Author: editor desk

अमळनेर : प्रतिनिधी येथील आधार बहुउद्देशीय संस्था सध्या तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांमधे जाऊन नेत्र तपासणी शिबिरांच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांचे डोळे तपासणी केली जात आहे. आतापर्यंत दत्त विद्या मंदिर पातोंडा, आदर्श विद्यालय अंमळगाव, शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे, माध्यमिक विद्यालय वावडे, अंतुर्ली, मंगरूळ, सारबेटे, गडखांब आश्रम शाळा, रणाईचे या सह एकुण २७ शाळांमधे डोळे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहेत. इ. ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांचे डोळे तपासणी करून, डोळ्यांचा नंबर काढणे, नंबर लागला तर मोफत चष्मा बनवून देणे व ठराविक विद्यार्थ्यांमधे काही विशेष बाब आढळून आल्यास सदर विद्यार्थ्यांस अमळनेर येथील डाॅ राहूल मुठे यांच्याकडे आधार बहुउद्देशीय संस्थेमार्फत मोफत उपचार करवून घेत…

Read More

यावल : प्रतिनिधी  तालुक्यातील कोळन्हावी येथील तरूणाने तापी नदीच्या पुलावरून उडी घेत गणेश संजय सोळुंखे (वय-23) आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी कि, यावल तालुक्यातील कोळन्हावी येथे गणेश सोळुंखे हा आईवडील यांच्यासोबत वास्तव्याला होता. ट्रॅक्टरवर चालकाचे काम करुन तो कुटुंबाला हातभार लावित होता. सोमवारी दुपारी 5 वाजेच्या सुमारास घरात कुणाला काहीही न सांगता थेट गावानजीक असलेल्या तापी नदीच्या पुलावर गेला. तिथे त्याने थेट पुलावरून तापी नदीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविली. त्याने तापी नदीत उडी घेतल्याचे काटावर गुरे चारणार्‍यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने गावाकर्‍यांना ही…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील नागसेन नगरातील २८ वर्षीय तरुणाला पाच जणांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून धारदार वस्तूंसह लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी रात्री उशीरा एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील नागसेन नगरात मुकेश रोहिदास झाल्टे (वय-२८) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. ४ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास रामेश्वर कॉलनीतील अशोक किराणा दुकानजवळ उभा असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून रामेश्वर कॉलनीतील पाच जणांनी फरशी, चॉपर, लोखंडी रॉड, दारूची बाटली आणि काठी याने बेदम मारहाण करून डोक्याला, हाताला, मानेला आणि…

