Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जामनेर–जळगाव मार्गावर भीषण दुर्घटना; दोघे ठार, चौघे गंभीर
    क्राईम

    जामनेर–जळगाव मार्गावर भीषण दुर्घटना; दोघे ठार, चौघे गंभीर

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 16, 2026Updated:July 16, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email


    विजय पाटील :जळगाव | प्रतिनिधी
    जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाडेगाव शिवाराजवळील महामार्गावर शुक्रवारी भीषण कार अपघात झाला. जामनेरकडून जळगावकडे येणारी भरधाव कार रस्त्याच्या कडेला बंद पडून उभ्या असलेल्या ट्रकवर मागून जोरात धडकली. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.


    प्राथमिक माहितीनुसार, रस्त्याच्या कडेला बंद पडलेला ट्रक उभा असताना भरधाव कार थेट त्याच्या मागील बाजूस धडकली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस, स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलविले.


    अपघातातील गंभीर जखमी चौघांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती समजताच जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली.


    दरम्यान, मृत्यू झालेल्या दोघांची ओळख अद्याप पटलेली नसून, त्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू असून, अपघाताचे नेमके कारण तपासले जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    पीडब्ल्यूडी अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांना कार्यकारी अभियंता सुभाष राऊत वरचढ

    July 16, 2026

    जिल्ह्यात २२ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान

    July 15, 2026

    बीव्हीजीच्या कामबंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका वैशाली अमित पाटील यांचा पुढाकार; प्रभाग १३ मध्ये स्वखर्चाने कचरा संकलन सुरू

    July 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.