जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका तरुणावर दुचाकी लावण्याच्या कारणावरून तीन ते चार तरुणांनी त्याला मारहाण करीत चाकू मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शिकवणीसाठी मित्राला घ्यायला गेलेल्या तरुणाच्या पाठीत शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना शहरातील सेंट जोसेफ शाळेजवळ सोमवारी संध्याकाळी सात वाजता घडली. आर्यन अजय पाटील या महाविद्यालयीन तरुणाचा डी-मार्टजवळ तर त्याच्या मित्राचा सेंट जोसेफ शाळेजवळ क्लास होता. तो त्याला घ्यायला शाळेजवळ संध्याकाळी सात वाजता दुचाकीने गेला होता. या ठिकाणी आठ ते दहा टारगट मुले एका तरुणाला मारहाण करत होते. दुसऱ्या उभ्या असलेल्या गटातील तरुणाने चॉपरने…
Author: editor desk
तरुणाईचा आवडता व्हॅलेंटाईन डे आज जगभरात साजरा करण्यात येत आहे. या दिवशी प्रेमीयुगुल एकमेकांना भेटवस्तू देतात. प्रियकर आणि प्रेयसीला गिफ्ट देण्यासाठी तरुणाई अनेक योजना आखत आहे. सूरतच्या एका तरुणीने मात्र आपल्या पतीला सोन्याचा मुलामा असलेल्या गुलाबाचे हृदयाच्या आकाराचे गुच्छ व्हॅलेन्टाईन गिफ्ट बनवले आहे. त्यामुळे या खास गिफ्टची आता चांगलीच चर्चा रंगली आहे. परिधी असे तरुणीचे नाव असून दीप असे तिच्या पतीचे नाव आहे. सूरतमधील तरुणीईमध्येही यावर्षी “व्हॅलेन्टाईन डे निमित्त सळसळता उत्साह असल्याचे दिसून येत आहे. व्हॅलेन्टाईन डेला गुलाब देऊन आपल्या प्रेमाची कबुली दिली जाते. तसेच तरुणाई त्यांच्या प्रियकर आणि प्रेयसीला महागडे पुष्पगुच्छ देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. मात्र यावर्षी सूरतमध्ये…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात एकनाथ शिंदे यांनी मोठ बंड करीत ४० आमदारांना सोबत घेत भाजपाशी युती केली. राज्यात शिंदे भाजप सरकार देखील स्थापन झालं. यानंतर मागच्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची यावरून वाद सुरू आहे. यादरम्यान आता शिवसेनेत पडलेल्या या फूटीबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आज सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय घटनापीठापुढे राज्यातील सत्तासंघर्ष आणि शिवसेनेत पडलेली फूट या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. या सुनावणी दरम्यान हे प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणीसाठी सोपवायचे की नाही, यासंदर्भात देखील निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान ७ सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्यात यावं अशी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तरप्रदेशातील आग्रामध्ये एका व्यक्तीला दारूची पैज लावणं चांगलंच जीवावर बेतलं आहे. मित्रांनी पैज लावल्यांनंतर अवघ्या 10 मिनिटांत तीन क्वार्टर दारू पिल्याने जय सिंह नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. याबाबत माहिती आधी कि, ताजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिल्पग्राममधील जय सिंहआणि त्याचे मित्र भोला आणि केशव यांच्यामध्ये 10 मिनिटांत 3 क्वार्टर दारू प्यायची पैज लागली. यावेळी जय सिंहने 10 मिनिटांत 3 क्वार्टर दारू पिऊन पैज जिंकली, मात्र इतक्या फास्टमध्ये दारू पिल्यामुळे त्याची तब्येत इतकी बिघडली की तो बेशुद्ध झाला. या घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र…
भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. भारतामध्ये गावाची अर्थव्यवस्था शहरापेक्षा खूप वेगळी आहे. ग्रामीण भागात लोक उदरनिर्वाह करण्यासाठी शेती, पशुपालन यासारख्या कामांना प्राधान्य देतात. त्यासोबत देशातील शेतकरी शेती सोबत वेगवेगळे जोड व्यवसाय करीत असल्याने अधिक उत्पन्न शेतकरी घेत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार देखील त्यांना सातत्याने मदत करत असते. सरकार अनेक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करत असते. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिकदृष्ट्या मदत मिळते. शेतकऱ्यांना मिळेल लाभ पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेमध्ये सामील होणाऱ्या लाभार्थ्यांना प्रतिदिन पन्नास रुपये गुंतवावे लागतात.