देशातील मुख्य बाजार पेठमध्ये गुलाबाचे फुल शिल्लक नसल्याचे दिसून येत आहे. फेब्रुवारी महिना तरुणांसाठी खास असतो. कारण फेब्रुवारीला ‘प्रेमाचा महिना’ असं म्हटलं जातं. 7 फेब्रुवारीपासून ‘व्हॅलेंटाईन वीक’ सुरू असतो. हा आठवडा प्रेमिकांना प्रेम व्यक्त करण्याची संधी देतो. व्हॅलेंटाईन डे (14 फेब्रुवारी) हा आठवड्याचा शेवटचा दिवस असतो. या व्हॅलेंटाईन वीकमुळं गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी असते. सध्या मागणी वाढल्यामुळं गुलाबाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. व्हॅलेंटाईन वीकमध्ये गुलाबाची फुले देण्याची प्रथा आहे. गुलाबाच्या फुलाला प्रेमाचं प्रतीक मानलं जाते. सध्या गुलाबाला मागणी वाढली आहे. त्यामुळं दरातही मोठी वाढ झाली आहे. गुलाबाची शेती ही शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा चांगला स्रोत आहे. फुलांची मागणी वाढल्यानं त्याचा थेट…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृतससंस्था प्रत्येक व्यक्ती बागेत उत्तम वातावरण असते यासाठीच फिरायला जात असता, पण एका तरुणीला बागेत फिरणे जीवावर बेतले आहे. हि घटना पाकीस्तानमध्ये घडली आहे. जेव्हा ती तरूणी तिच्या मित्रासोबत एका बागेत फेरफटका मारण्यासाठी गेली होती. त्या बागेत अचानक काही लोकांनी बंदुकीचा धाक दाखवून त्या तरूणीचे अपहरण केले. त्यानंतर तिला जंगलात घेऊन जाण्यात आले आणि बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला. इतकेच नव्हे तर त्यानंतर त्या नराधमांनी त्या तरूणीला हजार रूपये देऊन, ‘अशीच इकडे तिकडे फिरू नकोस’ असे सांगितल्याचेही समजले. वास्तविक, ही घटना पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथील F-9 परिसरात असलेले पार्क सर्वात सुरक्षित…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील निशाणे येथील ग्रामपंचायत सदस्य व कापसाचे व्यापारी शरदभाऊ पाटील यांची जळगाव जिल्हा बाळासाहेबांची शिवसेना शेतकरी सेनेच्या उपजिल्हा प्रमुख पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. शरद पाटील यांनी राष्ट्रवादी युवा उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देऊन बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते पी एम पाटील सर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला. ते दहा वर्षापासून राष्ट्रवादी युवा उपजिल्हा प्रमुख पदावर कार्यरत होते शरद पाटील यांचा कापसाच्या उद्योगामुळे पूर्ण जिल्ह्याभरातील शेतकऱ्यांशी संबंध येतो त्यामुळे पक्ष वाढण्यासाठी व शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी त्यांच्यावर शेतकरी सेनेची जबाबदारी टाकण्यात आली आहे. यांच्या निवडीबद्दल जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.गुलाबराव…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील शासकीय अधिकारीसह कर्मचारी लाच घेण्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले असले तरी प्रत्येक जिल्ह्यातील लाच लुचपत विभागात देखील तितकाच कारवाई करण्यात सक्रीय आहे. आरटीओ अधिकाऱ्यांची हप्तेवसुली चेक पोस्ट क्रॉस करतांना ही ट्रक चालकांसाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. त्यानुसार नागपूर जिल्ह्यातील कांद्री चेक पोस्टवर ट्रक चालकाकडून लाच स्वीकारतांना परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले. नागपूर ग्रामीण परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक अभिजत मांजरे हे आपल्या साथीदाराच्या मदतीने खाजगी ट्रक चालकाकडून चेक पोस्ट पास करण्यासाठी लाच घेतात. पैसे न दिल्यास ट्रक चेक पोस्टवरून सोडत नसल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे आली होती. ट्रक चालकांनी कंटाळून लाचलुचपत…
