नगरविकास विभागाचे प्रधान सचिव व जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. टीईटीनंतर या प्रभाग रचना फुटी प्रकरणाकडे समस्त राज्याचे लक्ष लागून आहे. कोणत्या राजकीय पुढार्यांच्या सांगण्यावरून प्रभाग रचना करण्यात आली, कोणी केली व ती कोणी फोडली हे उजेडात कधी येणार याकडे समस्तांचे…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : भांड्यांसह दागिन्यांनाही पॉलीश करून देण्याचा बहाण्याने अज्ञात दोन भामट्यांनी महिलेचे ४० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र व कानातले टॉप्स लंपास केले.ही घटना मंगळवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी मेहरूण येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, मेहरूण परिसरातील रेणूका हॉस्पिटल समोर संगिता विजय सोनवणे (वय-४२) ह्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास महिला घरात काम करत असतांना अज्ञात दोन भामटे (वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष) आले. त्यांनी तांबा व पितळाचे भांडे पॉलीशी करून देत असल्याचे सांगितले. त्यानुसार संगिता सोनवणे यांनी भांडी पॉलीश करण्यास दिले.…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : केळीचे हजाराच्या पैसे घेवून घरी परतणाऱ्या भोकर-भादली येथील शेतकऱ्याला अज्ञात पाच हल्लेखोरांना बेदम मारहाण करून ५० हजाराची रोकडसह सोन्याचे ब्रेसलेट आणि अंगठी जबरी हिसकावून पोबारा केल्याची धक्कादायक घटना दि 28 रोजी रात्री घडली. जखमी शेतकऱ्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. याबाबत माहीती अशी की, निवृत्ती गंगाराम साळुंखे (वय-३७) रा. भोकर भादली ता. जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेतकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेतातील केळी तालुक्यातील किनोद येथील व्यापाऱ्याला विक्री केले होते. त्याचे पैसे घेण्यासाठी निवृत्ती साळुंखे हे दुचाकीने सायंकाळी ५ वाजता किनोद येथे गेले होते. व्यापाऱ्याकडून ५० हजार रूपयांची रोकड घेवून ते दुचाकीवरून भोकर…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : भुसावळ शहर पुन्हा खुनाने हादरले आहे. 32 वर्षीय महिलेचा खून करण्यात आला आहे. ही खळबळजनक घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली. भुसावळ शहरात खुनांचे सत्र थांबायला तयार नाही. मद्यपी पतीचा महिलेने खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुन्हा शहरातील सुचित शुभम बारसे (32, रा.कवाडे नगर, भुसावळ) या विवाहितेचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. संशयीत आरोपीने महिलेच्या छातीवर चाकूचे अनेक वार करून तिचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक संशय आहे. वर्दळीच्या आरपीडी रस्त्यावर पोलिस चौकी क्रमांक सात असून या चौकीच्या मागे असलेल्या निर्जनजागी ही घटना बुधवारी मध्यरात्री घडल्याचा अंदाज…

