Author: editor desk

फैजपूर  : प्रतिनिधी युवक महोत्सवातून सामाजिक भान निर्माण होत असते त्यासोबत कलावंत आणि माणूस म्हणून जडणघडणीची प्रक्रिया यातून होत असते त्यामुळे महोत्सवाचा निर्भेळ आनंद घ्या असे आवाहन नाट्य- सिने कलावंत ओंकार भोजने यांनी केले. फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात आयोजित युवारंग युवक महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी होते. यावेळी तापी परिसर विद्या मंडळ संस्थेचे अध्यक्ष तथा महोत्सवाचे स्वागताध्यक्ष आमदार शिरीषदादा चौधरी, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, डॉ. संतोष चव्हाण, केसीईचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, व्यवस्थापन परिषद सदस्य तथा युवारंग युवक महोत्सवाचे कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, संचालक, विद्यार्थी विकास प्रा.सुनील कुलकर्णी, वित्त व…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  अमळनेरातील गोकलानी कुटुंबीयांनी लग्नासाठी त्यांच्या होणाऱ्या सुनेला अहमदनगर येथून चक्क हेलिकॉप्टरने अमळनेरात आणले आहे. या गोष्टीची संपूर्ण राज्यात चांगलीच चर्चा रंगली असल्याचं पाहायला मिळत आहे. अमळनेर येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सरजू गोकलानी यांच्या एकुलत्या एक मुलाचा आशिष यांचा विवाह अहमदनगर येथील प्रसिद्ध उद्योजक संजय चंदानी यांची मुलगी सिमरन हिच्याशी आज शुक्रवार, १० फेब्रुवारी रोजी अमळनेर शहरात पार पडत आहे. आशिष हा इंजिनियर आहे तर सिमरन चंदानी ही सुद्धा उच्चशिक्षित मुलांच्या शिक्षण पद्धतीवर आधारित असलेल्या एका प्रसिद्ध कंपनीच्या एज्युकेशन ॲपमध्ये संचालक पदावर कार्यरत आहेत. एकुलता एक मुलगा असल्याने विवाह शाही थाटात व्हावा होणाऱ्या सुनबाईला तिच्या गावावरून हेलिकॉप्टरने लग्नाच्या…

Read More

जळगाव :प्रतिनिधी  शहरातील श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानाला लागून असलेल्या ठिकाणी आज सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास उभ्या असलेल्या ओमनी व्हॅनने अचानक पेट घेतल्याने परिसरात खळबळ उडाली. याठिकाणी तात्काळ मनपाच्या अग्निशामक दलाने धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानाला लागून असलेल्या ठिकाणी आज सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास उभ्या असलेल्या ओमनी व्हॅनने अचानक पेट घेतला होता. यावेळी व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाली. यात व्हॅनचे हजारोंचे नुकसान झाले. यावेळी महापालिकेचे अग्निशामक दलाच्या एका बंबाने आग आटोक्यात आणली . दरम्यान उड्डाण पुलाच्या खाली असणाऱ्या एका दुकानासमोर उभ्या असलेल्या व्हॅनने पेट घेल्याचे वृत्त कळताच शेकडो नागरिकांनी याठिकाणी गर्दी केली.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका ५३ वर्षीय वृद्धाचा व्हॉटसअपवर अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्या करिता पैश्याची मागणी करणाऱ्या विरोधात जळगाव सायबर पोलिसात दोन जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी  कि, शहरातील एका ५३ वर्षीय व्यक्तीला दि ४ ते ८ फेब्रुवारी दरम्यान एका मोबाईल नंबरद्वारे व्हॉटसअपवर फोन करीत त्या व्यक्तीचा आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करीत त्या व्हीडीओला युट्युबवर व्हायरल केला असून तो जर डिलीट करायचा असेल तर त्यासाठी फिर्यादीकडून वेळोवेळी ५ लाख ८१ हजार रुपये घेवून देखील अजून पैशाची मागणी करणाऱ्या दोन मोबाईल नंबर धारकांविरोधात जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि.लीलाधर कानडे…

