Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यपाल भगतिसंग कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्विकारला आहे. त्यांच्या जागी आता नव्या राज्यपालांची नियक्ती करण्यात आली आहे. कोश्यारी यांच्या जागी रमेश बैंस यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही समावेश आहे.“महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  कारला ट्रकने मागून धडक दिल्याने यात भुसावळ येथील अॅड. श्रीराम काशीनाथ भोळे (६६) हे ठार झाले तर तीन जण जखमी झाले. ही घटना हरताळा फाट्यानजीक शुक्रवारी रात्री ११.३० वाजता एका हॉटेलनजीक घडली. अमरावती येथून खाजगी वाहनाने भुसावळकडे येत असताना हरताळा फाट्याजवळ ट्रकला मागाहूनन दिलेल्या धडकेत चालकासह चार जण जखमी झाले होते. यातील ६६ वर्षीय वकील श्रीराम काशिनाथ भोळे यांचा उपचारादरम्यान शनिवारी निधन झाले. अपघाताची घटना १० फेब्रुवारी रोजी रात्री ११:३० वाजता आशीयाई महामार्ग यादवच्या पुढे घडली. याबाबत माहिती अशी की अमरावती होऊन काम आटपून कार् क्रमांक एमएच- १९-सीझेड- ७२४६ ने भुसावळ कडे येत असताना पुढे चालणारा ट्रक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  चोपडा आणि जळगाव तालुकावासियांना वरदान ठरणाऱ्या निम्न तापी पाडळसरे मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या तापी नदीवरील खेडीभोकरी ते भोकर दरम्यानच्या तापी नदीवरील मोठ्या उंच ऐतिहासिक पुलाचे १३ फेब्रुवारी ऐवजी १६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे असे पालकमंत्र्यांनी आज बैठकीत सांगितले. चोपडा आणि जळगाव तालुकावासियांना वरदान ठरणाऱ्या निम्न तापी पाडळसरे मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या तापी नदीवरील खेडीभोकरी ते भोकर दरम्यानच्या तापी नदीवरील मोठ्या उंच ऐतिहासिक पुलामुळे तीन तालुक्यांसोबत गुजराथ व मध्यप्रदेशच्या वाहनधारकांना लाभ होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यासोबतच शिवाजी नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण, म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भूमीपूजन, बांभोरी येथील गिरणा नदीवरील…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  नेहमी आपण रेल्वेने प्रवास करीत असतो. दूरचा प्रवास असल्याने एक रात्र तर नक्कीच आपल्याला रेल्वेमध्येच काढावी लागते. तुम्ही रात्री रेल्वेत शांत झोपलेले असतांना तुम्हाला माहित नसते कि आपल्या जवळ कोण येतय किवा कोण नाही, अशीच घटना एका प्रवासी सोबत झाली आहे त्यामुळे रेल्वेत प्रवास करतांना झोप आली तर अशी घटना आपल्या सोबतही घडू शकते. एक प्रवासी आणि त्याची पत्नी अहमदाबाद कोल्हापूर रेल्वे एक्सप्रेस गाडीतून प्रवास करीत असताना दोघांना लागली झोप. त्याचा फायदा घेत चोरटय़ाने प्रवाशाच्या पत्नीची पर्स लांबिवली आणि तो पसार झाला. मात्र तो वसई शहरातील सीसीटीव्हीत पोलिसांना दिसून आल्याने पोलिसांनी त्याला भायखळा येऊन अटक केली. त्याचे…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  राज्यभरात चर्चेत असलेली निवडणूक म्हणजे पुण्याची,  कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत मोठ्या घटना घडत आहे. राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेचे इच्छूक असलेले उमेदवार राहुल कलाटे नाराज होते. त्यांनी अपक्ष निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केली सुद्धा पण याच निवडणुकीत त्यांची चर्चा राज्यभर होवू लागली आहे. त्याचे कारणही तसेच काही आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षीय उमेदवारांना हा अपक्ष उमेदवार नक्की भारी पडणार आहे अशी चर्चा राज्यभर होत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यासह अजित पवार यांनी खास समजूत काढून देखील राहुल कलाटे यांनी कुणाचे हि काही न एकत अपक्ष उमेदवारी केली आहे. त्यामुळे चिंचवड पोटनिवडणुकीत…

