Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बीव्हीजीच्या कामबंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका वैशाली अमित पाटील यांचा पुढाकार; प्रभाग १३ मध्ये स्वखर्चाने कचरा संकलन सुरू
    जळगाव

    बीव्हीजीच्या कामबंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका वैशाली अमित पाटील यांचा पुढाकार; प्रभाग १३ मध्ये स्वखर्चाने कचरा संकलन सुरू

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 15, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्युज :जळगाव महानगरपालिकेच्या वतीने ओला व सुका कचरा संकलनाचे काम करणाऱ्या बीव्हीजी कंपनीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पगाराच्या प्रश्नावर कामबंद आंदोलन सुरू केल्याने शहरातील कचरा संकलनावर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नगरसेविका सौ. वैशाली अमित पाटील यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

    नागरिकांना स्वच्छतेचा कोणताही त्रास होऊ नये आणि परिसरात अस्वच्छता निर्माण होऊ नये, या उद्देशाने शुक्रवार, १७ जुलैपासून प्रभाग क्रमांक १३ मध्ये स्वखर्चाने तात्पुरत्या स्वरूपात कचरा संकलनाची व्यवस्था सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

    यावेळी त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मागण्यांनाही पाठिंबा दर्शवत, “कामगारांना वेळेवर पगार मिळालाच पाहिजे, ही माझीदेखील भूमिका आहे. मात्र आंदोलनामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी मी स्वखर्चाने कचरा संकलनाची व्यवस्था उपलब्ध करून देत आहे,” असे सांगितले.

    नगरसेविका वैशाली पाटील यांनी प्रभागातील नागरिकांना पुढील बाबींचे पालन करण्याचे आवाहन केले आहे:

    ओला व सुका कचरा वेगवेगळा करूनच द्यावा.

    कचरा रस्त्यावर, नाल्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये.

    स्वच्छता कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.

    ही सेवा नागरिकांच्या हितासाठी तात्पुरत्या स्वरूपात स्वखर्चाने सुरू ठेवण्यात येत आहे.


    “स्वच्छ प्रभाग, निरोगी प्रभाग” हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेविका सौ. वैशाली अमित पाटील यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    कष्टकरी कुटुंबातून मुंबई कोर्टापर्यंत; भगवान नन्नवरे यांची प्रेरणादायी वाटचाल

    August 11, 2026

    शालार्थ घोटाळ्याचा जळगाव कनेक्शन धक्कादायक! ६६ संस्था, ८४९ जण संशयाच्या भोवऱ्यात

    August 11, 2026

    कुंभमेळ्याच्या नावाखाली ४००-५०० कोटींचा गंडा? ‘जामनेर कनेक्शन’चा पर्दाफाश; गिरीश महाजनांकडे तक्रार धडकताच यंत्रणा सतर्क!

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.