लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : रावेर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज सकाळी १० वाजेच्या सुमारास एका महिलेकडून 1 कोट्यवधी रुपये किंमत असलेली 500 ग्रॅम ब्राउन शुगर एलसीबीच्या पथकाने जप्त केली आहे. याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रावेर शहरात एक महिला ब्राऊन शुगर घेऊन काही व्यक्तींशी व्यवहार करणार असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले आणि त्यांच्या टीमने रावेर शहरात सापळा रचला. त्यानुसार सकाळी १० वाजेच्य सुमारास डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात अख्तरी बानो या महिलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यातून 500 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त केली.
पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले की तपासणी केली असता हा सर्वात पीव्हरेस्ट फ्रॉमआहे त्यामुळे याची किंमत 1 कोटीच्या घरात असल्याचे सांगितले. आरोपी महिलेला ताब्यात घेतले असता ती महिला बऱ्हाणपूर मध्यप्रदेश मधून आली असून ती टॅक्सीने रावेरमध्ये आली आहे वतीनेही ब्राऊन शुगर मध्यप्रदेश मधील मनसुर येथील राहणाऱ्या सलीम खान शेरखान या व्यक्तीकडून घेतले की तिने सांगितले त्याला ताब्यात घेण्यासाठी ताब्यात घेण्यासाठी एक टीम रवाना झाल्याचे असल्याचे ही पोलीस अधीक्षक मुंडे यांनी सांगितले.
सदर ही महिला ब्राऊनशुगर जळगाव जिल्ह्यात कुठे घेऊन चालली होती काती रावेरमध्ये कोणाशी व्यवहार करणार होती याबाबत अधिक तपास सुरू आहे याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात एन डी पी एस नुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले
घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले, रावेर पोलीस निरीक्षक कैलास नागरे, तर तहसीलदार उषाराणी देवगुणे व शासकिय पंच रावेर येथे हजर झाले होते.