देशातील भरपूर लोक नियमित उपवास करीत असतात पण काहीना त्या उपवासाचे मोठे परिणाम भोगावे लागत असतात. काही 3-4 दिवस करतात. यामागे प्रत्येकाची आपापली श्रद्धा आहे. मात्र, उपवासाला केवळ धार्मिकतेचीच जोड नाहीये तर यामागे वैज्ञानिक कारणही तितकंच खरं आहे. आज आम्ही तुम्हाला वेळोवेळी उपवास करता तेव्हा त्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो हे सांगणार आहोत. याबरोबरच कोणत्या लोकांनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हेदेखील सांगणार आहोत. उपवास शरीर शुद्ध करण्याचा एक सुरक्षित आणि प्रभावी मार्ग असू शकतो. शतकानुशतके उपवास शरीराला विषमुक्त करण्याचा आणि आरोग्य सुधारण्याचा मार्ग म्हणून प्रचलित आहे. जर तुम्ही उपवास नीट केला तर तुमची पचनसंस्था चांगली राहू शकते. काही लोकांना…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जेव्हा लहान मुळे रडतात तेव्हा पालक रडणाऱ्या मुलाला शांत करण्यासाठी त्याच्या हातात मोबाईल देतात. मात्र त्याचेही अनेक तोटे आहेत. काही वेळा मोबाईल मुलांच्या हाती दिल्यास त्याचा आर्थिक फटका पालकांना बसतोय. अशाच एका घटनेत एका मुलाने त्याच्या वडिलांचा मोबाईल घेतला आणि त्यावरुन तब्बल 80 हजार रुपयांच्या जेवणाची ऑर्डर दिली. इतकचं काय तर वरुन त्याने 25 टक्के टीपही दिली. अमेरिकेतील मिशिगनमध्ये राहणाऱ्या 6 वर्षांच्या मुलाला भूक लागली होती. त्यानंतर त्याने वडिलांच्या मोबाइलवरून 1000 डॉलर्स म्हणजे सुमारे 80 हजार रुपयाच्या जेवणाची ऑर्डर केले. या मुलाच्या वडिलाचे नाव कीथ स्टोनहाउस असून त्याने आपल्या मुलाला मोबाईल गेम खेळायला दिला होता, आणि…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील एका शिक्षकाने आपल्याच वर्गातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आल्याने चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील एका गावातील शाळेत अल्पवयीन मुलगी ८ वी मध्ये शिक्षण घेत असून या शाळेतील शिक्षक म्हणून कार्यरत असलेला संशयित आरोपी सुनील संतोष भागवत याने अल्पवयीन मुलीसोबत वैयक्तिक संबध प्रस्थापित करण्याच्या चुकीच्या उद्देशाने मुलीच्या आईचा नंबरवर दि १५ जानेवारीपासून ते आजपर्यत वेळोवेळी संपर्क करीत अश्लील भाष्य केले तर दि ४ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास अल्पवयीन मुलीगी शाळेत एकटी असतांना तिच्या मानस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी संशयित आरोपी सुनील भागवत याच्या…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरात शुल्लक कारणावरून एका तरुणावर चॉपरने हल्ला चढवून गंभीर दुखापत केल्याची घटना मंगळवारी रात्री साडे वाजता हरगीरबाबा नगरात घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, चाळीसगाव शहरातील हरगीरबाबा नगरातील दिनेश शिवाजी कोर (वय २१) हा मनोज लोटन भोई व हर्षल दीपक झोडगे या मित्रांसोबत पीर मुसा कादरी बाबा यांच्या उरुसाकडे जात होता. हरगीरबाबा नगर पाटणारोड येथून जात असताना कन्हैया उर्फ कनू देशमुख व शुभम बारी हे मोटारसायकलवरून आले. तेव्हा कन्हैयाने माझ्याकडे काय बघत आहे. असे सांगून शिवीगाळ केली. त्यात मनोज लोटन भोई याने त्याला शिवीगाळ करू नको, असे सांगितले. मात्र…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पातोंडा जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय अमळनेर येथे नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय अमळनेर येथील आंतरवासिता प्रशिक्षक विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन उपक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यात आला. जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमळनेर येथे नवलभाऊ प्रतिष्ठान संचालित शिक्षणशास्त्र महाविद्यालय अमळनेर येथील छात्राध्यापकांचा आंतरवासिता उपक्रम सुरू आहे. आंतरवासिता उपक्रमांतर्गत छात्र अध्यापकांनी शालेय स्तरावर मुख्याध्यापकांच्या परवानगीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन नानासो डी डी पाटील, प्रमुख पाहुणे श्री ज्ञानेश्वर कोळी आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे चिटणीस तुषार संदानशिव. मुख्याध्यापक श्री के डी पाटील प्रा. यु.बी. पाटील, प्रा. डॉ.जितेश चव्हाण पर्यवेक्षक सोनवणेसर तसेच विद्यालयातील सर्व…
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातून एका व्यक्तीची मालवाहू गाडी चोरीला गेल्या घटना उघडकीस आल्याने धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील गुजराथी गल्लीतील रहिवासी असलेले सचिन मधुकर पाटील हे शेती व अक्वाचा व्यवसाय आहे. त्यांच्या बहिण वैभव नगरात वास्तव्यास असून त्यांनी त्यांची मालवाहू महेद्र कंपनीची पिकअप गाडी एम.एच.१९.एस.७३९९ घराबाहेर लावलेली असतांना दि ८ रोजीच्या मध्यरात्री अनोळखी चोरट्यांनी तेथून ती गाडी चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्याने धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.उमेश पाटील हे करीत आहेत.