Read More

भडगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील कजगावनजीक मंगळवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास अमरावती येथून मालेगाव येथे नवरदेवाला घेऊन जाणाऱ्या इनोव्हा कारने अचानक पेट घेतला. यातून नवरदेवासह पाचजण सुखरूपपणे बचावले आहेत. मिळालेली माहिती अशी कि, अमरावती येथील रोहन हरी डेंडूळे यांचे मंगळवारी मालेगाव येथे लग्न होते. त्यासाठी ते नातेवाइकांसह इनोव्हा कारने (एमएच २७ बीव्ही ७९५६) निघाले होते. कजगावनजीक गाडीमधील चालकाच्या वायर जळाल्याचे लक्षात आले. कार रस्त्याच्या बाजूला घेत असतानाच तिने पेट घेतला. चालकाने लागलीच कारमधील पाचही जणांना खाली उतरवले आणि काही मिनिटांतच कार जळून खाक झाली. कारला लागलेली आग विझवण्यासाठी रस्त्यावर कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने कार काही मिनिटांत जळून खाक झाली. गाडीने पेट घेताच…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस स्थानकात दि. ०९ रोजी ज्वेलरी दुकानाचे शटरच्या कुलूपास लावलेले पट्टया कापून दुकानातून ४५,०००/- रुपयाचा सोन्या-चांदीचे दागिने, बेनटेक्सचे दागिने चोरी केले होते. त्यानंतर सदर गुन्हयांतील अज्ञात आरोपीने लंपास केला होता. या प्रकरणी तपास जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे आला असता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किसन नजनपाटील यांनी त्यांना मिळालेली गोपनिय माहिती मिळाली की, धरणगाव शहरात गजानन सोपान शिंगाळे रा. पाचन वडगाव ता. जि. जालना हा अट्टल गुन्हेगार आलेला आहे. तो वेगवेगळया जिल्हयांत घरफोडी, चोरी, जबरी चोरी, दरोडा या सारखे गुन्हे करतो. सदर बातमीची खात्री करण्यासाठी त्यांचे अधिनस्त पोउनि, श्री. अमोल देवढे, पोहेकॉ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगावात आतेभावाच्‍या लग्‍नानिमित्‍ताने धरणगावातून येत असलेल्‍या विवाहितेचा पाळधीजवळ महामार्गावर झालेल्‍या अपघातात मृत्‍यू झाला. कविता प्रशांत चौधरी असे विवाहितेचा नाव आहे. तर दुचाकीस्वार विलास देवीदास चौधरी हे गंभीर जखमी आहेत. धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील रहिवासी कविता चौधरी यांची आत्या जळगाव शहरातील शिव कॉलनी परिसरात राहतात. आत्याच्या मुलाचे लग्‍न असल्‍याने हळदीसाठी त्‍या सोमवारी शेजारी राहत असलेले विलास देवीदास चौधरी यांच्‍यासोबत दुचाकीवरुन येत होत्‍या. परंतु, पाळधीच्या पुढे आल्‍यावर मागून भरधाव वेगाने मागून येणाऱ्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. डंपरने दिलेल्‍या धडकेत दुचाकीस्वार विलास चौधरी आणि कविता हे रस्त्यावर फेकले गेले. दोन्ही पायावरुन डंपरचे चाक गेल्याने कविता चौधरी यांचा जागीच मृत्यू…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा हा गिरणा नदी पात्रातून होत असतांना आज दुपारच्या सुमारास अचानक गिरणा नदी पत्रात पोलिसांनी धडक कारवाई केल्याने वाळूमाफियामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. मिळालेली माहिती अशी कि, जळगाव शहराला लागून असलेल्या बांभोरी गावानजीकच्या गिरणा नदी पात्रात आज धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी थेट नदीपात्रात जात वाळूमाफियांना पोलिसांचे पथक दिसताच वाळूमाफियानी या परिसरातून सर्वच वाहनाची पळवापळव केली, पोलीस निरीक्षक राहुल खताळ एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी थेट वाळू भरणाऱ्या मजुरांना चांगलाच धडा शिकविला आहे. आजपासून पुढे कधीही या नदीत चोरटी वाळू भरायची नाही असा दमच त्यांनी यावेळी मजुरांना दिला असल्याने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळाचे धनाजी नाना कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवारंग युवक महोत्सवात जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. तर प्रताप महाविद्यालय, अमळनेरचा संघ उपविजेता ठरला. दि.९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान फैजपूर येथे झालेल्या युवक महोत्सवाचा समारोप सोमवारी प्रसिध्द अभिनेते गौरव मोरे यांच्या उपस्थितीत जल्लोषात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पवार, गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, व्य. प. सदस्य तथा युवारंगचे कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे हजर होते. याशिवाय स्वागताध्यक्ष म्हणून…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील पाळधी‎ बुद्रुक येथील ग्रामपंचायतीतर्फे‎ बांधण्यात आलेल्या महिला‎ शौचालयाचे लाेकार्पण पालकमंत्री‎ गुलाबराव पाटील यांच्या हस्ते‎ करण्यात आले. पंधराव्या वित्त‎ आयोगांतर्गत ३० लाखांचा निधी या‎ कामावर खर्च झाला.‎ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून‎ बाळासाहेबांची शिवसेना‎ मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख व‎ धरणगाव पंचायत समितीचे माजी‎ सभापती मुकुंद नन्नवरे, ज्येष्ठ‎ शिवसैनिक दामू पाटील, माजी‎ सभापती हेमराज पाटील,‎ म्हसावदचे सरपंच गोविंद पवार,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पाळधी बुद्रुकच्या सरपंच अलका‎ पाटील, उपसरपंच चंदन कळमकर,‎ ग्रामपंचायत सदस्य तुषार मोरे,‎ ग्रामसेवक दीपक पाठक, यशवंत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पाटील, अरुण पाटील, सागर‎ धनगर, ग्रामपंचायतचे शिपाई‎ शिवाजी पाटील व गावातील ग्रामस्थ‎ आदी उपस्थित हाेते.‎

Read More

पारोळा : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात राहणाऱ्या डॉक्टराची तब्बल ८३ हजारात फसवणूक झाल्याची घटना दि १३ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील गुजराथी गल्लीतील रहिवासी असलेले डॉ.राहुल सुरेश जैन यांनी दि ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते दि ९ फेब्रुवारी च्या सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मोबाईलवर ओंनलाईन ऑर्डर केली असता त्यांचा मोबाईल व बँकेचे खाते लिंक असल्याने त्याचा फायदा घेत अनोळखी इसमाने त्यांच्या खात्यातून तब्बल ८३ हजाराची रोकड लंपास केल्याची घटना घडल्याने त्यांनी तत्काळ पारोळा पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सफौ.बापूराव पाटील हे…

Read More