Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चाळीसगावात तरुणावर हल्ला ; दोघांवर गुन्हा दाखल !
    क्राईम

    चाळीसगावात तरुणावर हल्ला ; दोघांवर गुन्हा दाखल !

    editor deskBy editor deskFebruary 9, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी 

    शहरात शुल्लक कारणावरून एका तरुणावर चॉपरने हल्ला चढवून गंभीर दुखापत केल्याची घटना मंगळवारी रात्री साडे वाजता हरगीरबाबा नगरात घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेली माहिती अशी कि, चाळीसगाव शहरातील हरगीरबाबा नगरातील दिनेश शिवाजी कोर (वय २१) हा मनोज लोटन भोई व हर्षल दीपक झोडगे या मित्रांसोबत पीर मुसा कादरी बाबा यांच्या उरुसाकडे जात होता. हरगीरबाबा नगर पाटणारोड येथून जात असताना कन्हैया उर्फ कनू देशमुख व शुभम बारी हे मोटारसायकलवरून आले. तेव्हा कन्हैयाने माझ्याकडे काय बघत आहे. असे सांगून शिवीगाळ केली. त्यात मनोज लोटन भोई याने त्याला शिवीगाळ करू नको, असे सांगितले. मात्र याचाच राग येऊन कन्हैया उर्फ कनू देशमुख व शुभम बारी या दोघांनी मनोज लोटन भोई यांच्या हातावर, गळ्यावर व पोटावर चॉपरने वार करून त्याला गंभीर दुखापत केली. त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दिनेश शिवाजी कोर यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला कन्हैया उर्फ कनू देशमुख (३०) व शुभम बारी (२८) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २४ तासांत चोरीचा पर्दाफाश : जळगाव पोलिसांची झटपट कारवाई !

    April 18, 2026

    राज्यात उष्णतेचा कहर, अवकाळी पावसाचा तडाखा : दुहेरी संकटात शेतकरी-नागरिक हैराण

    April 18, 2026

    धक्कादायक : मास्टर कॉलनी तरुणाने संपविले आयुष्य !

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.