Read More

न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., तारापूर येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रिक्त पदांच्या एकूण 193 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे. संस्था – न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., तारापूर (Nuclear Power Corporation of India Limited) पद संख्या – 193 पदे अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2023 आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NPCIL Recruitment 2023) 1) नर्स A – 26 पदे उमेदवार 12वी उत्तीर्ण +नर्सिंग & मिडवाईफरी डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग) किंवा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  ‘अमृत२.०’ योजनेचा प्रकल्प सादर न करू शकल्याने शासनाने योजनते वगळल्याचे पत्र दिले होते. या योजनेचा प्रकल्प अहवालासाठी एजन्सी नियुक्तीच्या प्रस्तावावर हा विषय रेंगाळलेला आहे. याबाबत आता पालकमंत्री तथा पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे लवकरच बैठक होणार असून यात एजन्सी नियुक्तीबाबतचा मार्ग काढला जाणार आहे. अमृत २.० योजना जळगाव शहरासाठी मंजूर करण्यात आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून १२०० कोटी रूपयांची तरतूदही आहे. त्यासाठी मनपाने प्रकल्प अहवाल एका एंजन्सी मार्फत तयार करून शासनाला पाठवायाचा आहे. एजन्सीची नावेही शासनाने दिली आहेत, त्यातील एकाला हे काम द्यावयाचे आहे. परंतू एजन्सी कोणाला नेमायची यावरून च सत्ताधारी, विरोधक तसेच मनपा प्रशासनात…

Read More

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्या सोबत एका ठिकाणी अत्याचार करीत फोटो सोशल मिडीयावर टाकण्याची धमकी दिल्याने अल्पवयीन मुलीने शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेली माहिती अशी कि, चोपडा तालुक्यातील एका १८ वर्षीय अल्पवयीन मुलीस २२ वर्षीय तरुणाने जानेवारी महिन्यात अल्पवयीन मुलीसोबत प्रेम संबध निर्माण करून तिच्यासोबत एका शेतात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या त्यानंतर दि ९ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शहरातील एका महाविद्यालयाच्या रोडवर अल्पवयीन मुलीने त्याच्या सोबत प्रेम संबध ठेवण्यास नकार दिल्याने संशयित आरोपी समीर सलीम पिंजारी (वय २२) याने मुलीसोबत असलेले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याने अल्पवयीन मुलीने चोपडा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातील अल्पवयीन मुलीने एका मुलास जन्मदिला आहे. या प्रकरणी मुलीवर अत्याचार करणाऱ्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एका परिसरात अल्पवयीन मुलगी आपल्या आईसोबत वास्तव्यास आहे. या परिसरातील एका तरुणाने अल्पवयीन मुलीस सप्टेबर २०१९ पासून ते जानेवारी २०२३ पर्यत लग्नाचे आमिष देत वेळोवेळी संशयित आरोपीने त्याच्या एका परिसरातील भाडे तत्वावर घेतलेल्या घरात अत्याचार केल्याने अल्पवयीन मुलगी गर्भवती राहत तिने एका मुलाला जन्म दिला आहे. या प्रकरणी चार  संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनी सर्जेराव क्षीरसागर करीत आहेत.

Read More

चोपडा : प्रतिनिधी एका अल्पवयीन मुलीवर एका २० वर्षीय तरुणाने वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला अटक पोलिसांनी केली आहे. सविस्तर वृत्त असे  कि, तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी चोपडा येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना मे व जून महिन्यात एका शेतरस्त्याने घेवून जात एका शेतात तिच्यावर अत्याचार केला तर डिसेंबर महिन्यात चोपडा शहरातील एका महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम दरम्यान अल्पवयीन मुलीस एका वर्गात घेवून जात त्याठिकाणी सुद्धा संशयित आरोपी विलास सुभाष भिल (वय २०) याने अत्याचार करीत मुलीचे फोटो इन्स्टाग्रामवर प्रसारित करीत भावाला मारून टाकण्याची धमकी दिली, या प्रकरणी दि ९…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबाची शिवसेनेतर्फे जळगाव जिल्ह्यात आज विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आले. बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी गणपती मंदिर येथे महाआरती करण्यात आली. तसेच विविध ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यानंतर रेल्वे मालधक्का येथे हमाल मजुरांना दररोज सकाळ व संध्याकाळ मोफत जेवणाचे वाटप करण्यात आले. तसेच बाळासाहेबांची शिवसेना आयोजित जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धा घेण्यात आली. यावेळी जि.पसदस्य प्रतापराव पाटील, विधानसभा संघटक शाम कोगटा, उपजिल्हा प्रमुख स्वप्नील परदेशी, उपमहानगरप्रमुख गिरीश सपकाळे, हितेश ठाकरे, सागर हिवरले, यश सोनवणे, चेतन कापसे, पुष्पक सुर्यवंशी, दिनेश सुवे, सागर…

Read More