…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पातोंडा येथून जवळच असलेल्या दहिवद येथे चौक शुशोभीकरणांतर्गत आमदार निधीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक बांधण्यात आले त्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आमदार अनिल दादा पाटील यांच्या हस्ते झाला. दहिवद येथील ग्रामपंचायत चौकात मोक्याच्या ठिकाणी स्मारक निर्माण झाल्यामुळे गावातील धनगर बांधवांनी प्रवेश द्वारा जवळच आमदार अनिल दादा पाटील यांना पिवळा फेटा, घोंगडी व काठी देऊन सवाद्य मिरवणूक करण्यात आली. मिरवणुकीच्या सुरुवातीला गावातील तरुणींनी पिवळा पोशाख परिधान करून हातात महादेवाची पिंड घेऊन आमदारांना असंख्य ग्रामस्थ महिला भगिनी यांच्या उपस्थितीत सभामंडपात आणले. त्यावेळी दीपप्रजलानाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशोक तुळशीराम पाटील होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण भूमिपुत्र…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावाजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांच्या पथकान पकडून तब्बल १५ लाख १५ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा गावाजवळून वाळू वाहतूक होत असल्याचा संशय आल्याने पोलीस गस्तीवर असतांना दि १२ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास एम.एच.१८.बी.जे.२०५२ नंबरचे डंपर अवैध वाळू वाहतूक करीत असल्याचा संशय आल्याने चाळीसगाव शहर पोलीस स्थानकाचे पोकॉ.समाधान पाटील यांनी थांबविली असता. त्या डंपरमध्ये ४ ब्रास वाळू मिळून आली. यावेळी हे डंपर कुणी शासकीय अधिकारी पकडू नये यासाठी डंपर मालक गणेश पाटील (रा.देवळी ता.चाळीसगाव) हा…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील नगरसेविका असलेल्या महिलेला शिवीगाळ करीत विनयभंग केल्या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एका परिसरात नगरसेवक म्हणून कार्य करणाऱ्या ५३ वर्षीय महिलेला दि ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास एका मोबाईल नंबरहून फोन आला असता, त्या फोनमधून अनोखी इसमाने त्यांना अश्लील शिवीगाळ करीत मनास लज्जा उत्पन्न होईल असे बोलुन त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात नगरसेविका महिलेने धाव घेत त्या अनोळखी नंबर धारकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ.ओमप्रकाश सोनी हे करीत आहेत.
एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील २८ वर्षीय तरुणीवर एकाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कासोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती कि, एरांडोल तालुक्यातील एका गावात एका २८ वर्षीय तरुणी वास्तव्यास आहे. एका २८ वर्षीय तरुणाने २०२१ पासून तील तिला वारवार माझे तुझ्यावर प्रेम आहे सांगून मी तुझ्याशी लग्न करेल म्हणत वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला आहे. तिच्यावर नेहमी त्याच्या घरी अत्याचार केला त्यानंतर फिर्यादी तरुणीने त्याला टाळण्याचा प्रयत्न केला असता त्याने दि १२ डिसेंबर २०२२ रोजी तरुणीला भररस्त्यावर हात पकडून त्याच्या घरी घेवून जात पुन्हा जबरदस्तीने अत्याचार केला या प्रकरणी २८ वर्षीय तरुणीने कासोदा पोलिसात धाव…
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर शहरातून विप्रो कंपनीचा ३३ लाखांचा १८ टन १०० किलो साबण चोरीप्रकरणी अमळनेर पोलिसांनी चारपैकी एका आरोपीला राजस्थानमधून अटक केली आहे. ९ जानेवारी रोजी विप्रो कंपनीचा ९८० बॉक्स भरलेला साबण कर्नाटक येथे नेण्यासाठी मामा ट्रान्सपोर्टचा ट्रक (आरजे११ / जीए ८१३८) मालक पुष्पेंद्रसिंग सुदानसिंग चहर याच्याकडे ६२ हजार ४४५ रुपये भाडे ठरवून रवाना करण्यात आला होता. कैलास श्रीराम गुजर (भिलवाडा, राजस्थान) हा ट्रक चालवत होता. मात्र मुदतीत हा माल पोहोचला नसल्याने विप्रो व्यवस्थापक अनिल कुमार माईसुख पुनिया यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे, मिलिंद भामरे, सुनील…

