• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भर लग्नात नवरीवर चालविली तरुणाने गोळी !

editor desk by editor desk
February 6, 2023
in क्राईम, राष्ट्रीय
0
भर लग्नात नवरीवर चालविली तरुणाने गोळी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

कोणत्याही विवाहात प्रत्येक नवरीला आपल्या सासरी जायचे असते पण पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरात एका नवरीला मंडपातून थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. ती गोळी लागल्याने गंभीर जखमी झाली होती. रावळपिंडीमध्ये रविवारी लग्न सुरू असताना एका तरूणाने नवरीवर गोळी झाडली. हा तरूण न बोलवता लग्नात घुसला होता. इथे नवरीच्या लग्नाचे रिवाज सुरू होते, तेव्हाच त्याने तिच्यावर गोळी झाडली.

पाहुण्यांनी या हल्ला करणाऱ्या तरूणाला पकडलं आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. यादरम्यान जखमी नवरीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की, तरूणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. या तरूणाला लग्न होत असलेल्या तरूणीसोबत लग्न करायचं होतं. पण तरूणीच्या परिवाराने त्याला लग्नास नकार दिला होता. याच रागातून त्याने तरूणीवर गोळी झाडली.

दुसरीकडे पाकिस्तानच्या इस्लामाबादच्या एका पार्कमध्ये दोन व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवत एका महिलेवर रेप केला. पोलिसांनी सांगितलं की, इस्लामाबादच्या एफ-9 परिसरात पीडित महिला आपल्या एका पुरूष मित्रासोबत पार्कमध्ये फिरत होती. तेव्हाच दोन व्यक्तींनी त्यांना थांबवलं आणि जबरदस्ती त्यांना झुडपात नेलं. पुरूष मित्राला महिलेपासून वेगळं करण्यात आलं. जेव्हा ती ओरडली तेव्हा तिला आणखी पाच-सहा जणांना घेऊन येऊ अशी धमकी दिली. त्यानंतर दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिच्याकडून घेतलेल्या वस्तूही तिला परत दिल्या. महिलेला आपलं तोंड बंद ठेवण्यासाठी 1 हजार रूपयेही दिले आणि तिथून फरार झाले. पीडित महिला रात्री 11 वाजतानंतर पोलिसांकडे गेली आणि तिने पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली.

Previous Post

शेतकऱ्याची भन्नाट कल्पना ; स्ट्रॉबेरी पिकविली विदर्भाच्या शेतात !

Next Post

धरणगाव तालुक्यात गोडावून फोडले !

Next Post
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

धरणगाव तालुक्यात गोडावून फोडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group