Read More

जामनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील शेंदुर्णी येथील बंद घरातून चोरटयांनी जवळपास सात लाखांचा ऐवज लांबविला. ही घटना बुधवार ते शुक्रवार या दरम्यान शेंदुर्णी येथे घडली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेंदुर्णी येथील अमित श्रीदत्त अग्रवाल यांचे लग्न होते. त्यासाठी सर्व परिवार ८ ते १० फेब्रुवारी या दरम्यान पाचोरा येथे गेले होता. यावेळी घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरावरील गच्चीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. अमित यांच्या कपाटातील तीन लाख रुपये रोख व १३ तोळे सोने असा एकूण सहा लाख ९० हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला. याबाबत जोगेश्वर अनिल अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  देशाचा अर्थसंकल्प झाल्यानंतर सोने व चांदीच्या दरात मोठी चढ उतार दिसून आली होती. तर गेल्या दोन दिवसात सोन्याचे भाव कमी झाले होते. तर १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५२,४०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५२,९०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. चांदी ७०,८०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७१,३५० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५२,४०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५७,१६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  ठाकरे गटाचे नेते खा.संजय राऊत यांना धमकीचा फोन आल्याने ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. पत्रकार वारीसे यांच्या हत्येचा मुद्दा उचलाल तर तुमचाही शशिकांत वारीसे करु, अशी धमकी राऊत यांना केली आहे. हि माहिती स्वत: राऊत यांनी दिली आहे. वारीसे यांच्या कुटुंबाला भेटायला न जाण्याची ताकीद देखील संजय राऊत यांना देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करा, अशी मागणी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. संजय राऊत म्हणाले, शशिकांत वारीसे यांचा विषय उचलू नका म्हणून मला धमकी आली. या प्रकरणी मला सतत फोन येत आहेत. मात्र मी भित नाही, मी जाहीरपणे हा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  छत्तीसगडहून नाशिककडे जाणाऱ्या ट्रकमधून ७० लाख रुपये किंमतीचा ५०० किलो गांजा जप्त करण्यात आला. भुसावळ शहराजवळील महामार्गावरील नवोदय उड्डाणपुलाखाली शुक्रवारी पहाटे ही धडक कारवाई करण्यात आली. इलेक्ट्रीक साहित्यखाली हा गांजा लपविण्यात आला होता. वाहनावरील चालक मात्र फरार झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री छत्तीसगडयेथून येणाऱ्या ट्रकमध्ये गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रात्री नवोदय विद्यालयाच्या उड्डाणपुलाखाली एक ट्रक थांबलेला आढळून आला. दोन तास होऊनही वाहनाजवळ कुणीही न आल्याने पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आणण्यात आले. तिथे तपासणी केली असता वाहनात गांजा आढळून आला. इलेक्ट्रिकच्या साहित्याखाली ५०० किलो गांजा गोण्यामध्ये ठेवलेला आढळून आला. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था  लेट फी व पेनल्टी भरण्याची नोटीस न काढण्यासाठी 15 हजार रुपये लाच घेताना जीएसटी भवन येथील व्यवसाय कर अधिकाऱ्याला सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. स्वप्नाली सतीश सावंत (वय 39) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. सांगली एसीबीने ही कारवाई गुरुवारी केली. याबाबत 42 वर्षाच्या महिलेने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Sangli ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार महिला काम करत असलेल्या हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांचे व्यवसाय कर व परफॉर्मन्स बोनस यावरील लेट फी व पेनल्टी भरण्याची नोटीस न काढण्यासाठी स्वप्नाली सावंत यांनी 25 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती 15 हजार रुपये…

Read More